Wednesday 31 January 2018

कोंबड बाजारावर नक्षल्यांचा गोळीबार



गडचिरोली,दि.31 – जंगल परिसरात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर नक्षल्यांनी गोळीबार केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज ३१ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथे घडली.
इरप्पा उसेंडी (३५) रा. अबनपल्ली असे मृतकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथील जंगल परिसरात आज कोंबड बाजार भरविण्यात आला होता. या कोंबड बाजारात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान दुपारच्या सुमारास बाजार परिसरात बंदुकधारी नक्षली आले. त्यांनी अंदाधूंद गोळीबार सुरू केला. गोळ्यांचा आवाज ऐकून बाजारामधील नागरिक सैरावैरा पळू लागले. याचदरम्यान नक्षल्यांनी इरप्पा उसेंडी याच्यावर निशाना साधत त्याला गोळी मारली. यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नक्षली घटनास्थळावरून जंगलात पसार झाले.
इरप्पा उसेंडी नक्षल्यांच्या निशान्यावर होता. नक्षली मागील काही दिवसांपासून इरप्पा उसेंडीच्या मागावर होते. याचदरम्यान आज कोंबड बाजारात आलेल्या इरप्पाची नक्षल्यांनी गोळी मारून हत्या केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.

सेवानिवृत्त शिक्षिकेची गळा आवळून हत्या

अमरावती,दि.31 : सेवानिवृत्त शिक्षिकेची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी येथील जलारामनगरात घडली.
शैलजा ओमप्रकाश निलंगे (६१) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. त्या समर्थ हायस्कूलमधून निवृत्त झाल्या होत्या. सहा खोल्यांच्या घरात त्या एकट्याच राहत होत्या. काही खोल्या त्यांनी भाड्याने दिल्या होत्या. त्यांचा मुलगा अक्षय निलंगे अमरावती महापालिकेत स्थायी समिती सभापतींचे स्वीय सहायक म्हणून कार्यरत आहे. बुधवारी सकाळी त्यांचा भाडेकरू शिंदे (२३, रा. आसेगावपूर्णा) फाटक उघडण्यासाठी गेला असता, त्याला कुलूप दिसले. त्याने दार ठोठावून व बेल वाजवून शैलजा निलंगे यांना आवाज दिला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने तो जवळच राहणाऱ्या  निलंगे यांच्या बहिणीकडे गेला.
दरम्यान, शेजाऱ्यांनी शैलेजा निलंगे यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता, त्यांचा मृतदेह बेडरूममध्ये आढळून आला. उशीने तोंड दाबून व गळा आवळून हत्या झाल्याने त्यांच्या तोंडातून रक्तस्राव होत असल्याचे घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी फे्रजरपुरा पोलिसांनी भाड्याने राहणाऱ्या  सहा संशयितांना चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे.

रा. स्व. संघात नेतृत्त्वाच्या पदांवर किती महिला आहेत? राहुल गांधींची संघ, भाजपावर टीका

शिलाँग,दि.31(वृत्तसंस्था)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांचे स्थान काय आहे असा प्रश्न काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. 
मेघालयमध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्यावेळेस केलेल्या भाषणात रा.स्व. संघात नेतृत्त्वाच्या विविध पदांवर किती महिला आहेत असा प्रश्न त्यांनी आज विचारला.
मेघालयातील भाषणामध्ये भाजपा आणि संघावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, “संघाच्या विचारप्रवाहाविरोधात आम्ही देशभर लढत आहोत. भाजपा आणि संघ देशभरात विशेषतः ईशान्य भारतामध्ये संस्कृती, भाषा आणि जिवनपद्धतीचे महत्त्व कमी करत आहेत.” ईशान्य भारतातील लोकांना उद्देशून ते म्हणाले, “आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल, भाषा आणि संस्कृतीबद्दल अभिमान असला पाहिजे. तुमच्या संस्कृती आणि विचारपद्धतीचे संरक्षण करण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत.”रा. स्व. संघात महिलांचे स्थान या विषयावर पुन्हा टीका करताना राहुल गांधी म्हणाले, “संघामधील विविध नेतेपदांवर किती महिला नेमल्या गेल्या आहेत याबाबत कोणाला माहिती आहे का?  जर तुम्ही महात्मा गांधींचा फोटो पाहिलात तर त्यांच्या दोन्ही बाजूस महिला उभ्या असल्याचे तुम्हाला दिसेल पण तुम्ही मोहन भागवत यांचा फोटो पाहिलात तर ते एकटेच दिसतील किंवा त्यांच्या आजूबाजूस पुरुषच दिसतील.”

जि.प. सभापती निवडणुकीत भाजप-काँग्रेसचे प्रत्येकी दोन सभापती

  • काँग्रेसचे रमेश अंबुले शिक्षण व आरोग्य सभापती
  • काँग्रेसच्या लता दोनोडे महिला बालकल्याण सभापती
  • भाजपचे विश्वजीत डोंगरे समाजकल्याण सभापती
  • भाजपचा शैलजा सोनवने कृषी व पशुसंवर्धन सभापती

गोंदिया,दि.30-जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतही अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जुळलेली मैत्री भाजप व काँग्रेसने पुन्हा घट्ट केली. या निवडणुकीतही काँग्रेसने राष्ट्रवादीला बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी आपण सख्खे वैरी सख्खे भाऊ चा नारा देत जुनीच मैत्री कायम ठेवली आहे.सभागृहात २० सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादीला यावेळीही विरोधी बाकांवर बसून भाजप-काँग्रेसचा संसार बघावा लागणार आहे.53 सदस्य संख्या असलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या एका सदस्याचे आज निधन झाल्याने सभापती निवडणुक प्रकियेत 52 सदस्यांनी सहभाग नोंदविला.त्यामध्ये काँगॅेस 15,भाजप 17 व राष्ट्रवादीच्या 20 सदस्यांचा समावेश होता.
जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात झालेल्या विषय समिती निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे व उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी काम पाहिले. विषय समितीच्या समाजकल्याण समिती सभापतिकरीता भाजपकडून विश्वजीत डोंगरे, राष्ट्रवादीकडून मनोज डोंगरे  यांनी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसने आपला उमेदवार न दिल्याने काँग्रेस-भाजप युती स्पष्ट बघावयास मिळाली. या निवडणुकीत भाजपच्या डोंगरे यांना ३१ तर राष्ट्रवादीचे डोंगरे यांना २० मते मिळाली. भाजपच्या डोंगरे यांना काँग्रेसचे जि.प.सदस्य दिपक पवार यांनी मतदान केले नाही. त्याचप्रमाणे महिला बालकल्याण विषय समितीच्या निवडणुकीत काँग्रेसकडून लता दोनोडे  व काँग्रेसच्या सरिता कापगते, राष्ट्रवादीकडून दुर्गा तिराले यांनी अर्ज दाखल केले होते. 
काँग्रेसच्या श्रीमती कापगते यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यांच्या अर्जावर अनुमोदक म्हणून राष्ट्रवादीचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांची स्वाक्षरी होती. यात भाजपने आपला उमेदवार रिंगणात उतरविला नाही. काँग्रेसच्या लता दोनोडे यांना ३२ व राष्ट्रवादीच्या दुर्गा तिराले यांना २० मते मिळाली. काँग्रेसच्या दोनोडे यांना भाजपच्या १७ सदस्यांनी मतदान केले. यानंतर उरलेल्या दोन विषय समितीकरीता झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून रमेश अंबुले यांनी तर भाजपकडून शैलजा सोनवाने यांनी अर्ज दाखल केला.
राष्ट्रवादीकडून किशोर तरोणे व राजेश भक्तवर्ती हे रिंगणात होते. रमेश अंबुले यांना ३२ व राष्ट्रवादीचे किशोर तरोणे २०, भाजपच्या शैलजा सोनवाने यांना ३२ तर राजेश भक्तवर्ती यांना २० मते पडली. काँग्रेसचे जि.प.सदस्य़ शेखर पटले यांचे निधन झाल्याने ५३ सदस्य संख्या असलेल्या जि.प.विषय समिती निवडणुकीत ५२ सदस्यांनी मतदान केले. मतदानापुर्वी आजच निधन झालेल्या सदस्यांला श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.परंतु आधी निवडणूक नंतर श्रद्धांजली अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतल्यान आधी निवडणूक घेण्यात आली.निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर श्रद्धांजली सभा घेण्यात आली.त्या सभेला राष्ट्रवादीचे सदस्य गैरहजर राहिल्याचे वृत्त समोर आले आहे.

2 लाखांची लाच, IPS अधिकारी जाळ्यात

नांदेड,दि.30 : आयपीएस अधिकाऱ्याच्या वतीने एक लाखांची लाच स्वीकारताना एक जण एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. रेतीची कारवाई थांबवण्यासाठी आयपीएस अधिकारी विजयकृष्ण यादव यांनी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.अमरावती लाचलुचपत विरोधी पथकाने नांदेडमध्ये ही कारवाई केली. अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलिस स्थानकात कार्यरत असताना रेतीची कारवाई थांबवण्यासाठी यादव यांनी लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नांदेडच्या इतवारा पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आरोपी जी. विजय कृष्णन यादव ( IPS 2015 RR) सध्या उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नांदेडच्या इतवारा उपविभागात कार्यरत आहेत. यादव हे मूळ तेलंगणातील हैदराबादचे रहिवासी आहेत. दुसरा आरोपी सन्निसिंग इंदरसिंग बुगई नांदेडचा रहिवासी आहे.फिर्यादींविरोधात तिवसा पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी, रेतीचा ट्रक सोडण्यासाठी आणि चार्जशीट दाखल करण्यासाठी मदत केल्याबद्दल कामाचा मोबदला म्हणून दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.आरोपींनी दोन लाखांच्या लाचेची मागणी केली असून एक लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलं. मंगळवारी एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. ही सर्व रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.

Berartimes_31Jan-06Feb_2018





Tuesday 30 January 2018

डुप्लीकेट किताबों पर शिक्षा विभाग सख्त, बिकीं तो होगा मुकदमा

देहरादून, [राज्य ब्यूरो]: प्रदेश में अगले सत्र से सरकारी और निजी स्कूलों में लागू की जा रही एनसीईआरटी की किताबों की नकल या डुप्लीकेट बाजार में बिकती पाईं गईं तो सरकार कड़े कदम उठाएंगी। ऐसी किताबों को बेचने वाली दुकानों को सीज किया जाएगा, साथ में किताब विक्रेता और संबंधित क्षेत्र के शिक्षाधिकारी के खिलाफ मुकदमा दर्ज कराया जाएगा। एनसीईआरटी की किताबें 15 फरवरी तक बाजार में उपलब्ध होंगी। शिक्षा मंत्री अरविंद पांडे ने इस संबंध में अधिकारियों को निर्देश जारी किए हैं। प्राइवेट स्कूलों की मनमानी पर अंकुश लगाने को फीस एक्ट सत्र 2019-20 तक लागू हो जाएगा। इसे अंतिम रूप दिया जा रहा है। 
उत्तरांचल प्रेस क्लब में सोमवार को प्रेस से मिलिए कार्यक्रम में शिक्षा, खेल व युवा कल्याण, पंचायतीराज व संस्कृत मंत्री अरविंद पांडे ने कहा कि एनसीईआरटी की मुफ्त किताबें नया सत्र शुरू होने के साथ ही सरकारी विद्यालयों तक पहुंचाई जाएंगी। एनसीईआरटी की किताबों की छपाई के टेंडर हो चुके हैं। एनसीईआरटी की किताबों के स्थान पर उनकी नकल या फर्जी किताबें बिकती पाईं गईं तो इस मामले में दोषी पाए जाने वाले किसी भी व्यक्ति को बख्शा नहीं जाएगा।उन्होंने कहा कि उत्तराखंड बोर्ड से मान्यताप्राप्त और सीबीएसई बोर्ड से संबद्ध निजी स्कूलों में अगले साल से एनसीईआरटी की किताबें लागू होंगी। आइसीएसई बोर्ड से संबद्ध स्कूलों को भी भविष्य में इस दायरे में लाने पर विचार होगा। राज्य सरकार की ओर से लागू स्थानांतरण एक्ट को नए सत्र से प्रभावी तरीके से लागू करने के निर्देश शिक्षा विभाग के अधिकारियों को दिए गए हैं। जरूरी हुआ तो शिक्षा का अधिकार अधिनियम के तहत तबादलों की व्यवस्था में संशोधन पर विचार किय जाएगा।

जब राहुल ने थामा आडवाणी का हाथ, संसद में और भी दिखे दिल छूने वाले नजारे

नई दिल्‍ली, वैसे तो राजनीतिक मैदान में पक्ष और विपक्ष हमेशा आमने-सामने तन कर खड़े नजर आते हैं। मगर बजट सत्र के पहले दिन सियासी शिष्‍टाचार का बेमिसाल नजारा देखने को मिला। सियासी कटुता को भुलाकर सत्ता पक्ष और विपक्ष के वरिष्ठ नेताओं ने राष्‍ट्रपति के अभिभाषण से पहले और बाद में हंसते-मुस्कुराते गर्मजोशी से हाथ मिलाते या एक दूसरे का अभिवादन करने में राजनीतिक प्रतिद्वंदिता को आड़े नहीं आने दिया।
भाजपा के दिग्गज नेता लालकृष्ण आडवाणी संप्रग अध्यक्ष सोनिया गांधी के साथ पहली पंक्ति में बैठे और उनसे निरंतर संवाद करते दिखे। संसदीय कार्य राज्यमंत्री विजय गोयल ने भी सोनिया के पास जाकर उनसे कुछ मिनटों तक चर्चा की। आडवाणी, सोनिया के साथ दो पूर्व प्रधानमंत्रियों मनमोहन सिंह और एचडी देवेगौड़ा को पहली पंक्ति में बिठाया गया था।
राहुल गांधी भी पहली पंक्ति में बैठे नजर आए, जिन पर सभी की निगाहें जमी थीं। राहुल को पहली पंक्ति में जगह देने को लेकर खास दिलचस्पी इसलिए रही, क्योंकि गणतंत्र दिवस परेड समारोह में उन्हें छठी पंक्ति में जगह दी गई थी। कांग्रेस ने इस पर काफी एतराज जताया था और इसे अपने नेता को अपमानित किया जाना कहा था। वहीं सोशल मीडिया पर भी इसको लेकर सरकार की काफी किरकिरी हुई थी।हालांकि हमेशा सरकार पर निशाना साधने की मुद्रा में नजर आने वाले राहुल गांधी ने भी अपने व्‍यवहार से सभी का दिल जीत लिया। राष्‍ट्रपति का अभिभाषण खत्म होने के बाद बाहर जाने के लिए जैसे ही आडवाणी खड़े हुए, राहुल गांधी ने आगे बढ़कर उनका हाथ थाम लिया और बाहर निकलने में मदद की। इसी दौरान विदेश मंत्री सुषमा स्वराज और सोनिया गांधी के बीच भी गर्मजोशी के साथ अभिवादन हुआ।राष्ट्रपति रामनाथ कोविंद ने भी पहली बार संयुक्त अधिवेशन को संबोधित करने के बाद पहली पंक्ति में बैठे नेताओं और मंत्रियों के पास जाकर उनसे हाथ मिलाया। राष्ट्रपति का अभिभाषण खत्म होने के बाद सत्ता पक्ष ही नहीं विपक्ष के नेताओं ने भी मेज थपथपा कर उनका अभिवादन किया।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और वित्तमंत्री अरुण जेटली के साथ पहली पंक्ति में राज्यसभा में नेता विपक्ष गुलाम नबी आजाद खुशगवार चर्चा करते दिखे। कुल मिलाकर संसद में भारत के मजबूत लोकतंत्र का कभी ना भुला देने वाला नजारा देखने को मिला, हालांकि मुद्दों पर सहमति-असहमति का होना तो राजनीति का हिस्‍सा है।
पहले भी दिख चुकी है राहुल और आडवाणी के बीच नजदीकी
आपको बता दें कि यह पहली बार नहीं है जब राहुल गांधी और आडवाणी के बीच इस तरह की नजदीकी देखने को मिली है। बीते दिसंबर में संसद सत्र के दौरान भी कांग्रेस उपाध्‍यक्ष आडवाणी का हाथ पकड़ कर उनकी मदद की थी। मौका था कि संसद हमले में शहीद हुए बहादुरों को श्रद्धांजलि देना था। इस क्रम में सबसे पहले उप-राष्ट्रपति वेंकैया नायडू के बाद लोकसभा स्पीकर समित्रा महाजन आगे बढ़ीं। उनके बाद पीएम नरेंद्र मोदी और पूर्व प्राधनमंत्री मनमोहन सिंह आगे बढ़े। इस मौके पर भाजपा और कांग्रेस के वरिष्ठ नेताओं की मौजूदगी के बीच आडवाणी जब पहुंचे तो उनके खड़े होने की जगह ही नहीं थी। ऐसे में वह किनारे जाकर खड़े हो गए। यह देखते ही सोनिया गांधी के पीछे खड़े राहुल गांधी एकदम से बाहर आए और आडवाणी को पकड़कर ले जाने लगे और उन्हें उचित स्थान दिलवाया।

धर्मा पाटील अनंतात विलीन, तगड्या बंदोबस्तात अंत्यसंस्कार!

अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर विखरण इथं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

धुळे: सरकारच्या अनास्थेपायी आत्महत्या केलेल्या 84 वर्षांच्या धर्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महेंद्र आणि नरेंद्र या दोन्ही मुलांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. अंत्यविधीसाठी धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.

रात्री उशीरा धर्मा पाटील यांचं पार्थिव धुळे जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी विखरणला पोहोचलं.

धर्मा पाटील यांनी जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात विषप्राशन केलं होतं. सहा दिवसानंतर रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

तगडा पोलीस बंदोबस्त

आज अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर विखरण इथं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.धर्मा पाटील यांच्या अंत्यविधीवेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 1 डीवायएसपी, 2 पीआय, 3 एपीआय, 12 पीएसआय, 120 कर्मचारी, धर्मा पाटील यांच्या अंत्यविधीसाठी तैनात करण्यात आले होते. या अंत्यविधीला पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह अनेक नेते, पंचक्रोशीतल लोक उपस्थित राहिले.

धर्माबाबा अमर रहे

सोमवारी दुपारी मुंबईतून निघालेलं धर्मा पाटील यांचं पार्थिव रात्री ११.१५ वाजता धुळ्यातील विखरण या त्यांच्या मूळ गावी पोहोचलं. पाटील यांचं पार्थिव रुग्णवाहिकेतून खाली उतरवताच, गावकऱ्यांनी धर्माबाबा अमर रहे, जय जवान जय किसानच्या घोषणा दिल्या.

पार्थिव पाहून कुटुंबियांना अश्रू अनावर झाले, नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. सगळं गाव यावेळी त्यांच्या घराबाहेर जमा झालं होतं.

झुंज अपयशी

मंत्रालयात विष प्राशन केलेले 84 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली. पाटील यांनी रविवारी 28 जानेवारीला जेजे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं. त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन वेळा धर्मा पाटील यांचं डायलिसीस करण्यात आलं होतं.

सत्य सामाजिक संस्था व् आशा हॉस्पिटल नागपुर च्या वतीने आयोजित मोठ्या शस्त्रक्रिया व् आरोग्य तपासनी शिबिर सम्पन्न


370 रुग्णांची तपासनि, 26 रुग्ण शस्त्रक्रिये पात्र.
7 रुग्नाना 27 जानेवारी 2018 ला शस्त्रक्रिये करिता नागपुर ला रवाना

देवरी: 30 प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आयोजित देवरी येथे 26 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10 वाजता मोठ्या आरोग्य शिबिराला सुरुवात झाली.
शिबिराचे उद्घाटन  विजय बोरुडे. तहसीलदार देवरी.  आफ़ताफ(अन्नू भाई) शेख. सभापति नगर पंचायत देवरी.  रितेश अग्रवाल सभापति न.प. देवरी.  ओमप्रकाश रामटेके उपाध्यक्ष नप देवरी . अम्बिलकर नगरसेवक नप देवरी यांच्या हस्ते झाले.
          सत्य सामाजिक संस्था देवरी मागील 5 वर्षापासून नक्षलग्रस्त तथा दुर्गम भागात आरोग्य या विषयाला घेऊन कार्य करीत आहे. फ़क्त पैशा अभावी लोकांचे ऑपेरशन थांबू नये अथवा आपले जीव गमावु नये या करिता संस्था कार्य करीत आहे. हे संस्थेचे 52 वे मोठे शिबिर आहे.

चिचगड येथे त्रिदिवसीय भव्य कबड्डी स्पर्धा गुरूवारी


चिचगड,दि.30- स्थानिक मित्र क्रीडा मंडळ आणि चिचगडवासीयांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय प्रो-कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन येत्या गुरुवार (दि.१)पासून करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबर शेख यांचे हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य घासीलाल कटकवार हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा महामंत्री वीरेंद्र अंजनकर, प्रा.जनार्दन कोल्हारे, सरपंच कल्पना गोसावी आदी मान्यवर उपस्थित राहतील.
या स्पर्धेतील पुरुष गटातील विजेत्यांना प्रथम पुरस्कार ३१ हजार, द्वितीय २१ हजार, तृतीय पुरस्कार ११ हजार आणि चतुर्थ पुरस्कार ५ हजार रुपये देण्यात येणार आहे. महिला गटातील विजेत्या संघांना प्रथम पुरस्कार २१ हजार, द्वितीय पुरस्कार १५ हजार तृतीय पुरस्कार ७ हजार आणि चतुर्थ पुरस्कार ५ हजार रुपये देण्यात येणार आहे. बाहेर गावावरून स्पर्धेत भाग घेणाèया स्पर्धकांचा राहण्याची आणि भोजनाची सोय मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त कबड्डी चमूंनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गोंदियात पेंशन बचाव परिषद उद्या


गोंदिया,दि.30- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया येथे उद्या बुधवारी (दि.३१) पेंशन बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय राज्य कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष अशोक थूल, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रहास सुटे आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना नागपूर जिल्हा शाखेचे सरचिटणीस अशोक दगडे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत नवीन अंशदायी पेंशन योजना बंद करून जुनी पेंशन योजना लागू करणे आणि सातवा आयोग याविषयी धरणे व आंदोलने या विषयी सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आता पर्यंत शासनाने दिलेली आश्वासने पाळण्यात संबंधी कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याने पुढील धोरण आखणे आणि येत्या २२ फेब्रुवारी मुंबई येथील महामोच्र्याविषयी चर्चा होणार आहे.
तरी सर्व अन्यायग्रस्त कर्मचारी बांधवांनी या परिषदेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ सहसचिव आशिष रामटेके, प्रशांत पाठक, मदन चुèहे, के.व्ही. नागफासे, बी एन तरोणे,लीलाधर पाथोडे, नरेंद्र रामटेक्कर, शैलेश बैस, पी.जी. शहारे, सुलभा खाडे, पी. वाय. बडोले, ए.जे नान्हे आदींनी केले आहे

Monday 29 January 2018

हळदी कुंकवात सुद्धा नाभिक शक्ती आहे- अनिता चन्ने

देवरी,दि.29- महिलांनी हळदी-कुंकू कार्यक्रम घेणे हे एक संस्कार आहे. या संस्कारातच नाभिक समाजातील महिलांची एकजूटतेची खरी शक्ती दिसून येते. या शक्तीमुळेच छोटी मुले भविष्यातील उत्तम पिढीचे कार्यकर्ते महिलांच्या हातून नक्कीच घडतील, असे प्रतिपादन नाभिक समाजाच्या महिला जिल्हाध्यक्ष अनिता चन्ने यांनी केले आहे.
देवरी येथे नाभिक समाज देवरी तालुका शाखेच्या वतीने गेल्या 24 तारखेला आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांता बानक ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून भिमेश्वरी उरकुडे, सिंधू बारसागडे, सुनीता बारसागडे, सेवंता उरकुडे, चंद्रकला लांजेवार आदी मान्यवर उपस्थित होते. सौ. चन्ने पुढे असेही म्हणाल्या की, महिलांप्रमाणे पुरुषांनी सुद्धा संत सेनाजी आणि नगाजी महाराजांच्या नावावर एकत्र येणे ही काळाची गरज आहे.
प्रास्ताविक आणि संचलन शालू बारसागडे यांनी केले. उपस्थितांचे आभार सविता उरकुडे यांनी मानले. 
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कंचन मेश्राम, किरण कावळे, मुन्नी लांजेवार, रंजू बानक, मीरा खडसिंगे, निला बारसागडे, उज्वला मौदेकर, सुनीता लांजेवार माधुरी खडसिंगे, शालू हटवार यांनी सहकार्य केले.

