गोंदिया,दि.26 : पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये तनुज मेश्राम, प्रभुदास बन्सोड यांचा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार डॉ.अमीत बुध्दे, जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक दुलिचंद मेश्राम, जिल्हा गुणवंत महिला खेळाडू पुरस्कार निलम अवस्थी, जिल्हा गुणवंत खेळाडू रुपेश साखरे, जिल्हा गुणवंत दिव्यांग खेळाडू पुरस्कार महेश हरिणखेडे यांना, जिल्हास्तरीय युवा पुरस्कार संस्था वर्गातून पहांदी पारो कुपार लिंगो, बहुउद्देशीय संस्था खर्रा, जिल्हास्तरीय युवा पुरस्कार प्रमोद गुडधे व पुजा तिवारी यांना, रशिया-इंडिया युथ फोरममध्ये भारतातर्फे सहभागी होवून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जतीन वहाणे यांना, आरोग्य क्षेत्रात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉ.धीरज लांबट, निशांत बन्सोड, संजय बिसेन, डॉ.योगेश पटले, अजित सिंग, प्रशांत तिरपुडे यांना, राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 25 मीटर रायफल शुटींग स्पर्धेत सिल्वर मेडल मिळाल्याबद्दल श्रीमती निलीमा भूजबळ-पाटील यांचा, विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच प्रबोधनात्मक कामगिरी केल्याबद्दल आमगावचे सेवानिवृत्त प्राचार्य श्यामराव बहेकार यांचा, नेहरु युवा केंद्राचा जिल्हास्तरीय युवा मंडल पुरस्कार बहुउद्देशीय शिक्षण संस्था मेंगाटोला यांचा, सन 2017-18 या वर्षात राष्ट्रपती पुरस्कार चाचणी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल 17 स्काऊट व 14 गाईड विद्यार्थ्यांचा, राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत सन 2016-17 या वर्षात सर्वात जास्त पुरुष शस्त्रक्रिया करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.सी.वानखेडे, डॉ.एस.एल.झोडे, डॉ.राधेश्याम पाचे, डॉ.डी.डी.रायपुरे यांचा, पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लागवड अधिकारी वाय.के.कुंभलकर यांचा, तायक्वांडो स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल उदय रहांगडाले व तुषार हत्तीमारे यांचा, सशस्त्र ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सैनिक कल्याण संघटक सुभेदार मेजर जगदिश रंगारी यांचा, सडक/अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील स्वयंप्रेरणेने नियमीत स्वच्छ ग्राम करणाऱ्या युवक-युवतींचा, माविमच्या उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्र गोंदिया व प्रेरणा ग्रामसंस्था भिवापूर यांचा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत सन 2017-18 या वर्षात उत्कृष्ट काम करणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र भांडारकर, सहायक वनसंरक्षक एम.एच.शेंडे, वनसंरक्षक एम.आर.शेख, नायब तहसिलदार पी.एस.बिसेन, सहायक कार्यक्रम अधिकारी आर.पी.शहारे, कार्यक्रम व्यवस्थापक एम.एस.साखरे, निवडणूक कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल श्रीमती आर.आर.मलेवार यांचा पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देवून पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment