Monday, 15 January 2018

वृत्तपत्रांनी जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी-ना. इंजी. राजकुमार बडोले

गोंदिया,दि.14- जनहित व लोककल्याणाच्या संरक्षणासाठी जनसामान्यांमध्ये जाणीव जागृती करण्याचे काम वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमे करतात.जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम वृत्तपत्रांनी करावे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी गोंदिया येथे केले.
ते आज साप्ताहिक बेरारटाईम्स व न्यूज पोर्टलच्या 6व्या वर्धापनदिननिमित्त आयोजित विशेषांक प्रकाशन सोहळ्यात होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. खुशाल बोपचे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तिरोडा क्षेत्राचे आमदार रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे, गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी जिप अध्यक्ष नेतराम कटरे, जिपचे कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी,शिवसेनेचे नेते मुकेश शिवहरे, दै. कशिशचे संपादक वीरेंद्र जायस्वाल, दै. लोकजनचे संपादक प्रा. एच.एच पारधी. जिल्हामाहिती अधिकारी विवेक खडसे,माजी आमदार तथा गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्रजी जैन ,गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक हिरदीलाल कटरे आदी मान्यवर उपस्थित होते.
ना. बडोले पुढे बोलताना म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या महापुरुषांनी वृत्तपत्रातून लिखाण केले यामध्ये बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फारमोठे योगदान आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही आणि जातीविरहित समाजव्यवस्था अभिप्रेत होती.
यावेळी मान्यवर पाहुण्यांनी समयोचित माग्रदर्शन करून साप्ताहिक बेरारटाईम्सच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बेरारटाईम्सचे मुख्य संपादक खेमेंद्र कटरे यांनी केले. संचलन पृथ्वीराज कोल्हटकर यांनी केले. बेरारटाईम्सचे सहयोगी संपादक सुरेश भदाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...