Friday, 19 January 2018

आदिवासी कल्याण समितीने केली घरकुल व रोहयोच्या कामाची पाहणी

गोंदिया,दि.१९ः महाराष्ट्र विधानमंडळाच्या (आदिवासी)अनुसूचित जमाती कल्याण समितीने आज शुक्रवारला गोंदिया जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत राबविण्यात आलेल्या योजनांची पाहणी केली. समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक उईके यांच्या नेतृत्वातील सर्वश्री आमदार प्रभुदास बिलावेकर,पास्कल धनारे,पांडुरंग बरोरा,आनंद ठाकूर,श्रीकांत देशपांडे यांच्यासह जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे,प्रकल्प अधिकारी विनोद चौधरी,जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख यांच्या पथकाने सालेकसा तालुक्यातील पिपरीया येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत सुरु असलेल्या पांदण रस्त्याची पाहणी केली.सोबत या कामावरील कामगारांशी संवाद साधला.जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी समितीच्या सदस्याबद्दल सविस्तर माहिती देत परिचय करुन दिला.तेव्हा कामगारांनी आम्हाला मिळणारी मजुरी ही अल्प मिळत असल्याने मजुरीचे दर वाढविण्यात यावे अशी मागणी केली.त्यावर समितीचे अध्यक्ष आमदार डॉ.अशोक उईके यांनी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आपल्या भावनांना ओळखतो.जिल्हाधिकारी यांच्याकडे मजुरी वाढविण्याचे अधिकार नसून ते प्रस्ताव पाठवू शकतात आम्ही त्या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा करुन तुमच्या मजुरीचा दरवाढीचा निर्णय घेण्याबाबत सरकारला सांगू असे आश्वासन दिले.यावेळी जिल्हापरिषद मग्रारोहयो विभागाचे प्रमुख श्री भांडारकर,पंचायत विभागाचे उपमुकाअ राजेश बागडे,स्वच्छता विभागाचे उपमुकाअ राजेश राठोड,सालेकसाचे गटविकास अधिकारी खाडे यांच्यासह तहसिलदार व इतर अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...