Sunday 28 January 2018

शिबीरातून कल्याणकारी योजनांची माहिती जाणून घ्या - न्या. कमलाकर कोठेकर

नागरा येथे शासकीय योजना व विधी सेवा शिबीर

* विविध स्टॉलमधून योजनांची माहिती
   * आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर
* लाभार्थ्यांना मंजूरीपत्राचे वाटप


गोंदिया,दि.28 : विविध प्रकारच्या कायदयाची माहिती विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून जनतेला देण्यात येते. सार्वजनिक हिताच्या व लोककल्याणासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या शिबीरातून नागरिकांनी आपल्या कल्याणकारी योजनांची माहिती जाणून घ्यावी. असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर यांनी केले.
गोंदिया तालुक्यातील नागरा येथे काल 27 जानेवारी रोजी आयोजित जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्या वतीने आयोजित शासकीय सेवा,  योजना व विधी सेवेच्या महाशिबीरात अध्यक्षस्थानावरुन न्या. कोठेकर बोलत होते. विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे होते.
 प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी डॉ. एम. राजा. दयानिधी, पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भूजबळ,  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सदस्य सचिव न्या. श्रीमती ईशरत शेख, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड टि.बी. कटरे, नागरा सरपंच पुष्पाताई अठराहे यांची उपस्थिती होती.
न्या. श्री कोठेकर म्हणाले, नागरिकांनी योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने  अर्जासोबत कोणती कागदपत्रे लागतात याची माहिती स्टॉलवरुन करुन घ्यावी. योजनेचा लाभ मिळण्यासाठी  कागदपत्रांची पुर्तता केली तरच योजनेचा लाभ मिळू शकतो. शिबीराला आलेल्या नागरिकांनी इथे असलेल्या स्टॉल भेट दयावी. त्यामुळे माहिती मिळण्यास मदत होईल. विविध यंत्रणांनी शिबीरात स्टॉल लावून सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
श्री दयानिधी म्हणाले, या शिबीराचा नागरा परिसरातील जास्तीत जास्त नागरिकंनी लाभ घ्यावा. जिल्हा परिषदेमार्फत लोककल्याणकारी व सार्वजनिक हिताच्या अनेक योजना राबविण्यात येतात. शिबीरात लावण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या विविध यंत्राणांच्या स्टॉलला नागरिकांनी भेट देवून योजनांची माहिती जाणून घ्यावी. योजनेचा लाभ मिळवून घेण्याबाबात काही शंका असतील तर त्याचे समाधान स्टॉलवरुन करुन घ्यावे. लोकांची शिबीराच्या माध्यमातून सेवा करण्याची चांगली संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. भूजबळ म्हणाले शिबीराच्या माध्यमातून काही लाभार्थ्यांना जागेवरच लाभ देण्यात येत आहे. जबाबदार प्रशासनासोबतच सामाजिक उत्तरदायित्वाची आणि संवेदनशिलेची प्रचिती येथे येत आहे. पोलीस विभागाच्या स्टॉलमधून सायबर गुन्हे, महिलांसाठीच्या प्रतिसाद ॲप्स, पोलिस मित्र ॲप्स बाबतची माहिती देण्यात येणार आहे. नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करुन पोलीस प्रशासन गतीमान झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर व जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या हस्ते प्रधानमंत्रीरोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत नागरा येथील ज्ञानेश्वरी लिल्हारे यांना ॲक्वा वॉटर प्लॅन्टसाठी 9 लक्ष रुपये व प्रतुल गणवीर यांना सायकल स्टोअर्स व्यवसाय सुरु करण्यासाठी दोन लक्ष रुपये कर्ज देना बँकेने मंजूर केले. या दोन्ही लाभार्थ्यांना बँकेचे कर्ज मंजूरीपत्र देण्यात आले. शिबीराला न्यायिक अधिकारी माधुरी आनंद, पी.एस.खरवडे, पी.बी.भोसले, श्रीमती ए.एस. जरुदे, श्रीमती व्ही. आर. मालोदे, एन.आर.ढोके, विक्रांत खंदारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होते. विविध स्टॉलवर संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांना माहिती देण्यासाठी उपस्थित होते.
        




देवरी येथे प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा


देवरी,दि.३०,- भारतीय प्रजासत्ताकाचा ६८वा वर्धापनदिन देवरी येथे उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. दरम्यान, स्थानिक जिल्हा परिषद मैदानावर आयोजित शासकीय ध्वजारोहण प्रभारी उपविभागीय अधिकारी विजय बोरुडे यांचे हस्ते करण्यात आले.
स्थानिक जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण प्रभारी उपविभागीय अधिकारी विजय बोरुडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाèया व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यावेळी शांतिसेनेत कार्यरत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये वीरगती मिळालेल्या शहीद संजय क्षीरसागर यांचे पिता बाबूराव क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शहरातील सर्व शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी,कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, वकीलमंडळी, युवा, महिला आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.  
देवरी पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती सुनंदा बहेकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी मनोज हिरूडकर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी डी बी साकुरे,पंचायत समिती सदस्य, अधिकारी, कर्मचारी, गणमान्य नागरिक, लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
न्यायालयातील ध्वजारोहण न्या. एस ई इंगळे याचे हस्ते करण्यात आले. तालुका पत्रकार भवन येथे पत्रकार संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत संगीडवार यांचे अध्यक्षतेत नगराध्यक्ष यादव पंचमवार यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष सुमन बिसेन,पोलिस ठाणे येथे अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पाटोळे,वनविभाग कार्यालय येथे वनपरिक्षेत्राधिकारी मारबते, मराविम येथे कार्यकारी अभियंता संजय वाकळे, सरस्वती शिशू मंदीर येथे अ‍ॅड. प्रशांत संगीडवार याचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तालुक्यातील मुल्ला येथे सरपंच कृपासागर गौपाले यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच सीमा नाईक,सदस्य राजकुमार खोटेले, नेतराम वघरे, चंदन घासले, प्रभा वंजारी, आंबागडे, संगीता नागोसे, नंदागवळी, ग्रामसेवक किशोर वैष्णव आणि नागरिक,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्रातील ध्वजारोहण डॉ. पटले यांचे अध्यक्षतेत जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांचे हस्ते करण्यात आले. तालुक्यात अनेक ठिकाणी प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा केल्याचे वृत्त आहे.

Saturday 27 January 2018

कोल्हापूरनजीक झालेल्या बस अपघातात 13 ठार


13 people killed in road accident in Kolhapur | कोल्हापूर बस अपघातात पुण्यातील वरखडे, केदारी, नांगरे नातेवाईक परिवारातील १३ जणांचा मृत्यू

कोल्हापूर / वाकड,दि.27 - गणपती पुळ्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी मिनी ट्रॅव्हल्स कोल्हापूर येथील शिवाजी पुलाच्या कठड्याला धडकून पंचगंगेच्या पात्रात कोसळली. या अपघातामध्ये पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याच्या अंबडवेट , बालेवाडी आणि पिरंगुट येथील १६ प्रवाशांपैकी 13 जण जागीच ठार झाले असून ३ जखमी गंभीर जखमी झाले आहेत.  कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये हिंजवडीतील पत्रकार विजय वरखडे यांचे मोठे बंधू आणि दोन पुतण्या यांच्यासह अन्य नातेवाईकांचा समावेश आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास घडली
 मृतांमध्ये  संतोष बबनराव वरखडे (वय ४५), गौरी संतोष वरखडे (१६) ज्ञानेश्वरी संतोष वरखडे (१४),वाहनचालक  महेश लक्ष्मण कुचेकरचाही (वय ३२) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. विजय वरखडे यांची भावजय मनिषा संतोष वरखडे (वय ३८, रा सर्वजण पिरंगुट) अपघातातून सुखरूप बचावल्या आहेत. यातील अन्य मृत व्यक्ती संतोष वरखडे यांच्या सासरवाडीतील पाहुणे होते. जोडून आलेल्या सलग सुट्ट्यामुळे त्यांनी गणपतीपुळे ट्रिपचे आयोजन केले होते.
काही तरुणांनी ही घटना पाहताच नदी पात्राकडे धाव घेतली आणि मदतकार्य सुरु केले. या तरुणांमुळे तीन जणांचे प्राण वाचले. पहाटे तीन वाजेपर्यंत बचावकार्य सुरु ठेवत पोलीस, महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी मिनी ट्रॅव्हल्स वर काढली. 

Friday 26 January 2018

सेल्फीच्या नादात इटियोडोह धरणात दोन युवकांना जलसमाधी

अर्जूनी मोर,दि.26- प्रजासत्ताकदिनी कुरखेडा येथील दोन युवकांना इटियाडोह धरणात सेल्फी काढत असताना जलसमाधी मिळाल्याची घटना आज (दि.26) दुपारी घडली.
जलसमाधी मिळालेल्यांमध्ये  कुरखेडा येथील परवेज रामदास गोटेफोडे व एजाज सेख या दोन युवकांचा समावेश आहे.
सविस्तर असे की, कुरखेडा वरून हे दोन युवक प्रजासत्ताक दिनी पर्यटनासाठी गोठणगाव येथे आले. हे दोन्ही युवक इडियाडोह धरणावर गेले असता त्यांना सेल्फी घेण्याचा मोह झाला. सेल्फी घेण्याच्या नादात या दोन्ही युवकांचा तोल गेल्याने त्यांच्यावर जीव गमावण्याची वेळ आली.  या दोघांच्या मृतदेहावर केशोरी प्राथमिक आरोग्य केद्रात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आले. पुढील तपास केशोरी पोलिस करीत आहेत.

सुकळी येथे दुधातून 40 विद्यार्थ्यांना विषबाधा

प्रजासत्ताक दिनी घडली घटना
विद्यार्थ्यांची प्रकृती नियंत्रणात

साकोली,दि.26- प्रजासत्ताकदिनी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या दुधातून सुमारे 40 विद्यार्थ्यांनी विषबाधा झाल्याची घटना साकोली तालुक्यातील सुकळी(महालगाल) येथे घडली.
 सविस्तर असे की, साकोली तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिना निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर गावकऱ्यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना पिण्यासाठी दुधाचे वाटप करण्यात आले. हे दूध प्यालानंतर विद्यार्थ्यांनी ओकाऱ्या येऊन त्यांची प्रकृती बिघडल्याने शिक्षख आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या सर्व बाधित विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी साकोली येथे हलविण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.

मोहगाव येछे प्रजासत्ताक दिन साजरा

गोंदिया,दि.26 -  गोरेगाव तालुक्यातील मोहगावच्या परशुराम विद्यालयात आज देशाचा 69 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्या राणीबाई राहांगडाले ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच हेमलता हरिणखेडे ह्या उपस्थित होत्या . ध्वजारोहण  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुणीलाल बिसेन यांचे हस्ते करण्यात आले.
 या प्रसंगी शालेचे मुख्याध्यापक श्री.बी.डब्लु.कटरे,गावातील प्रतिष्ठीत नागरीक,शालेतील सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण

बिलोलीच्या अल ईम्रान प्रतिष्ठाण ला उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार 
Add caption
नांदेड,दि.26-भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र नांदेड च्या वतीने पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते २६ जानेवारी २०१८ रोजी प्रजासत्ताक दिनी अल ईम्रान प्रतिष्ठाण बिलोली या संस्थेला उत्कृष्ठ युवा मंडळ पुरस्कार देऊन गौरविण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष इम्रान खान पठाण  यांनी स्वीकारला हा कार्यक्रम पोलीस परेड ग्राउंड या ठिकाणी पार पडला. यावेळी नेहरू युवा केंद्राचे लेखाधिकारी कुलदिपसिह शाहू यांची उपस्थिती होती.                  
 सामाजिक, शैक्षणिक,कला,क्रिडा, सांस्कृतीक, आरोग्य आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थेला नेहरू युवा केंद्राच्या वतीने पुरस्कार देण्यात येतो. सन २०१६-२०१७ या वर्षीचा उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कारासाठी अल ईम्रान प्रतिष्ठाण बिलोली या संस्थेची निवड  कार्यालयाच्या वतीने करण्यात आली होती सदरिल पुरस्कार वितरण प्रजासत्ताक दिनी पोलिस परेड मैदान, पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पाठीमागे मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते व खा. अशोक चव्हाण, आ. डी.पी. सावंत, आ.अमर राजुरकर, आ. हेमंत पाटील आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी अनेक  पदाधिकारी,अधिकारी तसेच असंख्य जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी - पालकमंत्री राजकुमार बडोले

68 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
गोंदिया,दि.26 : जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध घटकातील लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून येत आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाचा 68 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर 26 जानेवारी रोजी करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, आधुनिक भारताला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे भारतीय राज्यघटना होय. या राज्यघटनेमुळेचे देशाला लोकशाही व्यवस्था मिळाली आहे. समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यघटनेत विविध तरतुदी करण्यात आल्या आहे.
पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख असलेल्या आपल्या राज्याला अनेक संत समाजसुधारकांनी दिशा देण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील वंचित व दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सुरु करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.बडोले पुढे म्हणाले, जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या विकासासाठी 4 कोटी 63 लक्ष रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून रमाई आवास योजनेतून यावर्षी 5 हजार घरकुले बांधण्यात येणार आहे, तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 10360 घरे व शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत 467 घरकुले बांधण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 84272 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले. त्यापैकी 45 हजार 713 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून शेवटच्या पात्र शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील पर्यटन व तीर्थस्थळाच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, यावर्षी 1 कोटी 35 लक्ष रुपये तसेच जिल्ह्यातील क वर्ग पर्यटन व तीर्थस्थळाच्या विकासासाठी 4 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटन व तीर्थस्थळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात येण्यास मदत होणार असल्यामुळे त्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलक्रांती घडण्यास मदत होत असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले,
यावर्षी जलयुक्तमध्ये 63 गावांची निवड करण्यात आली असून 434 कामे पूर्ण झाली आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत 567 उमेदवारांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणासाठी माविमच्या पुढाकारातून जिल्ह्यातील 62 हजार 486 महिला 5043 बचतगटाच्या माध्यमातून संघटीत झाल्या असून अनेक महिलांनी उद्योग व्यवसायाला सुरुवात केली आहे. रोहयोच्या माध्यमातून डिसेंबरअखेर 1 लाख 27 हजार कुटूंबांना रोजगार पुरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 
यावेळी पालकमंत्र्यांनी ध्वजारोहणानंतर परेडचे निरीक्षण केले. परेड कमांडर म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते सहभागी होते. परेडमध्ये पुरुष पोलीस पथक, महिला पोलीस पथक, शीघ्र कृती दल, दंगा नियंत्रण पथक, जिल्हा वाहतूक शाखा, पुरुष व महिला होमगार्ड, विशेष व्याघ्र जंगल पथक, राष्ट्रीय छात्रसेना पथक, महाराष्ट्र छात्रसेना पथक, राज्य राखीव दल, स्काऊट-गाईड पथक, बँड पथक, बिट मार्शल पथक, निर्भया पथक, फिरते न्यायवैदयक पथक, श्वान पथक, बाँब शोधक पथकाचा समावेश होता. तसेच आपातकालीन वैद्यकीय सेवा, जलद बचाव दल, जि.प.आरोग्य विभाग चित्ररथ, सामाजिक वनीकरण विभाग चित्ररथ, जि.प.सर्व शिक्षा अभियान चित्ररथ, जलयुक्त शिवार चित्ररथ, अग्नीशमन दल, पब्लीक स्कूल वन बचाव, आदर्श कॉन्व्हेंट पथक, मिलिटरी स्कूल पथक यांनीही यामध्ये सहभाग घेतला.
कार्यक्रमाला आमदार गोपालदास अग्रवाल, माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, जि.प.आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, अपर पोलीस अधीक्षक संदिप आटोळे, जि.प.अपर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गावडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अपुर्व पावडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, कर्मचारी, शालेय विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती मंजुश्री देशपांडे यांनी केले.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये गुरुनानक वरिष्ठ प्राथमिक शाळा गोंदियाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानावर, राजस्थान कन्या शाळेच्या विद्यार्थीनींनी ओडीसी लोकनृत्य व जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा मुंडीपारच्या विद्यार्थीनींनी व्यक्तीमत्व विकासाच्या दृष्टीने शो ड्रील सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार


