नवी दिल्ली, दि.०७: दिल्ली-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावर सिंधू बॉर्डर येथे आज (गुरुवार) पहाटे दाट धुक्यामुळे झालेल्या कारच्या भीषण अपघातात चार राष्ट्रीय खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. तर, आंतरराष्ट्रीय चॅम्पियन सक्षम यादव गंभीर जखमी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधू बॉर्डरजवळ कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार खेळाडूंचा मृत्यू झाला. या अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला. आज पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. यात हरीश रॉय (वय 20), टिंका (वय 27), सौरभ (वय 18) आणि योगेश (वय 24) यांच्यासह अन्य एका राष्ट्रीय वेटलिफ्टिरचा मृत्यू झाला. तर सक्षम यादव या आंतरराष्ट्रीय खेळाडूसह आणि बाली हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातातातील गंभीर जखमींपैकी सक्षम यादव हा खेळाडू वेट लिफ्टिंगमध्ये दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिला आहे. तर दुसरा एक खेळाडू बाली यांची प्रकृती गंभीर असून, दोघांनाही सुरुवातीला नरेला मधील सत्यवादी राजा हरिश्चंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाट धुक्यामुळे स्विफ्ट डिझायर कार महामार्गावरील डिव्हायडर आणि खांबाला धडकल्याने हा अपघात झाला. तर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment