• पोलिस विभागाचा अभिनव उपक्रम •
साकोली,दि.19 , पोलिस विभागाच्या वतीने जातीय सलोखा व शांतता कायम रहावी, यासाठी आज(दि.१९) साकोली येथे सदभावना रैली व शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला सर्व शाळा, सामाजिक संघटना व नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
भंडारा जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने जातीय सलोखा, सर्वधर्म समभाव व शांतता कायम रहावी, यासाठी आज १९जानेवारी ला शहरात सदभावना रैली व शांतता बैठकीचे आयोजन केले. सदर रैली एनपीके हायस्कूल येथुन सुरवात झाली. रैली व बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक मा. विनीता साहू, मा.वाळके-न्यायाधीश, उपविभागीय पोलीस अधिकारी मा.श्रीकांत डिसले, उपविभागीय अधिकारी मा. अर्चना मोरे, साकोली पोलीस निरीक्षक मा.पिपरेवार व समस्त पोलीस अधिकारी-कर्मचारी हे हजर होते. या रैलीत फ्रिडम टैलेंट एकडमी, एनपीके विद्यालय, कटकवार हायस्कूल, रहांगडाले डिएड-हायस्कूल, करंजेकर विद्यालय, एमबीपीसी कालेज, श्यामरावबापू कला महाविद्यालय या शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. रैली संपूर्ण शहरातून भ्रमण करण्यात आली. शांतता बैठकीत समाजात कुठल्याही प्रकारचे जातीयवादी तणाव न राहता तसेच एकमेकांविषयी द्वेष, मत्सर न ठेवता एकमेकामधील बंधूभाव व सदभावना वाढीस लावून आपला देश बळकट करण्यासाठी प्रयत्नशील रहाण्याचे आव्हान मा.श्रीकांत डिसले-एसडीपीओ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीत तालुक्यातील पोलीस पाटील, त.मु.स अध्यक्ष, सरपंच व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. रैली व बैठकीला विषेश सहकार्य व मदतकार्य फ्रिडम टैलेंट एकडमी अध्यक्ष किशोर बावणे व त्यांच्यी संपूर्ण चमू, नगरसेवक एड.मनिष कापगते, राजू दूबे, डॉ. राजेश चंदवानी, इंद्रायणी कापगते, अमोल हलमारे, ओम गायकवाड, नेपाल रंगारी जि.प.स, गोलु धुर्वे, निलय सिंह आदींना केले.
No comments:
Post a Comment