Tuesday 30 January 2018

गोंदियात पेंशन बचाव परिषद उद्या


गोंदिया,दि.30- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया येथे उद्या बुधवारी (दि.३१) पेंशन बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय राज्य कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष अशोक थूल, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रहास सुटे आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना नागपूर जिल्हा शाखेचे सरचिटणीस अशोक दगडे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत नवीन अंशदायी पेंशन योजना बंद करून जुनी पेंशन योजना लागू करणे आणि सातवा आयोग याविषयी धरणे व आंदोलने या विषयी सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आता पर्यंत शासनाने दिलेली आश्वासने पाळण्यात संबंधी कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याने पुढील धोरण आखणे आणि येत्या २२ फेब्रुवारी मुंबई येथील महामोच्र्याविषयी चर्चा होणार आहे.
तरी सर्व अन्यायग्रस्त कर्मचारी बांधवांनी या परिषदेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ सहसचिव आशिष रामटेके, प्रशांत पाठक, मदन चुèहे, के.व्ही. नागफासे, बी एन तरोणे,लीलाधर पाथोडे, नरेंद्र रामटेक्कर, शैलेश बैस, पी.जी. शहारे, सुलभा खाडे, पी. वाय. बडोले, ए.जे नान्हे आदींनी केले आहे

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...