Saturday, 27 January 2018

कोल्हापूरनजीक झालेल्या बस अपघातात 13 ठार


13 people killed in road accident in Kolhapur | कोल्हापूर बस अपघातात पुण्यातील वरखडे, केदारी, नांगरे नातेवाईक परिवारातील १३ जणांचा मृत्यू

कोल्हापूर / वाकड,दि.27 - गणपती पुळ्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी मिनी ट्रॅव्हल्स कोल्हापूर येथील शिवाजी पुलाच्या कठड्याला धडकून पंचगंगेच्या पात्रात कोसळली. या अपघातामध्ये पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याच्या अंबडवेट , बालेवाडी आणि पिरंगुट येथील १६ प्रवाशांपैकी 13 जण जागीच ठार झाले असून ३ जखमी गंभीर जखमी झाले आहेत.  कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये हिंजवडीतील पत्रकार विजय वरखडे यांचे मोठे बंधू आणि दोन पुतण्या यांच्यासह अन्य नातेवाईकांचा समावेश आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास घडली
 मृतांमध्ये  संतोष बबनराव वरखडे (वय ४५), गौरी संतोष वरखडे (१६) ज्ञानेश्वरी संतोष वरखडे (१४),वाहनचालक  महेश लक्ष्मण कुचेकरचाही (वय ३२) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. विजय वरखडे यांची भावजय मनिषा संतोष वरखडे (वय ३८, रा सर्वजण पिरंगुट) अपघातातून सुखरूप बचावल्या आहेत. यातील अन्य मृत व्यक्ती संतोष वरखडे यांच्या सासरवाडीतील पाहुणे होते. जोडून आलेल्या सलग सुट्ट्यामुळे त्यांनी गणपतीपुळे ट्रिपचे आयोजन केले होते.
काही तरुणांनी ही घटना पाहताच नदी पात्राकडे धाव घेतली आणि मदतकार्य सुरु केले. या तरुणांमुळे तीन जणांचे प्राण वाचले. पहाटे तीन वाजेपर्यंत बचावकार्य सुरु ठेवत पोलीस, महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी मिनी ट्रॅव्हल्स वर काढली. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...