
देवरी येथे सुद्धा या बंदचे तीव्र पडसाद उमटले होते. कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावर बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने सुद्धा बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात आला. शहरातील रस्त्यावरून निषेध मोर्चे काढण्यात आले. यामध्ये महिला व बालकांचा सुद्धा समावेश होता. देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देऊन दोषींवर कडक आणि जलद कारवाईची मागणी करण्यात आली. या शिष्टमंडळात प्रा.के.सी.शहारे, उपनगराध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, रुपचंद जांभूळकर, सी.बी.कोटांगले, मधुकर साखरे, जि.प.सदस्य उषाताई शहारे यांचा समावेश होता. शहरातील रस्त्यांवर सर्वत्र सुकशुकाट होता.
No comments:
Post a Comment