गोंदिया,दि.11 -भारतीय जनता पक्षाचे गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपला सोड़चिटी दिल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश घेत, घरवापसी केली आहे. काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंबंधीची माहिती ट्विट करण्यात आली आहे. भाजपाच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले काँग्रेसप्रवेश करणार असल्याच्या चर्चादेखील रंगल्या होत्या. दुसरीकडे, काँग्रेसच्या इशाऱ्यावरच नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे, असा आरोप करीत भाजपाने पटोले यांच्या राजीनाम्याचे खापर काँग्रेसवर फोडले आहे.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण,विरोधी पक्षनेते राधाकिष्ण विखे पाटील आदी नेते उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
No comments:
Post a Comment