Saturday, 6 January 2018

गट्टा-हेडरी मार्गावर आढळली १५ किलो स्फोटके

गडचिरोली, दि,.६: एटापल्ली तालुक्यातील गट्टा-हेडरी मार्गावर गट्टा पोलिस मदत केंद्रापासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर १५ किलो स्फोटके आढळून आली. ही स्फोटके हुडकून काढण्यात पोलिसांना यश आल्याने मोठा अनर्थ टळला.काल सीआरपीएफ व जिल्हा पोलिस नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना गट्टा पोलिस मदत केंद्राच्या पश्चिमेस २ किलोमीटर अंतरावर जांभिया पुलाजवळ एक वायर दिसला. पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथकाला माहिती दिली. त्याठिकाणी स्फोटके असल्याचे बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या लक्षात आले. त्यांनी बराच वेळपर्यंत स्फोटके काढण्याचा प्रयत्न केला. स्फोटके उशिरा नष्ट करण्यात त्यांना यश आले. ही स्फोटके १५ किलो वजनाची होती.
गट्टा-हेडरी मार्गावरुनच सुरजागड लोहखनिज आणणारे ट्रक ये-जा करीत असतात. या परिसरात पोलिस तैनात असल्याने तेही ये-जा करीत असतात. त्यामुळे पोलिस व खनिज आणणाऱ्या मंडळींचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा हेतू होता. परंतु जवानांनी नक्षल्यांचा प्रयत्न उधळून लावला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...