नवी दिल्ली(वृत्तसंस्था) दि.०४ः– २०१७ हे देशातील वाघांसाठी संकटाचे वर्ष ठरले. गतवर्षात देशामध्ये ११५ वाघांचा मृत्यू झाला. ही संख्या याहून जास्तही असू शकते. राष्ट्रीय वाघ संरक्षण महामंडळाच्या अहवालानुसार गतवर्षी ९८ वाघांचे मृतदेह ताब्यात, तर १७ वाघांचे इतर अवयव जप्त करण्यात अाले.वाघांच्या मृत्यूबाबत देशात २०१४मध्ये ‘वाघांचे राज्य’ म्हणून घाेषित झालेले मध्य प्रदेश सर्वाेच्च स्थानावर हाेते. तेथे २९ वाघांचा मृत्यू झाला. वाघांच्या मृत्यूमागे विजेचा धक्का बसणे, शिकार, विषप्रयाेग, परस्परांवर हल्ला, नैसर्गिक मृत्यू किंवा रेल्वे वा रस्ता अपघात ही कारणे सांगण्यात अाली अाहेत. मृत वाघांमध्ये ३२ मादी व २८ नर वाघ असून, उर्वरित वाघांची अाेळख पटलेली नाही.
देशात ६३ %हून अधिक वाघ पाच राज्यांत : देशात एकूण मृत वाघांपैकी ८४ % वाघांचा मृत्यू केवळ पाच राज्यांत झाला अाहे. याच राज्यांत वाघांची ६३ %हून अधिक संख्याही अाहे. यातील सर्वात जास्त वाघ कर्नाटकात असून, सर्वाधिक वाघांचा मृत्यू मध्य प्रदेशात झाला अाहे.या वर्षी पुन्हा देशभरात वाघांची गणना हाेईल; परंतु या वेळी पारंपरिकएेवजी उच्च तंत्रज्ञानाचा वापर हाेणार अाहे. त्यामुळे वाघांची वास्तविक संख्या कळेल. त्यासाठी वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट अाॅफ इंडियाने ‘एम-स्ट्राइप्स’ नावाचे एक अॅप तयार केले अाहे. त्यात पावलांचे ठसे, क्षेत्र व वाघांच्या परिसरात मानवी हालचालींची नाेंद होईल.
No comments:
Post a Comment