गोंदिया,दि.०६ः- भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधासाठी आयोजित बंददरम्यान झालेल्या भाषणबाजीवरुन शुध्दोदन शहारे यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा केलेला आरोप हा बिनबुडाचा असून आम्ही त्यांच्याघरी मित्र म्हणून गेलो होतो.त्यांच्याघरी झालेल्या चर्चेच्यावेळी चहाबिस्कीट घेतल्यानंतर आम्ही राजकुमार बडोले आपल्या भाजपचे नेते असून त्यांंच्याबदद्ल आपण नारेबाजी करायला नको होते असेच त्यांना म्हणत बंद यशस्वी झाल्याबद्दल चर्चा केल्याचे सांगत शहारेंनी लावलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याची माहिती धनजंय वैद्य यांनी आज पत्रपरिषदेत दिली.यावेळी रतन वासनिक,श्याम चौरे,अजित मेश्राम,बसंत गणवीर,शालिनी डोंगरे व अंजली जांभूळकर उपस्थित होत्या.वैद्य म्हणाले की शहारे हे आजही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असून पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी त्यांचे वैयक्तिक मतभेद असू शकतात.कारण त्यांनी विधानसभेची तिकीट मागितली ती मिळाली नाही त्यानंतर जिल्हा परिषदेचे उमेदवारी मागितली ती सुध्दा मिळाली नाही,त्याचा राग म्हणून त्यांनी आरोप केला असून त्यांच्यामाध्यमातून कुणीतरी राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे म्हणाले.सोबतच शहारे यांना भाजपमधून व केंद्रीय श्रम व कामगार मंत्रालयाच्या समितीवरील अशासकीय सदस्य पदापासून हटविण्याची मागणी पक्षाच्या वरिष्ठाकंडे करण्यात आल्याची माहिती देत.त्यांच्या जोशाबा संस्थेची चौकशी करुन सिकलसेलसह प्रशिक्षण कार्यक्रमाची सखोल चौकशीची मागणी केली आहे.वैद्य यांनी आपण ना.बडोले यांचे पी.ए.नसल्याचे सांगत भाजपचा कार्यकर्ता आहे.आणि आमच्यावर दारु प्यालाचा जो आरोप करण्यात आला आहे,तो निराधार आहे.शहारे यांनी आपण भाजपमध्ये नसल्याचे सांगितले परंतु त्यांनी भाजपचा राजीनामा कधी दिला व त्यांच्याकडे ऑडियो व व्हिडीओ आम्ही धमकावल्याचा असेल तर तो दाखवावा असे म्हणत आमच्यावर दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही सर्व पोलिसांच्या चौकशीला तयार असल्याची माहिती पत्रपरिषदेत दिली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
No comments:
Post a Comment