गडचिरोली दि.०४ः- महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत. सावित्रीमाईप्रमाणे खंबीरपणे सनातनी रुढींना दूर सारत आपला विकास घडवावा, असे प्रतिपादन प्रा. रजनी मादांडे यांनी केले.माळी मोहल्ला समाज संघटना गडचिरोलीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य मार्गदर्शिका म्हणून त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोतीराम वाढई होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कºहाडे उपस्थित होते.
याप्रसंगी माळी मोहल्ला ते मरार मोहल्ला ते तेली मोहल्ला मुख्य मार्गाने इंदिरा गांधी चौकात जातांना फुले दाम्पत्यांना भारतरत्न, गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयास सावित्रीमाईचे नांव देण्यात यावे आदी मागण्यांसह प्रामुख्याने भिमाकोरेगाव प्रकरणाचा निषेध असा फलक घेऊन शांतीमय मार्गाने रॅली काढण्यात आली. त्यानंतर इंदिरा गांधी चौकात मेनबत्या प्रज्वलीत करुन सदर घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर रॅली आरमोरी मार्गाने कार्यक्रमस्थळी विसर्जीत करण्यात आली. संचालन हरिदास कोटरंगे यांनी तर आभार रमेश जेंगटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश मोहुर्ले, बंडू वाढई, मोरेश्वर गुरनुले, वामन वाढई, नरेश महाडोरे, काशिनाथ गुरनुले, अनिता शेंडे, वैशाली लोणारकर, शांता कोकोडे, अर्चना गुरनुले, पुष्पा मोहुर्ले, छाया वाढई, प्रणाली लेनगुरे, माळी मोहल्यातील सर्व पुरुष व महिलांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment