देवरी,दि.३०,- भारतीय प्रजासत्ताकाचा ६८वा वर्धापनदिन देवरी येथे उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. दरम्यान, स्थानिक जिल्हा परिषद मैदानावर आयोजित शासकीय ध्वजारोहण प्रभारी उपविभागीय अधिकारी विजय बोरुडे यांचे हस्ते करण्यात आले.
स्थानिक जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण प्रभारी उपविभागीय अधिकारी विजय बोरुडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाèया व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यावेळी शांतिसेनेत कार्यरत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये वीरगती मिळालेल्या शहीद संजय क्षीरसागर यांचे पिता बाबूराव क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शहरातील सर्व शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी,कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, वकीलमंडळी, युवा, महिला आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
देवरी पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती सुनंदा बहेकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी मनोज हिरूडकर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी डी बी साकुरे,पंचायत समिती सदस्य, अधिकारी, कर्मचारी, गणमान्य नागरिक, लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
न्यायालयातील ध्वजारोहण न्या. एस ई इंगळे याचे हस्ते करण्यात आले. तालुका पत्रकार भवन येथे पत्रकार संघाचे अध्यक्ष अॅड. प्रशांत संगीडवार यांचे अध्यक्षतेत नगराध्यक्ष यादव पंचमवार यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष सुमन बिसेन,पोलिस ठाणे येथे अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पाटोळे,वनविभाग कार्यालय येथे वनपरिक्षेत्राधिकारी मारबते, मराविम येथे कार्यकारी अभियंता संजय वाकळे, सरस्वती शिशू मंदीर येथे अॅड. प्रशांत संगीडवार याचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तालुक्यातील मुल्ला येथे सरपंच कृपासागर गौपाले यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच सीमा नाईक,सदस्य राजकुमार खोटेले, नेतराम वघरे, चंदन घासले, प्रभा वंजारी, आंबागडे, संगीता नागोसे, नंदागवळी, ग्रामसेवक किशोर वैष्णव आणि नागरिक,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्रातील ध्वजारोहण डॉ. पटले यांचे अध्यक्षतेत जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांचे हस्ते करण्यात आले. तालुक्यात अनेक ठिकाणी प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा केल्याचे वृत्त आहे.
No comments:
Post a Comment