Friday, 19 January 2018

बोंडगाव नजीक दोन दुचाकी धडकल्या, एक जागीच ठार

अर्जूनीमोर,दि.19- तालुक्यातील बोंडगाव चान्ना रस्त्यावर आज दुपारी दोन दुचाकींची सामोरासामोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली.
राजेश गंगाधर  दिरबुडे (45) राहणार बोंडगाव देवी असे मृताचे नाव आहे. तर देवदास मेश्राम, राहणार बोंडगाव देवी हे गंभीर जखमी असून त्यांचेवर भंडारा येथे उपचार सुरू आहेत. इतर दोन जण किरकोळ जखमी झाले.
अर्जूनीमोर पोलिस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद असून ठाणेदार पी बी भस्मे याचे मार्गदर्शनामध्ये पुढील तपास हवालदार कन्नाके करीत आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...