गोंदिया,दि.26 : पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये तनुज मेश्राम, प्रभुदास बन्सोड यांचा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार डॉ.अमीत बुध्दे, जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक दुलिचंद मेश्राम, जिल्हा गुणवंत महिला खेळाडू पुरस्कार निलम अवस्थी, जिल्हा गुणवंत खेळाडू रुपेश साखरे, जिल्हा गुणवंत दिव्यांग खेळाडू पुरस्कार महेश हरिणखेडे यांना, जिल्हास्तरीय युवा पुरस्कार संस्था वर्गातून पहांदी पारो कुपार लिंगो, बहुउद्देशीय संस्था खर्रा, जिल्हास्तरीय युवा पुरस्कार प्रमोद गुडधे व पुजा तिवारी यांना, रशिया-इंडिया युथ फोरममध्ये भारतातर्फे सहभागी होवून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जतीन वहाणे यांना, आरोग्य क्षेत्रात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉ.धीरज लांबट, निशांत बन्सोड, संजय बिसेन, डॉ.योगेश पटले, अजित सिंग, प्रशांत तिरपुडे यांना, राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 25 मीटर रायफल शुटींग स्पर्धेत सिल्वर मेडल मिळाल्याबद्दल श्रीमती निलीमा भूजबळ-पाटील यांचा, विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच प्रबोधनात्मक कामगिरी केल्याबद्दल आमगावचे सेवानिवृत्त प्राचार्य श्यामराव बहेकार यांचा, नेहरु युवा केंद्राचा जिल्हास्तरीय युवा मंडल पुरस्कार बहुउद्देशीय शिक्षण संस्था मेंगाटोला यांचा, सन 2017-18 या वर्षात राष्ट्रपती पुरस्कार चाचणी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल 17 स्काऊट व 14 गाईड विद्यार्थ्यांचा, राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत सन 2016-17 या वर्षात सर्वात जास्त पुरुष शस्त्रक्रिया करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.सी.वानखेडे, डॉ.एस.एल.झोडे, डॉ.राधेश्याम पाचे, डॉ.डी.डी.रायपुरे यांचा, पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लागवड अधिकारी वाय.के.कुंभलकर यांचा, तायक्वांडो स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल उदय रहांगडाले व तुषार हत्तीमारे यांचा, सशस्त्र ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सैनिक कल्याण संघटक सुभेदार मेजर जगदिश रंगारी यांचा, सडक/अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील स्वयंप्रेरणेने नियमीत स्वच्छ ग्राम करणाऱ्या युवक-युवतींचा, माविमच्या उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्र गोंदिया व प्रेरणा ग्रामसंस्था भिवापूर यांचा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत सन 2017-18 या वर्षात उत्कृष्ट काम करणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र भांडारकर, सहायक वनसंरक्षक एम.एच.शेंडे, वनसंरक्षक एम.आर.शेख, नायब तहसिलदार पी.एस.बिसेन, सहायक कार्यक्रम अधिकारी आर.पी.शहारे, कार्यक्रम व्यवस्थापक एम.एस.साखरे, निवडणूक कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल श्रीमती आर.आर.मलेवार यांचा पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देवून पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Wednesday 24 January 2018

मोहसीनचा संघर्ष जिंकला, वीटभट्टीवर काम करुन सीए झाला!

वयाच्या पाचव्या वर्षापासून वीटभट्टीवर काम करणारा तरुण चार्टड अकाऊटंट अर्थात सीए झाला आहे

लातूर: लातूरच्या मोहसिन शेख या 25 वर्षाच्या तरुणानं एक इतिहास घडवला आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून वीटभट्टीवर काम करणारा हा तरुण चार्टड अकाऊटंट अर्थात सीए झाला आहे.

पहाटे पाच वाजता उठायचं...सात वाजेपर्यंत काम करायचं...सात वाजता अर्धा किलोमीटर अंतरावरच्या शाळेत चालत जायचं. साडे बारला जेवण संपवून 1 ते रात्री 9 पर्यंत वीटभट्टीवर काम. दहा ते दोन अभ्यास, अशा कठीण परिस्थितीत मोहसिननं मिळवलेलं यश जबरदस्त आहे.

त्याची बुध्दी पाहून शिर्डीच्या साई बाबा मंदिराचं ऑडिट करणाऱ्या सीए फर्मनं मोहसिनला पार्टनर केले आहे.

मोहसिनचा संघर्ष

शेख कुटुंबात अठरा विश्व दारिद्र्य. मोहसिनचे वडील दारुच्या आहारी, आई आणि भाऊ- बहिणी वीट भट्टीवर काम करुन पोट भरतात. मोहसिनला समज येऊ लागली तेव्हापासून तोही आईच्या साथीने वीटभट्टीवरच कामाला लागला.

घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मोहसिनला मावशीकडे पाठवलं. मावशीची परिस्थितीही फार ग्रेट होती असं नाही. मावशीही वीटभट्टीवरच काम करते. मोहसिनचं बालपण मावशीकडेच गेलं.

पहाटे पाच वाजता उठायचं...सात वाजेपर्यंत वीटभट्टीवर काम करायचं...सात वाजता अर्धा किलोमीटर अंतरावरच्या शाळेत चालत जायचं. साडेबारापर्यंत शाळा करुन एक वाजता वीट भट्टीवर यायचं. मग 1 ते 9 काम करायचं. रात्री दहाला घरी पोहोचल्यावर रात्री 2 पर्यंत अभ्यास करायचा, असा संघर्ष मोहसिनच्या यशामागे आहे.

 “ज्यादिवशी पाऊस पडायचा तो माझ्यासाठी आनंदाचा दिवस असायचा. कारण त्यादिवशी वीटभट्टीवर काम नसायचं. पण त्यादिवशी वीटा वाहून नेण्याचं काम करावं लागत असे. आजही आई-मावशी तेच काम करतात.

आई, भाऊ, मावशी यांना माझ्याबद्दल सकारात्मकता वाटायची. मी काही तरी करुन दाखवेन असं त्यांना नेहमी वाटत असे. त्यामुळे त्यांनी मला हवी ती मदत केली. सीएच्या नोंदणीसाठी माझ्याकडे पैसे नव्हते, तेव्हा भावाने एन्गेजमेंट रिंग विकून पैसे दिले, असं मोहसिन सांगतो.

एखाद दिवशी काम खूप असेल तर शाळेत जाऊ नकोस असं मावशी सांगायची. पण त्यादिवशी मला खूप वाईट वाटायचं, मी जेवत नसे, नाराज असे, असं मोहिसनने सांगितलं.

खर्च कमी असतो त्यामुळे सीएचं क्षेत्र निवडलं. या काळात मला अनेकांनी मदत केली, त्यामुळेच आजचं यश पाहू शकतो, असं तो म्हणाला.

चार वर्षापूर्वी जेव्हा तयारी सुरु केली, तेव्हा अनेक प्रस्थापित सीएंनी मोहसिनकेड तुच्छतेने पाहिलं. अंथरुण पाहून पाय पसरावं, असं सीएंनी मोहसिनला सुनावलं. मात्र मी सचिन शिंदे सरांची फर्म जॉईन केली, तेव्हा त्यांनी मला दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी सांगितलं, तुझं भविष्य उज्ज्वल आहे, तू ज्या दिवशी सीए होशील, त्यादिवशी तुला मी माझ्या फर्ममध्ये पार्टनर म्हणून घेणार, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं, तो शब्द त्यांनी पाळला, असं मोहसिन म्हणाला.

ब्लॉसम स्कुल तर्फे देवरी बस स्थानकाला नवीन समय सारणी भेट


देवरी: 24जाने.
ब्लॉसम पब्लिक स्कूल तर्फे देवरी बस स्थानकाला नवीन समय सारणी भेट देण्यात आली यावेळी *संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल, बस स्थानक व्यवस्थापक जि. बी.वाडीवा , मुख्याध्यापक सुजित टेटे सहा. शिक्षक नितेश लाडे, अजित टेटे* सह प्रवाशी उपस्थित होते. ग्रामीण भागातून ये जा करणाऱ्या प्रवाशानां समय सारणी चा उपयोग करून योग्य बस पकडता यावी या उद्देशाने सदर उपक्रम राबविला.
विध्यार्थी तसेच्या बाहेरील प्रवाशी या समय सारणी चा लाभ घेतील आणि योग्य बस पकडून वेळेवर प्रवास पूर्ण करतील यावेळी वाडीवा बोलत होत

Berartimes_24-30_JAN_2018





Tuesday 23 January 2018

बनावट दारूच्या कारखान्यावर धाड; देशीला विदेशीचे लेबल


नागपूर,दि.23 : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनावट दारूच्या कारखान्यावर रविवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. या कारखान्यात देशी (संत्रा) दारूमध्ये वेगळे रसायन मिसळवून ती विदेशी दारूच्या बाटल्यात भरली जात होती. पोलिसांनी तेथून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
बहादुराच्या टेकअप सिटीत वर्धा जिल्ह्यातील पराग पुरुषोत्तम पिंजरकर (वय ३२, रा. हिंगणघाट) आणि सोनल कोल्हटकर (रा. भद्रावती, जि. चंद्रपूर) हे दोघे मागच्या वर्षीपासून बनावट दारू तयार करण्याचा कारखाना चालवित होते. संत्रा दारूच्या बाटल्या रिकाम्या करून त्यात विशिष्ट रसायन मिसळायचे. त्याची चव आणि रंग बदलल्यानंतर ती वेगवेगळ्या बाटल्यात भरायचे. त्या बाटल्यांवर विदेशी कंपनीच्या मद्याचे लेबल चिपकवायचे आणि त्या बाटल्या बॉक्समध्ये भरून बाजारात विकायच्या, असा त्यांचा गोरखधंदा सुरू होता. ही माहिती कळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ढेरे, सहायक निरीक्षक धर्मेंद्र आवारे, उपनिरीक्षक सुनील राऊत, हवलदार राजेश यादव, अरुण चांदणे, रवी शाहू, मंगेश लांडे, प्रितम ठाकूर, नावेद शेख आणि फराज खान यांनी रविवारी सायंकाळी या कारखान्यावर छापा मारला. यावेळी आरोपी सोनल कोल्हटकर पळून गेला. पराग पिंजरकरला अटक करून पोलिसांनी कारखान्यावर असलेली देशी दारू, बॉटल पॅकेजिंगचे साहित्य, मिनरल वॉटरचे बॉक्स आणि विविध कंपन्यांचे लेबल तसेच उपकरणे असा एकूण २ लाख, ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पिंजरकरला अटक करण्यात आली असून, फरार कोल्हटकरचा शोध घेतला जात आहे.

शिवसेनेत अाज मोठे फेरबदल



मुंबई,दि.23(वृत्तसंस्था)-युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी वर्णी लागण्याचा मार्ग मोकळा झाला अाहे. मंगळवारी शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी होणाऱ्या शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. तसेच शिवसेनेच्या स्थापनेपासून काम करणारे नेते मनोहर जोशी, सुधीर जोशी आणि लीलाधर डाके या ज्येष्ठ नेत्यांची मार्गदर्शकपदी निवड केली जाणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.
निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना पाच वर्षांनी निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक होणार असून त्यात शिवसेना पक्षप्रमुखांसह अन्य नेत्यांच्या नेमणुका आयोगाच्या आदेशानुसार केल्या जाणार आहेत. पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांचीच फेरनिवड होणार असून अन्य नेत्यांच्या निवडीबाबत बैठक मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. यात मनोहर जोशी, संजय राऊत, लीलाधर डाके, सुधीर जोशी, सुभाष देसाई, दिवाकर रावते, गजानन कीर्तिकर आदी उपस्थित होते.गेले काही दिवस आदित्य ठाकरे यांना शिवसेना नेतेपदी निवडण्याबाबत चर्चा सुरू होती. सोमवारी झालेल्या बैठकीत सर्वच नेत्यांनी त्यांची नेतेपदी निवड करण्यास मंजुरी दिल्याचे समजते. तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि गटनेते अनिल परब यांनाही नेतेपद देण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. खासदार संजय राऊत यांनी बैठकीबाबत माहिती देताना मंगळवारी होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीबाबत चर्चा झाल्याचे सांगितले.

व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली कीड-सत्यपाल महाराज

नवेगावबांध,दि.21: व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली मोठी कीड आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक तरुण वाईट मार्गाला लागत आहे. गावातील अवैध धंद्यामुळे वातावरण कलुषीत होवून तंटे निर्माण होतात. यासर्व प्रकारामुळे महिलांमध्ये असुरक्षीतेची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे गावकºयांनो गावातून अवैध धंदे बंद करण्याचा आणि व्यसन न करण्याचा संकल्प करा. तंटेच निर्माण होणार नाही असे आदर्श गाव निर्माण करा, असा महत्त्वपूर्ण संदेश प्रसिध्द सप्त खंजरी वादक सत्यपाल महाराज यांनी येथे आयोजित कार्यक्रमात गावकऱ्यांना दिला.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील आदिवासी बहूल भागातील गोठणगाव येथे सुजल बहुउद्देशिय सामाजिक सेवा समिती नवेगावबांध व तंटामुक्त ग्राम समिती गोठणगाव आणि ग्रामपंचायत गोठणगाव यांच्यातर्फे शुक्रवारी (दि.१९) प्रसिध्द सप्त खंजरी वादक सत्यपाल महाराज यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते.आयोजकांच्या वतीने सत्यपाल महाराजांचा शाल व श्रीफळ देऊन मनोहर चंद्रीकापुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच समाजात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारे रामदास बोरकर, दुर्योधन मैंद, विजय डोये, राधेश्याम तरोणे, शकुंतला वालदे, गोवर्धन बडवाईक, अरुण ढवळे, राकेश वट्टी, हिरामन नंदनवार, राजू फुंडे, विलास राऊत, संदीप येरणे, चिंतामन शिवणकर, भाऊदास गायकवाड, ओमप्रकाश येळे, पप्पू पवार, चिंतामन हटवार, हरिचंद मेश्राम, नरेंद्र कोडापे, जिजा चांदेवार, शारदा नाकाडे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रधर्म प्रचारक समिती, गुरूदेव सेवा मंडळाने राष्ट्रसंतांची सामुदाईक प्रार्थना सादर केली. यानंतर बाल व्याख्यानकार संजीवनी कृष्णकांत खोटेले हिचे व्याख्यान झाले. जि. प. सदस्य गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रीकापुरे, रतिराम राणे, सुशीला हलमारे, योगेशजी नाकाडे, लोकपाल गहाणे, सरपंच जिजाबाई चांदेवार, तंमुस अध्यक्ष नरेंद्र कोळापे, पोलीस पाटील कारुसेना सांगोळे, किशोर तरोणे उपस्थित होते.सत्यपाल महाराज म्हणाले, युवकांनो राजकारणाकडे वळण्यापेक्षा शिक्षण घेऊन चाकरीकडे वळा. माय लेकीनों पुस्तके वाचा, सावित्री जिजाई, भिमाई व रमाई बना, त्याशिवाय शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडणार नाहीत. परंतु शोकांतिका आहे, माय लेकी हो आपण पुस्तके, ग्रामगीता व संविधान वाचत नाही. त्यामुळे समाजाची प्रगती होत नाही. शिक्षणाच्या अभावामुळे अंधश्रध्दा, भ्रुण हत्त्येवर विश्वास ठेवला जातो. त्यामुळे समाजाची प्रगती खुंटते, त्यामुळे अंधश्रध्दा मानू नका, भ्रुण हत्या करु नका, मुला पेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी या म्हणी प्रमाणे खास करुन माय लेकींनो भ्रुण हत्त्येला विरोध करा. असा संदेश सत्यपाल महाराजांनी दिला.

