बिलोलीच्या अल ईम्रान प्रतिष्ठाण ला उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार
Add caption |
नांदेड,दि.26-भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र नांदेड च्या वतीने पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते २६ जानेवारी २०१८ रोजी प्रजासत्ताक दिनी अल ईम्रान प्रतिष्ठाण बिलोली या संस्थेला उत्कृष्ठ युवा मंडळ पुरस्कार देऊन गौरविण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष इम्रान खान पठाण यांनी स्वीकारला हा कार्यक्रम पोलीस परेड ग्राउंड या ठिकाणी पार पडला. यावेळी नेहरू युवा केंद्राचे लेखाधिकारी कुलदिपसिह शाहू यांची उपस्थिती होती.
सामाजिक, शैक्षणिक,कला,क्रिडा, सांस्कृतीक, आरोग्य आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थेला नेहरू युवा केंद्राच्या वतीने पुरस्कार देण्यात येतो. सन २०१६-२०१७ या वर्षीचा उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कारासाठी अल ईम्रान प्रतिष्ठाण बिलोली या संस्थेची निवड कार्यालयाच्या वतीने करण्यात आली होती सदरिल पुरस्कार वितरण प्रजासत्ताक दिनी पोलिस परेड मैदान, पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पाठीमागे मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते व खा. अशोक चव्हाण, आ. डी.पी. सावंत, आ.अमर राजुरकर, आ. हेमंत पाटील आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी अनेक पदाधिकारी,अधिकारी तसेच असंख्य जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment