Friday 19 January 2018

रोस्टरसह बांधकाम,कृषी व उत्पादनशुल्क विभागाच्या अधिकाèयांना समितीने धरले धारेवर

गोंदिया,दि.१९ः महाराष्ट्र विधानमंडळाच्या (आदिवासी)अनुसूचित जमाती कल्याण समितीने काल गुरुवारला जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हापरिषद व इतर विभागाच्या कामकाजाचा व अनुसूचित जमातीच्या नोकरभरतीच्या रोस्टरचा आढावा घेतला.ही आढावा बैठक समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारला पार पडली.या बैठकित सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता गाणार,जिल्हा कृषी अधिक्षक श्री इंगळे,आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चौधरी यांच्यासह विज वितरण विभाग,राज्य उत्पादन शुल्क विभागासह काही अधिकाèयांना बैठकीपुर्वी लागणारी संबधित विभागाची माहिती वेळेवर न पुरविल्याने चांगलेच धारेवर धरल्याची चर्चा बाहेर आली आहे.सोबतच या अधिकाèयांना चौकशीला सामोर जावे लागेल अशा सुचना देत उद्या शनिवारला होणाèया आढावा बैठकीपुर्वी सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक सायकांळी ७ वाजेपर्यंत चालली.
त्यानंतर अनु.जमाती कल्याण समितीने आपला मोर्चा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीकडे वळविला.जिल्हा परिषदेमध्ये येताच नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सीमा मडावी यांनी व मुख्य कार्यकारी अधिकारी एम.आर.दयानिधी यांनी समितीचे अध्यक्ष डॉ.आमदार उईके यांचे व त्यांच्या समिती सदस्यांचे स्वागत केले.त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षाशेजारील सभागृहात जिल्हा परिषदेतील सर्वच विभागातील अनुसूचित जमातीच्या नोकरभरतीच्या रोस्टरचा आढावा घेतला असता शिक्षण विभागासह सर्वच विभागात रोस्टर अद्यायवत नसल्याचे समितीच्या निदर्शनास आले.समितीने सायकांळी सुरु केलेली आढावा सभा रात्री १०.३० वाजेपर्यंत ओढली.समितीचे सदस्य एकएक आढावा घेत असताना रात्र झाल्याचे व उशीर होत असल्याचे आमदार संजय पुराम यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आटोपते घेतल्यानी जिल्हापरिषदेची आढावा सभा रात्रीला ११ वाजेच्या सुमारास संपली. या आढावा बैठकीला समितीचे सर्वश्री आमदार संजय पुराम, प्रभुदास बिलावेकर,पास्कल धनारे,पांडुरंग बरोरा,आनंद ठाकूर,श्रीकांत देशपांडे,वैभव पिचड,अमित घोडा,डॉ.संतोष टारफे,शांताराम मोेरे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...