Saturday 6 January 2018

लालू यादवांना साडे 3 वर्षांची शिक्षा..5 लाख रुपयांचा दंड


रांची(वृत्तसंस्था)दि.06 – चारा घोटाळ्यातील दोषी लालू प्रसाद यादव यांना रांचीतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसंच पाच लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावली गेली. वकीलांनी सांगितले की, लालूंनी दंड भरला नाही तर त्यांना 6 महिने आणखी तुरुंगात राहावे लागेल. दरम्यान, लालूंना आता जामीन मिळवण्यासाठी हायकोर्टाचा दरवाजा ठोठवावा लागणार आहे.
लालूंनी केली होती कमीत कमी शिक्षेची मागणी…
शुक्रवारी कोर्टात आरोपींच्या वकिलांनी न्यायाधीशांसमक्ष कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती केली, तर सीबीआयच्या वकिलांनी आरोपींना सात वर्षे शिक्षा ठोठावण्याची मागणी केली. यामुळे सरकारी खजिना लुटणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाते, असा संदेश जनतेत जाईल, असे म्हटले.
या आरोपींनी बेदरकारपणे सरकारी तिजोरीची लूट केली आहे. जर 100 रुपयांची तरतूद असेल तर हे आरोपी 40 ते 50 लाख रुपये काढत होते. गुन्ह्याच्या पद्धती व गांभीर्य लक्षात घेता यांना दया दाखवण्याची गरज नाही, असे सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. तर आरोपीच्या वकिलांनी आपले अशील आजारी असल्याचे सांगत कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती न्यायालयास केली.
23 डिसेंबरलाच झाली होती बिरसा मुंडा तुरुंगात रवानगी…
– कोर्टाने 23 डिसेंबरला झालेल्या सुनावणीत लालूंना दोषी घोषित केले होते. नंतर लालूंची रवानगी बिरसा मुंडा सेंट्रल जेलमध्ये झाली होती.

– चारा घोटाळ्याप्रकरणी लालूंना तब्बल सातव्यांदा तुरुंगात जावे लागले आहे.
– एकूण 55 मधील हा 33 वा खटला आहे. लालूंच्या विरोधात एकूण सहा खटले सुरु आहेत.
– चाईबासा कोशागारमधून(ट्रेझरी) 37.70 कोटी रुपये बनावट दस्ताऐवज देऊन काढण्यात वाले होते. या प्रकरणी लालूंना ऑक्टोबर 2013 मध्ये 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. नंतर त्यांना हायकोर्टाने जामिनावर सुटका करण्‍यात आली होती.

– इतर 5 खटल्यांची सुनावणी सुरु आहे. या प्रकरणी सीबीआयने 27 ऑक्टोबरला 1997 रोजी 38 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...