Monday, 8 January 2018

लग्नास नकार देणार्‍या प्रियकरास अटक


सावली,दि.08ः-लग्न जुळलेल्या प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणार्‍या व नातेवाईकांच्या भेटीनंतर मतपरिवर्तन झालेल्या प्रियकराने चक्क लग्न करण्यास नकार दिल्याने प्रेयसीने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच तक्रार दाखल करुन आरोपी प्रियकर गणेश मारोती शेंडे(२९) याला अटक केल्याची घटना आज रविवार(७ जानेवारी) रोजी सावली येथे घडली.
मागील ५ वर्षापासून यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. एकमेकांवर जिवापाड प्रेम करीत असतांना दरम्यानच्या काळात दोघांमध्ये भेटीगाठी कमी झाल्या होत्या. गणेश शेंडे नोकरी करीत असल्याने बाहेरगावी राहत होता तर ती सावलीत. मुलीच्या कुटूंबियांनी तिचे लग्न दुसर्‍या युवकाशी जुळविले आणि काही दिवसानंतर त्यांचे लग्नही होणार होते. मात्र अचानक जुने प्रेम जागृत झाले आणि प्रियकराने प्रेयसीला लग्नाची मागणी घातली. प्रेयसीने देखील कोणताही विचार न करता याला होकार दिला आणि प्रियकराच्या सांगण्यानुसार दोघेही जिल्ह्य़ाच्या ठिकाणी गेले. दोघेही एकाच समाजाचे असल्याने सामाजिक विरोधाची चिंता नव्हतीच. मात्र तिथे काय झाले कुणास ठाऊक प्रियकराने आपला निर्णय बदलविला. लग्नास चक्क नकार दिला. परिणामी तिला व तिच्या कुटूंबियांना फार मोठा धक्का बसला. सदर प्रकरणाची समाजाची बैठक बोलविण्यात आली. मात्र यात काहीही तोडगा निघाला नाही. प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. ठाणेदार स्वप्नील धुळे, उपनिरिक्षक शेख, महिला पोलिस, नगराध्यक्षा, समाजातील नागरिक, दोन्ही कुटूंबातील सदस्य, प्रियकर व प्रेयसी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी प्रियकराला लग्न करण्यासाठी समजविण्यात आले. परंतु प्रियकर आपल्या निर्णयावर ठाम होता. त्यामुळे मुलीच्या कुटूंबियांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. ज्याच्यासोबत लग्न जुळले तोही गेला. आणि ज्याच्यासोबत प्रेम होते त्यानेही दगा दिला. त्यामुळे प्रियकराविरुध्द लग्नाच्या सबबीखाली पळवून नेल्याची तक्रार पोलिस स्टेशन येथे नोंदविली. लागलीच पोलिसांनी प्रियकर गणेश मारोती शेंडे (२९) याच्याविरुध्द गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...