देवरी: 7 (तालुका प्रतिनिधी)
देवरी येथील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुल मध्ये नुकताच 9 वा ब्लॉसम महोत्सव थाटात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या उद्धघाटनाच्या प्रसंगी देवरीचे वनपरिक्षेत्राधिकारी बी बी मारबते, महसूल विभागाचे ओंकार ठाकरे , विजय जाधव , सचिव निर्मल अग्रवाल आणि मुख्याध्यापक सुजित टेटे प्रामुख्याने उपस्थित होते. सदर तीन दिवसीय महोत्सवामध्ये विज्ञान प्रदर्शनी, हस्तकला आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश होता.
विध्यार्थी आणि शिक्षकांनी नानाविविध नृत्य प्रकार साजरे करून प्रेक्षकांचे मन वेधून घेतले होते.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी शालेय उपक्रमाचे महत्व यावेळी विध्यार्थ्यांना सांगण्यात आले. मोठ्या उत्साहाने सदर कार्यक्रम साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाची सांगता बक्षिस वितरण आणि स्नेह भोजन करून करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पूनम लता मॅनेजर कॅनरा बँक, डॉ माधवी चांदेवार, अर्चना बनसोडे, मनीष मोटघरे , निर्मल अग्रवाल आणि मुख्याध्यापक सुजित टेटे उपस्थित होते.
सर्व सहभागी आणि शालेय वर्षात विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या विध्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. सर्वोत्कृष्ट विध्यार्थी पुर्षकार धारणा जनार्धन कोल्हारे हिला देण्यात आला.
No comments:
Post a Comment