Monday, 8 January 2018

आर्य वैश्य महासभेच्या लवकरच जिल्हास्तरावर समित्या –नंदकुमार गादेवार


नांदेड,दि.08ः- महाराष्ट्र भरातील सर्व आर्य वैश्य समाज बांधवांची मातृ संस्था म्हणून या महाभेकडे पाहिले जाते. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या “लवकरच गावस्तरा पर्यंत विस्तार करण्यासाठी प्रथम जिल्हास्तरावर समाज बांधवांच्या जिल्हा समित्या गठीत करण्याचे काम लवकरच सुरू करू असा ठराव आज पहिल्या नवनियुक्त कार्यकरिणीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती ऑल इंडिया फेडरेशन ऑफ आर्य वैश्य महासभाचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी दिली.
नांदेड येथील सिडको भागातील वासवी माता मंगल कार्यालय येथे दि 7 जानेवारी रोजी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा नवीन कार्यकारिणी ची बैठक नंदकुमार गादेवार यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झाली.या बैठीला नवनियुक्त सर्व पदाधिकारी संचालक कारकारणी मंडळ सदस्य उपस्थित होते.मार्गदर्शन व भूमिका स्पस्ट करताना गादेवार म्हणाले महाराष्ट्रासह माझ्यावर अखिल भारतीय जबाबदारी असल्याने पर्यायाने देशपातळीवर व्यापारी उदोजक यांचे संघटन करून आर्य वैश्य व्यापारी महासम्मेलन आयोजन करायचे आहे. देशात समाजाची व्यापारी म्हणून आपली खरी ओळख आहे त्यासाठी असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
नांदेड सिडको भागातील महासभेच्या या भव्य दिव्य मंगल कार्यालय वास्तू परिसरात भव्य असे “श्री वासवी माता मंदिर” उभारून संरक्षण भिंत बांधकामांच मोठे कार्य लवकरच सुरू करायाचे आहे. समाजातील वाढते घटस्फोट आणि कौटुंबिक कलहाचे प्रकरण पाहाता काही कठोर पावले उचलण्याची आवश्यकतेवर दिलीप कंदकुर्ते यांनी विचार व्यक्त केले तर महासभेचे सदस्य विदर्भस्तरावर जास्तीत जास्त तयार करु असे पुसद येथील नगरसेवक निखिल चिद्दरवार यांनी स्पष्ट केले. यवतमाळ आर्य वैश्य समाज जिल्हाध्यक्ष आसेगावकर यांनी महासभेच्या बैठकीचे फिरते आयोजन करून विभागवार बैठका ठेवावे असे सूचित केले.बैठकीला सर्व नवनियुक्त पदाधिकारी संचालक बांधकाम समिती सदस्य आदी उपस्थित होते. पुढील बैठक लवकरच नियोजन करून पुसद येथे होणार असे नंदकुमार गादेवार यांनी जाहीर केले. आभार कोषाध्यक्ष सुभाष कन्नावार यांनी मानले. पसायदानाने बैठकीची सांगता झाली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...