Tuesday, 30 January 2018

चिचगड येथे त्रिदिवसीय भव्य कबड्डी स्पर्धा गुरूवारी


चिचगड,दि.30- स्थानिक मित्र क्रीडा मंडळ आणि चिचगडवासीयांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय प्रो-कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन येत्या गुरुवार (दि.१)पासून करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबर शेख यांचे हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य घासीलाल कटकवार हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा महामंत्री वीरेंद्र अंजनकर, प्रा.जनार्दन कोल्हारे, सरपंच कल्पना गोसावी आदी मान्यवर उपस्थित राहतील.
या स्पर्धेतील पुरुष गटातील विजेत्यांना प्रथम पुरस्कार ३१ हजार, द्वितीय २१ हजार, तृतीय पुरस्कार ११ हजार आणि चतुर्थ पुरस्कार ५ हजार रुपये देण्यात येणार आहे. महिला गटातील विजेत्या संघांना प्रथम पुरस्कार २१ हजार, द्वितीय पुरस्कार १५ हजार तृतीय पुरस्कार ७ हजार आणि चतुर्थ पुरस्कार ५ हजार रुपये देण्यात येणार आहे. बाहेर गावावरून स्पर्धेत भाग घेणाèया स्पर्धकांचा राहण्याची आणि भोजनाची सोय मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त कबड्डी चमूंनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...