सर्वात कमी सदस्य संख्या असून सुद्धा कॉंग्रेसने राजकीय सारीपाटावर भाजपला मात दिली
युतीमध्ये मिळालेल्या यशाने कॉंग्रेस नेत्यांच्या चेहऱ्यावर झळाळी तर भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य झळकत आहे. |
गोंदिया,दि.15- गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आज सोमवारी (दि.15) घेण्यात आलेल्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या फुलचूर जि.प. क्षेत्राच्या सदस्या सीमा मडावी यांची वर्णी लागली आहे. उपाध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपचे चिचगड क्षेत्राचे हमीद अल्ताफ अकबरअली हे विजयी झाले आहेत. दरम्यान, सभागृहात सर्वात कमी सदस्यसंख्या असून ही कॉंग्रेस नेतृत्वाने भाजपला मात दिली असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
आज झालेल्या निवडणूकीत सौ मडावी यांनी 33 मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीच्या सुनीता मडावी यांनी 20 मते पडली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच चिचगड जिप क्षेत्रातील भाजपचे सदस्य हमीद अल्ताफ अकबर अली यांना सुद्धा 33 मते मिळाली तर राष्ट्रवादीचे गंगाधर परशुरामकर यांना 20 मतांवर समाधान मानावे लागले.
एैनवेळी कॉंग्रेसच्या नेते मंडळीेनी आपले कसब पणाला लापून आपली राजकीय खेळी यशस्वी करण्यात यश मिळविले आहे. सभागृहात अधिक सदस्य संख्या असताना आणि राष्ट्रीय पातळीवर आणि राज्यात शक्तीशाली सरकार असताना कॉंग्रेसने भाजपला मात दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. ऐनवेळी वरिष्ठ पातळीवरन मिळालेल्या सूचनांमुळे स्थानिक भाजप नेत्यांना निःशस्त्र करण्यात कॉंग्रेसला यश आले.
No comments:
Post a Comment