बुलडाणा,दि.06 : जिजाऊ जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंदखेड राजा येथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची श्री संत भगवान बाबा महाविद्यालयात १२ जानेवारी रोजी होणाऱ्या सभेस पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सुरक्षा आणि रहदारीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेऊन ही परवानगी नाकारण्यात आल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी बी. एन. नलावडे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, पोलिस सभेस परवानगी देण्यास टाळाटाळ करीत असून राज्य शासनाचा त्यांच्यावर सभेला परवानगी न देण्यासाठी दबाव वाढला असावा, असा आरोप आम आदमी पार्टी तर्फे करण्यात येत आहे.
जिजाऊ जन्मोत्सव सोहळ््याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासोबतच आपच्या राज्यातील सर्व पदाधिकार्यांची सभा सिंदखेड राजा येथे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घेणार होते. त्यासाठी जिजाऊ सृष्टीनजीक असलेल्या श्री संत भगवान बाबा महाविद्यालयाची जागा यासाठी आम आदमी पक्षाच्या पदाधिकार्यांनी निश्चित करण्यात आली होती. त्यासंदर्भात जागा मालकाची ना हरकत, हेलीपॅडची जागा यासह सर्व बाबींची शहानिशाही पोलिसांसमवेत करण्यात आली होती. डिसेंबर महिन्याच्या मध्यावर यासंदर्भात पोलिसांना अनुषंगीक परवानगीसाठी पत्रही दिले होते. मात्र अचानक दोन जानेवारीला पोलिसांनी सुरक्षा आणि रहदारीच्या कारणावरून केजरीवालांच्या सिंदखेड राजा येथील या सभेस परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सिंदखेड राजात सभा घेण्याबाबत आपण आग्रही असल्याचे आम आदमी पार्टीचे प्रभारी जिल्हा संयोजक सुनील मोरे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. सभेसाठी आधी सिंदखेड राजा शहरातील तीन ते चार जागा बघितल्या होत्या. त्यापैकी नंतर श्री भगवान बाबा महाविद्यालयाची जागा निश्चित केली होती. पोलिसांनीही प्रत्यक्ष स्थळ पाहणीही केली होती. मात्र वेळेवर ही परवानगी नाकारण्यात आली आहे. यासंदर्भात अद्याप लिखीत स्वरुपात कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याचे आपचे प्रभारी जिल्हा संयोजक सुनील मोरे यांनी स्पष्ट केले.

No comments:
Post a Comment