Sunday, 21 January 2018

डॉ. आंबेडकर महाविद्यालय अंतर्गत रासेयो विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन

देवरी/लोहारा:२०
जनता बहुद्देश्यीय संस्था धोबिसराड द्वारा संचालित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरतोली/लोहारा द्वारे ग्राम डोंगरगांव येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्या प्रित्यर्थ दि. 15-1-2018 रोज सोमवार ला शिबिराचे उद्घाटन संस्था सचिव मा. श्री राजुभाऊ मडामे- उद्घाटक व प्राचार्य मा. श्री डॉ. टी.जी. गेडाम सर यांच्या अध्यक्षीयतेत पार पाडण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथि म्हणून मा. बबलुजी कटरे(मुख्याध्यापक,सुभाष हाय. डोंगरगांव), मा.सौ. भाग्यश्री बारसे(सरपंचा डोंगरगांव), मा. रमेशभाऊ मड़ावी(उपसरपंच डोंगरगांव), मा. ए. झेड. दमाहे(ग्रामसेवक डोंगरगांव),मा. देवरामजी ब्राम्हणकर(अध्यक्ष तंमुस),मा. कैलाशजी वल्के(पो.पा.डोंगरगांव) त्याचप्रमाणे मा. एम. आय.बडगे(बै.राजाभाऊ कमवि, साकरीटोला), मा. व्हि. बी.साखरे(प्राचार्य कमवि सुरतोली), मा. प्रा. तथागत गजभिये, मा.प्रा.प्रवीण राऊत इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा. किशोर मेंढे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.टेकराम बिसेन तर आभार प्रा.मनोज हेमणे यांनी मानले.
रासेयो स्वयंसेवक देवेंद्रसिंह परिहार, कुलदीप माहुरकर, हरीश उके, मोहिनी गुरव व
 सर्व रासेयो स्वयंसेवक तसेच  ग्रामवासियांच्या  सहयोगाने उद्घाटन सोहळा सुरळीतपने पार पाडन्यात आला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...