भारताचा ओसामा बिन लादेन दिल्ली पोलिसांच्या ताब्यात



नवी दिल्ली ,दि.२२(वृत्तसंस्था)- दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सोमवारी दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवाद्याला अटक केली आहे. पोलिसांनी दहशतवादी अब्दुल सुभान कुरैशी असल्याचे म्हटले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे, की 2008 मध्ये गुजरात बॉम्बस्फोटातील तो आरोपी आहे. त्याच्या बॉम्ब तयार करण्याचा आरोप आहे.
पोलिस कुरैशीचा बऱ्याच वर्षांपासून शोध घेत होते. मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश आहे. 2008 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा तो मास्टरमाइंड होता.रिपोर्ट्सनुसाह कुरैशी हा बॉम्ब तयार करण्यात तरबेज आहे. त्याला भारताचा ओसामा बिन लादेन म्हटले जाते. सिमीशीही त्याचे संबंध राहिले आहेत. कुरैशीला अटक करण्यापूर्वी पोलिसांची त्याच्यासोबत चकमक झाली. 9 एमएमची पिस्तूल आणि 5 काडतूस कुरैशीकडे सापडले आहेत.
गुजरातमध्ये झाले होते 21 साखळी बॉम्बस्फोट
– 26 जुलै 2008 रोजी अहमदाबाद येथे 70 मिनिटांमध्ये 21 बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जखमी झाले होते.11 जुलै 2006 रोजी मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या स्फोटात 200 जण मृत्यूमुखी पडले होते. 700 लोक जखमी झाले होते.

यामुळे म्हणतात भारताचा ओसामा…
– अब्दुल सुभान कुरैशी उर्फ तौकीर हा उच्च शिक्षित आहे. त्याने इंजिनिअरिंग केले असून त्याचे टेक्निकल नॉलेज चांगले आहे. कुरैशीचे शिक्षण चांगल्या इंग्रजी शाळेतून झाले होते. मुंबईत त्याने शिक्षण घेतले आणि अनेक चांगल्या कंपन्यांमध्ये काम केले. 1996 मध्ये रॅडिकल सोल्यूशनमध्ये काम केले होते. तिथे त्याला 2450 रुपये पगार होता.
-1996 मध्ये मरोळमध्ये सॉफ्टवेअर मेंटनन्सचे काम केले.1998 मध्ये नोकरी सोडून पूर्णवेळ सिमी दहशतवादी संघटनेत काम करत होता.2003 मध्ये मुजाहिद्दीनच्या टॉप मेंबर्समध्ये कुरैशीचा समावेश.अब्दुल कुरैशीला दोन मुली आणि एक मुलगा असल्याची माहिती आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अब्दुल कुरैशीला भारताचा ओसामा बिन लादेन संबोधत त्याच्यावर 4 लाखांचे बक्षिस जाहीर केले होते.

विरली गावाने केला प्लास्टिक बंदीचा निर्धार

लाखांदूर,दि.23 : उघड्या हागणदारीच्या जागेची स्वच्छता व सौंदर्यीकरण करून लाखांदूर तालुक्यातील विरली ग्रामपंचायत याआधी नावारूपास आली आहेच. या गावाने आता २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनापासून प्लास्टिक बंदीची मुहूर्तमेढ रोवण्याचे ठरवले आहे.
ग्रामसभेमध्ये प्लास्टिक बंदीचा ठराव घेवून यावर शिक्कामोर्तब करण्यात येवून त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर २६ जानेवारी पासूनच गावात होऊ घातलेल्या भागवत सप्ताहात महा प्रसादासाठी उपयोगात येणा-या प्लास्टीक पत्रावळीचा वापरही टाळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
गावात भविष्यात होणाऱ्या लग्न समारंभात प्लास्टिक पत्रावळीचा वापर होऊ नये याकरिता विवाह निश्चित करणाऱ्या कुटूंबांसोबत संवाद साधून वापर टाळण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय सरपंच लोकेश भेंडारकर व त्यांच्या ग्रामपंचायत चमूने घेतलेला असून २६ जानेवारीला तसा ठराव घेण्यात येत आहे.

विद्यार्थी-शिक्षक संघटनांचा आंदोलनाचा इशारा

मुंबई दि.23(विशेष प्रतिनिधी)- पटसंख्या आणि गुणवत्तेचे कारण पुढे करून 15 वर्षांत राज्यातील 80 हजार शाळा बंद करण्याची घोषणा करणाऱ्या राज्याच्या शिक्षण विभागाविरोधात विद्यार्थी-शिक्षक संघटनांनी एल्गार पुकारला आहे. येत्या अर्थसंकल्पी अधिवेशनात राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र विद्यार्थी शिक्षक नागरी कृती समितीने दिला आहे.
पटसंख्या आणि खालावलेल्या गुणवत्तेला शिक्षण विभागच कारणीभूत असल्याचा आरोप विद्यार्थी शिक्षक नागरी कृती समितीने केला. मुंबई मराठी पत्रकार संघात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत, राज्यातील एकही शाळा बंद होऊ देणार नाही, असा निर्धार कृती समितीने केला. शिक्षण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळेच राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता ढासळली आहे. शिक्षणमंत्र्यांनी कोणत्या विद्यापीठातून डिग्री घेतली हे सर्वप्रथम जाहीर करावे, असे आव्हानही “ऑल इंडिया युथ फेडरेशन’च्या गिरीश फोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिले.

नागपूरचे ५० युवक इंग्लंडमध्ये बेपत्ता

नागपूर,दि.23 – बनावट पासपोर्ट व व्हिसा तयार करून नोकरीसाठी इंग्लंडमध्ये पाठविलेले ५० युवक बेपत्ता झाले आहेत. पोलिसांनी मुलांना इंग्लंडमध्ये नेणाऱ्या दहा जोडप्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, रात्री उशिरा सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामागे मानवी तस्करीची शक्‍यता वर्तविली जात आहे.

ब्लॉसम स्कुलच्या विद्यार्थ्यांची मशरूम उत्पादन केंद्राला भेट


देवरी: 23जाने.
स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कुल आपल्या निरनिराळ्या शैक्षणीक उपक्रमासाठी चर्चेत असते. आज पुन्हा एक नवीन उपक्रमा अंतर्गत शिक्षक आणि विध्यार्थ्यांनी देवरी पासून 7किमी अंतरावर असलेल्या सीलापूर गावातील मशरूम उत्पादन केंद्राला मुख्याध्यापक सुजित टेटे , सहा. शिक्षक नितेश लाडे, हर्षदा चारमोडे, वैशाली मोहुर्ले यांच्या मार्गदर्शनात भेट दिली.
सदर परिसर भेट विज्ञान विषयाला अनुसरुन आयोजित केली होती. मशरूम उत्पादन केंद्रात मनीष राऊत यांनी विध्यार्थ्यांना सविस्तर माहिती, प्रात्यक्षिक आणि मशरूम चे आहारातील महत्व पटवून सांगितले. 12 वी पास असलेला मनीष आपल्या परिस्थिती वर मात करून आज तीन प्रकारचे मशरूम बाजारात विकतो. दर महिन्याला 20ते 25 हजार रुपयांचा नफा कमावत असल्याचे त्याने सांगितले सदर परिसर भेटीतुन विध्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. विषयातील संकल्पना प्रत्येक्षात समजली.
सदर परिसर भेटी मध्ये इयत्ता 6वी ते 8वी चे विध्यार्थी सहभागी झाले होते.

परिसर भेटीच्या यशासाठी शिक्षक  आणि विध्यार्थ्यांनी सहकार्य केला.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...