Wednesday, 31 January 2018

सेवानिवृत्त शिक्षिकेची गळा आवळून हत्या

अमरावती,दि.31 : सेवानिवृत्त शिक्षिकेची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी येथील जलारामनगरात घडली.
शैलजा ओमप्रकाश निलंगे (६१) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. त्या समर्थ हायस्कूलमधून निवृत्त झाल्या होत्या. सहा खोल्यांच्या घरात त्या एकट्याच राहत होत्या. काही खोल्या त्यांनी भाड्याने दिल्या होत्या. त्यांचा मुलगा अक्षय निलंगे अमरावती महापालिकेत स्थायी समिती सभापतींचे स्वीय सहायक म्हणून कार्यरत आहे. बुधवारी सकाळी त्यांचा भाडेकरू शिंदे (२३, रा. आसेगावपूर्णा) फाटक उघडण्यासाठी गेला असता, त्याला कुलूप दिसले. त्याने दार ठोठावून व बेल वाजवून शैलजा निलंगे यांना आवाज दिला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने तो जवळच राहणाऱ्या  निलंगे यांच्या बहिणीकडे गेला.
दरम्यान, शेजाऱ्यांनी शैलेजा निलंगे यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता, त्यांचा मृतदेह बेडरूममध्ये आढळून आला. उशीने तोंड दाबून व गळा आवळून हत्या झाल्याने त्यांच्या तोंडातून रक्तस्राव होत असल्याचे घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी फे्रजरपुरा पोलिसांनी भाड्याने राहणाऱ्या  सहा संशयितांना चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...