Friday 29 June 2018

गोंडवाना विद्यापीठाची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार:कुलगुरु डॉ.कल्याणकर




गडचिरोली,दि.२९:गोंडवाना विद्यापीठात होत असलेल्या नोकरभरतीबाबत भ्रष्टाचाराचा आरोप करणारा मजकूर व्हॉटस्अॅपवर व्हायरल झाल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले असून, कुलगुरु डॉ. नामदेव कल्याणकर यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेऊन विद्यापीठाची बदनामी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करु, असा इशारा दिला.
दोन दिवसांपासून व्हॉटस्अॅपवर ‘जाहीर आवाहन-१०० टक्के भ्रष्ट गोंडवाना विद्यापीठातील २०१८-१९ नोकरभरतीवर बहिष्कार टाका व विरोध करा’ या मथळ्याखाली एक मजकूर व्हायरल होत आहे. प्रत्येकच पदवीधर मुलगा आईवडिलांनी काटकसर करुन वाचविलेले पैसे खर्च करुन अभ्यास करतो व नोकरीसाठी प्रयत्न करीत असतो. परंतु गोंडवाना विद्यापीठाची नोकरभरती असली, की त्याचा भ्रमनिरास होतो. हे विद्यापीठ नोकरभरतीत शंभर टक्के घोटाळा करीत आहे, अशा आशयाचा मजकूर व्हॉटस्अॅपवर व्हॉयरल होत असून, त्यात विविध कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी किती पैसे घेतले जातात, याचा उल्लेख केला आहे. यापूर्वीच्या काळात एकाच घरचे ३-४ लोक या विद्यापीठात नोकरीवर लागले. आताही असाच घोटाळा होत आहे. परंतु लोकप्रतिनिधींचेही उमेदवार नोकरीवर लागत असल्याने ते बोलत नाही, असा आरोपही या मजकुरात करण्यात आला आहे.
हा मजकूर व्हायरल झाल्यानंतर आज कुलगुरु डॉ.नामदेव कल्याणकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, सध्या राज्यात सर्वप्रकारच्या पदभरतीवर बंदी आहे. परंतु गोंडवाना विद्यापीठ नवीन असल्याने व ‘१२ ब’ साठी संपूर्ण पदे भरणे आवश्यक असल्याने शासनाने विशेष बाब म्हणून पदभरतीला मान्यता दिली आहे. त्यानुसार १५ शिक्षक व २० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच २० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्याची जाहिरात राज्य पातळीवर प्रकाशित करण्यात आली. त्यात २५ जून ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख होती. या २० पदांसाठी तब्बल १७०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्व प्रक्रिया नियमानुसारच होत आहे. असे असताना व्हॉटस्अॅपवर नोकरभरतीत घोटाळा होत असल्याचा आरोप करणारा मजकूर प्रसिद्ध होत आहे. हे क्लेशदायक असून, विद्यापीठाची बदनामी करणारी बाब आहे. अशी बदनामी आपण सहन करणार नाही व या विरोधात आपण पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्याची माहिती कुलगुरु डॉ.कल्याणकर यांनी दिली. पोलिस लवकरच मजकूर प्रसिद्ध करणाऱ्याचा शोध घेतील, असा विश्वास व्यक्त करुन डॉ.कल्याणकर यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला प्र-कुलगुरु डॉ.चंद्रशेखर भुसारी, प्रभारी कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले उपस्थित होते.

शहिद पोलीसांच्या कुटुबियांच्या कोल्हापूर पोलीस दलाने केला गौरव

गडचिरोली,(अशोक दुर्गम) दि.29ः- नक्षल्यवाद्यांशी दोन हात करतांना आपल्या जिवाची पर्वा न करता कामगिरी बजावत शहीद झालेल्या पोलीस कर्मचारी,अधिकार्यांच्या कुटुंबियाकरिता पोलीस अधिक्षक कार्यालय गडचिरोली व महाराष्ट्र सरकारच्यावतीने दरवर्षी महाराष्ट्र दर्शन सहलीचे आयोजन करण्यात येते.यावर्षीसुध्दा 26 ते 29 जूनपर्यंत या सहलीचे आयोजन करण्यात आले होेते.यादरम्यान या शहिदांच्या कुटुबियांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध स्थळांची पाहणी केल्यानंतर त्यांच्या निवासासह राहण्याची व्यवस्था कोल्हापूर पोलीसांच्यावतीने करण्यात आली.आपल्याच विभागातील पोलीसांचे कुटुंब ज्यांचा आज आधार हिरावला गेला आहे अशा सर्व शहिदांच्या कुटुबियांच्या भावपुर्ण स्वागत करीत त्यांनी केलेल्या त्यागाचा गौरव कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक संजय मोहिते यांच्यासह त्यांच्या चमूने केला.कोल्हापूर पोलीसांच्यावतीने करण्यात आलेल्या स्वागतसमारंभाप्रंसगी शहिद पोलीस अधिकार्यांच्या कुटुबियांना पुन्हा एकदा या सत्काराप्रसंगी आपल्या मुलांने,पतीने केलेल्या कार्याचा अभिमान त्यांच्या चेहर्यावर झळकत असल्याचे दिसूून आले.
या सहलीमध्ये शहीद पोलीस जवानांच्या कुटुंबातील एकूण 110 सदस्य तसेच दोन महिला पोलीस उपनिरीक्षक हे कोल्हापूर जिल्ह्याच्या सहलीवर आले होते. सहली दरम्यान त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील कनेरी येथील सिध्दगिरी महाराज मठ, करविरनिवासीनी श्री अंबाबाई मंदिर, रंकाळा तलाव परिसर, शाहू महाराजांचे निवासस्थान न्यू पॅलेस, ज्योतिबा मंदिर, पन्हाळा किल्ला तसेच कोल्हापूर शहरातील सर्व प्रेक्षणीय स्थळांची सहल घडविण्यात आली.शहीद पोलिस जवानांच्या ७० वीरमाता, वीरपत्नी व वीरकन्या यांचे श्री अंबाबाई भक्त समितीच्या पुढाकाराने व करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर पुजारी संघाच्या वतीने प्रसाद व साडी-चोळी देऊन कोल्हापूरवासी जनतेच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.
आज 29 जून रोजी सहल पूर्ण करून गडचिरोली करिता रवाना होत असतांना त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन अलंकार हॉल, पोलीस मुख्यालय, कोल्हापूर येथे करण्यात आले होते.
निरोप समारंभप्रसंगी शहीद पोलीस पत्नी संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती वाकडे यांनी गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या शासनाच्या या योजनेचे आभार मानले. तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे कुटुंबियांच्या सहली करिता कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने केलेल्या नियोजनाबाबत व आदरातिथ्या बाबत आभार व्यक्त केले. महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम यांनी सहली दरम्यान कोल्हापूर येथे अक्षरशः माहेरी आल्याचा आनंद मिळाल्याचे मनोगत व्यक्त केले. महिला पोलीस उपनिरीक्षक शितल राणे यांनी नक्षल समस्याग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या पाठीशी पूर्ण महाराष्ट्र उभा असल्याची खात्री झाल्याचे सांगितले.
अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी गडचिरोलीमध्ये शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी त्यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करून सहली मधील वीरपत्नी, वीरमाता-पिता व त्यांच्या पाल्यांचे कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे आभार व्यक्त करून त्यांना स्मृतिचिन्ह म्हणून करवीर निवासिनी श्री अंबामातेची प्रतिमा भेट म्हणून दिली. तसेच भविष्यातही अशा सहली करीता कोल्हापूर जिल्हा पोलीस दल सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाला कोल्हापूरचे अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी शहर विभाग प्रशांत अमृतकर तसेच गडचिरोली जिल्ह्यात सेवा बजावलेले व सध्या कोल्हापूर शहरात प्रभारी म्हणून काम पाहणारे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मानसिंग खोचे, शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर, पोलीस कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत सावंत व त्यांचे सहकारी सुनील जांभळे, प्रदीप ठाकूर, पोलीस मुख्यालयाचे राखीव पोलीस उपनिरीक्षक राजू शिंदे,पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले तसेच पोलिस मुख्यालयातील पोलिस कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केले. आभार उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अमृतकर यांनी मानले.

जिल्ह्यातील ८७ गावांना पुराचा धोका

गोंदिया,दि.29ःः मान्सून कालावधीत पूर परिस्थितीपासून संरक्षण व बचाव करण्यासाठी घरगुती साहित्याचे वापर करून जीवित व वित्तीय हानी कमी करण्याचे धडे राज्य आपत्ती प्रतिसाद दलातर्फे जिल्हावासीयांना देण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्था प्रशासन आणि नागरिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी गोरेगाव येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. तसेच जिल्ह्यातील ८७ गावांना पुराचा धोका असल्याचेही सांगितले.
मान्सून कालावधीदरम्यान जिल्ह्यात वैनगंगा, गाढवी, वाघ, चुलबंद, बहेला, पांगोली नदीपासून येणार्‍या पुरापासून ८७ गावांना पुराचा धोका आहे. यासाठी सुरक्षा व बचाव करण्यासाठी २५ जून ते ३ जुलैपयर्ंत जिल्ह्यात प्रशिक्षण, जनजागृती कार्यशाळा राबविण्यात येत आहेत. गोंदिया तालुक्यात २५ जून रोजी भानपूर तलावात नागरिकांना तालीमचे प्रशिक्षण देण्यात आले. तिरोडा तालुक्यात चोरखमारा येथे नागरिकांनी आपत्ती प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतला. पावसाळ्यात अनेक गावांत पूर परिस्थितीचे संकट निर्माण होते. त्यामुळे अनेकदा जीवित हानी तसेच मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना नुकसान सोसावे लागते. अशा परिस्थितीत हानीचे प्रभाव कमी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. पारंपारिक साधन व घरात उपलब्ध असलेल्या वस्तुंचा प्रयोग करून आपत्तीला तोंड देण्यास मदत मिळते, यावर जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात एसडीआरएफ नागपूरच्या चमूने आपत्तीच्या वेळेस घेण्यात येणारी दक्षता, घरात उपलब्ध असणारे साधनांचा आपत्तीच्या वेळेस उपयोग, सर्पदंश, वीजपासून संरक्षण तसेच मानवी शरीराच्या अवयवासंदर्भात माहिती देत आहेत. बचाव व राहत कार्य उपयोगात येणारी साहित्य व साधने, औजार, स्वयंचलित डोंगे, कटर, सक्यरुलर सॉ, चैन सॉ, बोल्ट कटर आदी साहित्य पूर परिस्थितीत कसे उपयोगी पडतात याची माहिती दिली. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद चमूचा दौरा २८ जून रोजी पुजारीटोला जलाशय, २९ जून रोजी नवेगावबांध जलाशय, ३0 जून रोजी इटियाडोह जलाशय व १ जुलै रोजी हाजराफॉल जलाशय, २ जुलै रोजी शिरपूर जलाशय तसेच ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पावसाळ्याच्या दिवसांत पूर परिस्थितीपासून संरक्षण व बचाव करण्यासाठी नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पहिल्याच दिवशी २,११३ लक्षवेधी सूचना

नागपूर,दि.29 : विधिमंडळ अधिवेशनासाठी गुरुवारपासून लक्षवेधी सूचना स्वीकारणे सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विधानसभा आणि विधान परिषदेसाठी २,११३ लक्षवेधी सूचना संबंधित विभागांना प्राप्त झाल्या आहेत.
विधान सभेच्या सदस्यांनी आॅनलाईन पद्धतीने १,५५८ तर विधान परिषदेच्या सदस्यांनी ५५५ लक्षवेधी सूचना संबंधित विभागाकडे पाठवल्या. या लक्षवेधी सूचना विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, शेतकऱ्यांशी संबंधित विविध प्रश्न, पाणी टंचाई, वाढती गुन्हेगारी, बनावट बी- बियाणे, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण खात्यासह इतर विविध विषयांशी संबंधित आहेत.विधिमंडळ सचिवालय सुरू झाले आहे. कर्मचारी अधिकारी नागपुरात आधीच दाखल झाले आहे

मा. गो. वैद्य, खेडेकर प्रथमच येणार एकत्र

नागपूर,दि.29ः-विचारसरणींच्या दोन ध्रुवांवर असणारे रा. स्व. संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर प्रथमच एका मंचावर येणार आहेत.
मीडिया वॉच पब्लिकेशनतर्फे प्रकाशित ‘संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल?’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन शनिवार, १४ जुलै रोजी होत आहे. ‘हिंदू राष्ट्र’ हा विषय ज्वलंत आणि वादग्रस्त असल्याने याविषयावर उभय नेते कशी भूमिका मांडतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
धनवटे सभागृह, शंकरनगर येथे सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. अध्यक्षस्थानी साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार राहतील. मा. गो. वैद्य, पुरुषोत्तम खेडेकर यांच्याशिवाय सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांचाही या चर्चासत्रात सहभाग राहील.
या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आशुतोष शेवाळकर, अरुणा सबाने, अतुल लोंढे आदींनी केले आहे.

सीसीटीव्हीच्या आधारे चोर अटकेत

अजुर्नी-मोर(संतोष रोकडे),दि.29ः : तालुक्यातील महागाव येथील सिध्दी सिध्दी बीअरबार फोडून चोरी करणाड्ढया तीन आरोपींना अजुर्नी-मोर पोलीसांनी २४ जून रोजी चंद्रपूर येथून अटक केली. तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून सीसीटीव्ही फुटेजच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. 
मनी कालीपद बिश्‍वास, रा. श्यामनगर, रोहीत उर्फ राजू दिनेश शर्मा, रयतवाडी वॉर्ड व हसंराज उर्फ शुभम वसंत त्रिसुले रा. जयतवाडी वॉर्ड अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख १२ हजार रुपयांचा मुद्येमाल जप्त केला आहे. महागाव येथील रिध्दी सिध्दी बारचे मेन गेट तोडून आरोपींनी गल्ल्यातील ३ हजार रोख व इंग्रजी दारूच्या १0 पेट्या चोरी केल्या होत्या. याप्रकरणी फियार्दी ईश्‍वरदास बडवाईक यांच्या तक्रारीवरून अजुर्नी-मोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पोलीसांनी आरोपींना पकडण्यासाठी बारमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिळालेले माहिती चंद्रपूर, गडचिरोली आदी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात पाठविली. यादरम्यान, आरोपी हे चंद्रपूर येथील असल्याचे निष्पन्न होताच पोनि शिवराम कुंभरे यांच्या मार्गदर्शनात सहा. पोनि अनिल कुंभरे, सहा. फौजदार माणिक खरकाटे, पो.हवा. राजेंद्र मिश्रा, नापोशि विजय कोटांगले यांनी चंद्रपूर गाठून तीनही आरोपींना ताब्यात घेतले. तसेच आरोपींकडून चोरी केलेल्या दारूच्या पेट्या आणि चोरीसाठी वापरलेली इंडिका कार असा एकूण १ लाख १२ हजार रूपयांचा मुद्येमाल ताब्यात घेतला. दरम्यान, आरोपींनी सदर दारू जिल्ह्यात विक्रीकरीता चोरी केल्याचे कबूल केले. विशेष म्हणजे तीनही आरोपी हे अट्टल गुन्हेगार आहे.

बसपा-काँग्रेस आघाडीचा निर्णय वरिष्ठ स्तरावर

नागपूर,दि.29 : आगामी दिवसात महाराष्ट्रात बसपा व काँग्रेस यांच्यातील आघाडीबाबतच्या हालचली वाढू शकतात, असे संकेत बसपाचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रभारी खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी गुरुवारी नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान दिले. परंतु आघाडीबाबतचा निर्णय हा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती याच घेतील आणि त्या जे निर्णय घेतली तो आम्ही मान्य करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी आगामी निवडणुकीच्या पाशर्वभूमीवर बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीसोबत आघाडी करण्याचे संकेत दिले होते. चव्हाण यांच्या या आघाडीबाबतच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी डॉ. सिद्धार्थ यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात डॉ. सिद्धार्थ म्हणाले, खासदार चव्हाण यांनी आपली बाजू सांगितली आहे. परंतु आम्हीसुद्धा राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून बसपा कार्यकर्त्यांचा विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. बसपा कार्यकर्ते आघाडी करण्याची इच्छा ठेवत असतील तर त्यासंदर्भात वरिष्ठ नेतृत्वाला सांगितले जाईल. परंतु अंतिम निर्णय मात्र मायावती याच घेतील.
यावेळी बसपाचे महाराष्ट्र प्रभारी प्रमोद रैना, अ‍ॅड. संदीप ताजने, प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे, प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले प्रामुख्याने उपस्थित होते.

स्कॉर्पिओमधून 52 लाख रुपये जप्त, देशी कट्यासह चौघांना अटक

खामगाव,दि.28 : नागपूर शहरातील तीन एटीएम फोडून स्कॉर्पिओ गाडीने मुंबईकडे जाणार्‍या हरीयाणातील चार चोरट्यांना खामगाव पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून नांदुरा रोडवरील चिखली-आमसरीनजीक जेरबंद केले आहे. सदर चोरट्यांकडून 53 लाख रुपयांची रक्कम, देशी कट्टा, गॅस कटर,स्कार्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे. सदर टोळीत एका महिलेसह आणखी दोघांचा समावेश असून दोघे फरार होण्यात यशस्वी झाले. या टोळीकडून मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.
माहिती मिळताच शिवाजीनगर पोस्टेचे ठाणेदार ठाकूर यांनी कर्मचार्‍यासह सदर स्कॉर्पिओ गाडीचा पाठलाग केला. पोलिस मागे असल्याचे पाहताच सदर चोरटे नांदुरा मार्गावरील चिखली आमसरी जवळील  पुंडलीक बाबा मंदिराजवळ सदर स्कॉर्पिओ गाडी सोडून शेतात पसार झाले. पोलिसांनी शेतामध्ये चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना अटक केली. यावेळी गावकर्‍यांनीही चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांना मदत केली. मोहम्मद आजमिन मोहम्मद आसरू (24), मोहम्मद अब्दुल मो. माजिद (24), आसिफ हुसेन हारून हुसेन (25), अरशद खान रहेमान खान सर्व रा. हरियाणा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. तर एका महिलेसह दोघे आरोपी अद्याप फरार असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. यावेळी पोलिसांनी स्कॉर्पिओ क्रमांक डीएल 4 सी एएफ 4943 मधून नगद 53 लाख रूपये, एक देशी कट्टा, तीन जिवंत काडतुस, 6 मोबाईल, एक गॅस कटर असा माल जप्त केला आहे.घटनेची माहिती मिळताच एएसपी श्याम घुगे, डिवायएसपी प्रदिप पाटील यांनी शिवाजीनगर पोस्टेला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

मेळघाट अभयारण्यातून जाणाऱ्या रेल्वे लाईनला विरोध

नागपूर,दि.28 : मेळघाट व्याघ्र अभयारण्यातून जाणाऱ्या ब्रॉडगेज रेल्वे लाईनविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. वनसंपदा व वन्यजीवांची सुरक्षा लक्षात घेता या लाईनचा मार्ग बदलविण्यात यावा अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
प्रमोद जुनघरे असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. २१ जून २०१८ रोजी रेल्वे मंत्रालयाने खंडवा (मध्य प्रदेश) ते आकोट या ब्रॉडगेज रेल्वे लाईनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून त्यापैकी ५१ किलोमीटरची रेल्वे लाईन मेळघाट व्याघ्र अभयारण्याच्या बफर झोनमधून जाते. २०१४ मध्ये राज्य सरकारने अभयारण्यातून जाणाऱ्या रेल्वे लाईनला मान्यता नाकारली होती. त्यानंतर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने पर्यायी मार्ग मंजूर केला होता. त्यामुळे रेल्वे मार्गाची लांबी ३० किलोमीटरने वाढून खर्चात ७४० कोटी रुपयांची भर पडत होती. परिणामी, तो प्रस्ताव बाजूला ठेवून अभयारण्यातून जाणाऱ्या रेल्वे लाईनलाच हिरवी झेंडी देण्यात आली आहे. या रेल्वे लाईनमुळे वनसंपदा व वन्यजीवांना मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे रेल्वे लाईनचा मार्ग बदलविणे आवश्यक आहे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

गुरूद्वारा बोर्डाची लवकरच निवडणूक; मुख्यमंत्र्यांचे आ.तारासिंघ यांना आश्वासन

नरेश तुप्तेवार
नांदेड,दि.28-ः गुरूद्वारा बोर्डाच्या रिक्त झालेल्या तिन सदस्यांची निवडणूक घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले असुन याबाबत ची अधिसूचना विनाविलंब काढण्याची कार्यवाही सुरू असल्याचे गुरूद्वारा बोर्डाचे अध्यक्ष आ.सरदार तारासिंघ यांनी सांगितले.गुरूद्वारा बोर्डाच्या रिक्त झालेल्या तिन सदस्यांची निवडणूक घेण्यात यावी यासाठी सरदार इंदरसिंघ गल्लिवाले यांच्या नेतृत्वाखाली शिख समाजातील जेष्ठ कार्यकर्त्यांनी उपोषण केले होते. जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने उपोषण सोडवण्यात आले होते. शासनाकडून निवडणूक घेण्याचे आदेश न आल्याने आंदोलन कर्ते चिडले व त्यांनी 2 जुलै रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला. याची गंभीर दखल घेत शासनाकडून काल जोरदार हालचाली सुरु करण्यात आल्या. आ.सरदार तारासिंघ यांनी मुख्यमंत्री श्री फडवणीस यांची भेट घेऊन निवडणूक अधिसूचना काढण्याची मागणी करत त्यावर त्यांचे हस्ताक्षर घेऊन हा विषय मार्गी लावला. यास आ.तारासिंघ यांनी दुजोरा देत विनाविलंब अध्यादेश निघेल असे सांगितले. त्यामुळे गुरूद्वारा बोर्डाच्या रिक्त झालेल्या तिन सदस्यांची निवडणूक घेण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत असे तारासिंघ म्हणाले.

पानसरे-दाभोळकर हत्‍येप्रकरणी तपास यंत्रणांना अजूनही काहीच कसं कळत नाही?- मुंबई हायकोर्ट




मुंबई,दि.28- बंगळूरू येथील पत्रकार व कार्यकर्त्‍या गौरी लंकेश यांच्‍या हत्‍येप्रकरणी आरोपींना कर्नाटक पोलिस महाराष्‍ट्रात येऊन अटक करतात. मात्र महाराष्‍ट्रात घडलेल्‍या विचारवंतांच्‍या हत्‍येप्रकरणी तपास यंत्रणांना अजूनही काहीच कस कळत नाही?, अशा शब्‍दांत आज (गुरूवारी) मुंबई हायकोर्टाने सीबीआय आणि एसआयटीच्‍या नाकर्तेपणावर बोट ठेवले.
तसेच पुढील सुनावणीवेळी सीबीआयचे दिल्लीतील सहसंचालक आणि महाराष्ट्राचे गृहसचिव यांना कोर्टासमोर हजर राहण्‍याचे आदेश कोर्टाने दिले आहे. वरीष्‍ठ सरकारी अधिका-यांना अशाप्रकारे कोर्टात बोलावण्‍यास आम्‍हाला आनंद होत नाही. मात्र तपासात प्रगतीच होत नसेल तर आमच्‍यासमोर दुसरा पर्याय नाही, असे हायकोर्टाने म्‍हटले.आज सुनावणीवेळी दोन्‍ही तपास यंत्रणांचे वकील हायकोर्टात हजर नव्‍हते. यावरून तुम्‍ही या प्रकरणांकडे किती गांभीर्याने पाहता हे लक्षात येते, असे हायकोर्टाने सुनावले. तसेच कोर्टात सादर करण्‍यात आलेल्‍या अहवालावरून दोन्‍ही तपास यंत्रणांत समन्‍वय नाही, असा शेरा न्‍यायालयाने दिला.

मिशन मोडवर 13 कोटी वृक्ष लागवड पूर्ण करा-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø  वृक्षारोपण जनजागृती दिंडीचा शुभारंभ
Ø  असेल वन तर टिकेल जीवन
गोंदिया, दि. 28 जून – मानवी जीवनात वनांचे अनन्य साधारण महत्व आहे. वृक्ष मानवाला प्राणवायू देतात आणि मानवच वनांचा व पर्यावरणाचा ऱ्हास करतो. याचाच परिणाम म्हणून  पाऊस कमी झाला 56 दिवसाचा पाऊस 18 दिवसांवर आला. हे दृष्ट चक्र थांबवायचे असेल वृक्ष लागवड व संवर्धन हाच एकमेव पर्याय असून 13 कोटी वृक्ष मिशन मोडवर पूर्ण करा, असे आवाहन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन द्वारे चिचगड येथे आयोजित वृक्षारोपण जनजागृती दिंडीच्या शुभारंभ समारंभात ते बोलत होते.महाराष्ट्र शासनाच्या वृक्षारोपनाविषयी जनजागृती करण्यासाठी ही वृक्ष दिंडी काढण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील चिचगड येथे आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. ही दिंडी नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यातील गाव आणि शहरांमध्ये जनजागृती करणार आहे.
पालकमंत्री ना. राजकुमार बडोले हे कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास आमदार प्रा. अनिल सोले, आ. संजय पुराम, आ. विजय रहांगडाले, आ. रामदास आंबटकर, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे,  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, उपवनसंरक्षक  युवराज, चिचगडचे सरपंच कल्पना गोस्वामी, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रामरतन राऊत  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्रीराम मंदिर देवस्थान चित्रकूट वांढरा चिचगड येथे  वृक्ष लावून दिंडीला सुरुवात करण्यात आली.यावेळी बोलताना वनमंत्री म्हणाले की, वनासाठी मनापासून अनमोल क्षण देणाऱ्या लोकांनी वृक्ष लागवडीचे व्रत घेतले आहे. वन संवर्धन हे सर्वांचे काम आहे. हे काम ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन स्वयंस्फुर्तपणे करीत असल्याने त्यांनी आ. अनिल सोले यांचे अभिनंदन केले. वृक्ष लागवड हे मिशन आहे. अनेक उत्सवात वृक्षाचे महत्त्व विषद आहे असे सांगून ना. मुनगंटीवार म्हणाले की, महात्मा जोतिबा फुले यांचे विद्य विना मती गेली हे आपण ऐकत आलो. आज ज्योतिबा असते तर वृक्षा विना जल गेले, जल विना शेती गेली, शेती विना धन गेले, आणि एवढे अनर्थ एका वनाने केले,  असे ते म्हणाले असते.
लोकांमध्ये मनापासून वन लावण्याची इच्छा निर्माण करा असे ते म्हणाले. पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या सामान्य माणसालाच  पर्यावरणाच्या ऱ्हासाचा अधिक त्रास  सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी मोठया प्रमाणात झाडे लावण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.   गोंदिया जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नक्की मदत केली जाईल,असे त्यांनी यावेळी सांगितले. मासेमारी करणाऱ्या भोई समाज बांधवांना मासेमारीची लीज कमी करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे श्रीराम मंदिर विकासासाठी जिल्हा नियोजन मधून निधी दिला जाणार आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्री राजकुमार बडोले म्हणाले की, वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. वसुंधरा जगवायची असेल तर वृक्ष लागवड व संवर्धन हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. गोंदिया जिल्ह्याने गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्ष लावले आहेत. यावर्षी 31.64 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करू अशी खात्री त्यांनी दिली. नाविन्यपूर्ण योजनेत गेल्या वर्षी दोनशे सेंटीमीटरच्या वरील उंचीच्या वृक्ष संवर्धनासाठी शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान दिले होते. ही योजना यावर्षी सुद्धा सुरू ठेवली जाणार असून दीडशे सेंटीमीटर उंचीच्या वृक्ष संवर्धनासाठी निधी दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
68 गावातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा मोबदला मिळावा अशी मागणी करून आमदार संजय पुराम म्हणाले की, जिल्ह्यातील मध्यम सिंचन प्रकल्प वन विभागाच्या अडचणी मुळे रखडले आहेत ते पूर्ण करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. शासनाने चिचगडला अप्पर तहसिल कार्यालय मंजूर  केल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले. धारगड, कचारगड, हाजरा फॉलचा विकास शासन करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.अनिल सोले यांनी वृक्ष दिंडीच्या आयोजना मागील भूमिका आपल्या भाषणात विषद केली. वनमंत्री मनापासून ही मोहीम राबवित आहेत, त्यांना आपण साथ देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आज जर आपण लक्ष दिले नाही तर भविष्यात आपल्यावर पाश्चाताप करण्याची वेळ येईल असे ते म्हणाले. म्हणून आपण सर्वांनी या मोहिमेत सहभागी होऊन वृक्ष लागवड संवर्धन करू असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.यावेळी वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन बक्षीस, हरित सेने सदस्य प्रमाणपत्र, घरगुती गॅस कनेक्शनचे वाटप वनमंत्री व पालकमंत्री यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास गावकरी, वृक्षप्रेमी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवरी-कोहमारा- सडक अर्जुनी-गोरेगाव-गोंदिया असा प्रवास करून ही वृक्ष दिंडी गोंदियाला मुक्कम करणार आहे. 29 जून रोज शुक्रवार सकाळी 10 वाजता गोंदिया वन विभागातर्फे कार्यक्रम घेऊन तिरोडा-तुमसर-मोहाडी-भंडारा असा प्रवास करीत भंडारा येथे मुक्काम करणार आहे. 30 जून रोज शनिवारला लाखनी-पालांदूर- लाखांदूर-वडसा-आरमोरी-गडचिरोली आणि मुक्काम. 1 जुलै रोज रविवारला गडचिरोली- चामोर्शी- पोंभुर्णा-चंद्रपूर- मुक्काम 2 जुलैला चंद्रपूर ते वर्धा आणि मुक्काम असा प्रवास राहणार आहे. 3 जुलै रोज मंगळवारला वर्धा- पवनार-सेलू- केळझर- खडकी- सिंदी-बुटीबोरी-नागपूर आणि समारोप असा वृक्ष दिंडी दौरा राहणार आहे.
या संपूर्ण वृक्ष दिंडी दौऱ्यात आ. प्रा. अनिल सोले, अध्यक्ष, ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन प्रामुख्याने उपस्थित राहणार असून वृक्षारोपण करण्याबाबत जनजागृती ते आपल्या मार्गदशनातून करणार आहेत.या संपूर्ण वृक्षदिंडीत त्यांच्यासोबत त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून यात जास्तीत जास्त वृक्षप्रेमी, नागरिक आणि लोकप्रतीनिधिनी भाग घेण्याचे आवाहन अध्यक्ष, ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन आ. प्रा अनिल सोले यांनी केले आहे.

Thursday 28 June 2018

पी. चिदम्बरम यांच्या नातेवाइकाची हत्या


P. Chidambaram's relative murder | पी. चिदम्बरम यांच्या नातेवाइकाची हत्याकोईम्बतुरदि.28 : माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांच्या मेहुणीचे जावई शिवमूर्ती यांचे अपहरण करून, नंतर हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
शिवमूर्ती हे सोमवारी रात्री कार्यालयातून परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर, पोलिसांना वेल्लोरच्या रस्त्यावर शिवमूर्ती यांची कार आढळून आली. शिवमूर्ती आपल्या तिरूपूर येथील कार्यालयातून परतत असताना त्यांचे तीन जणांनी अपहरण केले. त्यांना कोइम्बतूरहून मेट्टापलयम येथे आणण्यात आले. तिथे त्यांची हत्या करण्यात आली आणि नंतर त्यांचा मृतदेह होसूर येथील नाल्यात फेकून देण्यात आला, असे तपासात दिसून आले आहे. शिवमूर्ती यांचा स्वेटरसारख्या वस्त्रांच्या निर्यातीचा व्यवसाय होता. हत्येचे कारण समजू शकलेले नाही.

‘जि. प. तलावांची लीज माफ करा’




गोंदिया, दि.२८ ःः जिल्हा तलावांचा जिल्हा असला तरी मागील वर्षी पावसाने चांगलीच दडी मारल्याने अपेक्षित मत्स्योत्पादन होऊ शकले नाही. या वर्षीची परिस्थितीसुद्धा चिंताजनक आहे. त्यामुळे सन २0१७-१८ करिता जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत असलेल्या मासेमारी तलावांची लीज पूर्णत: माफ करावी, अशी मागणी भोई, ढिवर, कहार व तत्सम मासेमारी समिती जिल्हा गोंदियाने केली आहे. या मागणीचे निवेदन मासेमार समितीचे जिल्हा अध्यक्ष कोमेश कांबळे व प्रतिनिधी मंडळाने २५ जून रोजी जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना सादर केले.
उल्लेखनीय असे की, भंडारा जिल्हा परिषदेने सन २0१७-१८ ची लीज माफ करून मासेमारबांधवांना मोठा दिलासा दिला आहे. निवेदनात या बाबीचा खास उल्लेख करण्यात आला असून गोंदिया जिल्हा परिषदेनेसुद्धा जिल्हा परिषद तलावांची लीज माफ करून मासेमारांना सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.निवेदन देतेवेळी अध्यक्ष कोमेश कांबळे, सचिव दिनेश दुधबुरे, उपाध्यक्ष जयेंद्र बागडे, जयचंद नगरे, गोमाजी शेंडे, राजकुमार कांबळे, सुकलाल उके, हेमराज मेर्शाम,देवेंद्र देवगडे, भाऊलाल तुमसरे, शिवानंद तुमसरे, भारत तुमसरे, रामचंद्र मेर्शाम, प्रमोद मेर्शाम, देबिलाल भूमके, शिवचरण नागपुरे, पवन कांबळे, तुलसीदास वलथरे, महिपाल रेहकवर, अनमोल मारबते, यशवंत दिघोरे उपस्थित होते.

युपीएससी परीक्षाविनाच अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना विरोध

भंडारा दि.२८ ःः: संघ लोकसेवा आयोगाची युपीएससी परीक्षा उत्तीर्ण न करताच भारतीय प्रशासन सेवेतील सनदी अधिकाऱ्यांच्या थेट नियुक्त्या करणारी अधिसूचना सरकारने रद्द करावी, या पदांना आरक्षण लागू करावे याकरिता महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रधानमंत्री व महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन सादर केले आहे.
भारतीय प्रशासन सेवेतील सनदी, प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड संघ लोकसेवा आयोगाची युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच गुवत्तेच्या आधारे करण्याच्या पद्धतीला छेद देत, भारत सरकारने एक अधिसूचना काढून केंद्र सरकारच्या दिल्लीस्थीत दहा महत्वाच्या खात्यामध्ये युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण न होताच धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या सहसचिवांच्या नियुक्त्या करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर खाजगी क्षेत्रात व परदेशी कंपनीत काम करणाºयांनाही संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण न होताच सहसचिव दर्ज्यांच्या नियुक्यांचा लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारची धोरणात्मक व नितीगत निर्णय घेण्यास सक्षम असणारी ही सरकारी पदे भरताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती व इतर मागासवर्गीयांच्या आरक्षीत पदांचा विचार सरकारने केला नसल्यामुळे या जाती जमातीचे प्रशासकीय सेवेतील प्रमाण काहीच राहणार नाही. आधीच मागासवर्गीयांची सनदी, प्रशासकीय व वरिष्ठ स्तरावरील आरक्षीत पदे रिक्त असून ती न भरल्यामुळे मागासवर्गीयांचा अशा पदांचा अनुशेष मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे, असे असताना आरक्षणाचा विचार न करता, सरळ पद्धतीने अशी पदे थेट भरणे म्हणजे केंद्रातील सनदी, प्रशासकीय व धोरणात्मक निर्णय घेणाºया वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नौकरीतील आरक्षण संपविण्यासारखे आहे. सरकारच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत मागासवर्गीयांचा सहभाग सुद्धा राहणार नाही.
भारत सरकाने सहसचिव दर्ज्यांचीच नव्हे तर इतरही अनेक उच्च दर्जाची व महत्वाची मागासवर्गीय व इतर मागासवर्गीयांची पदे पर्याप्त संख्येत भरलेली नसताना, आजही अशी अनेक पदे रिक्त असताना आरक्षित पदांना डावलल्या जात आहे.त्यामुळे भारत सरकारने युपीएससीच्या परीक्षा न घेताच केंद्रात सहसचिव स्तरावरील करावयाच्या थेट नियुक्त्यांची अधिसूचना रद्द करावी, मागे घ्यावी, फेरविचार करावा, या अधिसूचनेनुसार भरावयाच्या पदांना नियमानुसार आरक्षण लागू करण्यात यावे, या अधिसूचनेनुसार भरावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट पद्धतीने होणारी निवड स्थगीत करावी, युपीएससीच्या परीक्षा घेऊनच अधिसूचनेतील प्रशासकीय पदे भरण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
संघटनेच्या शिष्टमंडळात कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय जेष्ठ उपाध्यक्ष अमृत बन्सोड, भंडारा जिल्हा अध्यक्ष गुलशन गजभिये, जिल्हा सचिव नरेंद्र बन्सोड, पी.डी. शहारे, हिवराज उके, डी.एफ. कोचे, आदिनाथ नागदेवे, आनंद गजभिये, मोरेश्वर गेडाम, ए.पी. गोडबोले, एम.डब्ल्यु. दहिवले, इंजि. रूपचंद रामटेके, एम.यु. मेश्राम, अ‍ॅड. डी.के. वानखेडे, संजय बन्सोड, ए.टी. बागडे, एम.एच. गडकरी आदींचा समावेश होता.

वैद्यकिय प्रवेशातील आरक्षणाविरोधात राष्ट्रवादी ओबीसी आघाडीचे निवेदन

गोंदिया, दि.२८ः~गोंदिया जिल्हा राष्टवादी कांग्रेस ओबीसी आघाडीच्यावतीने वैद्यकिय प्रवेशात कमी केलेल्या केंद्रीय कोट्यातील आरक्षणाचा विरोध करण्याकरीता बुधवारला निवासी उपजिल्हािधिकारी मार्फेत निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी ओबीसी आघाडीचे जिल्हाप्रमुख प्रभाकर दोनोडे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करुन वैद्यकी प्रवेश प्रक्रीयेतील ओबीसीवरील झालेल्या अन्यायावर चर्चा करण्यात आली. तसेच ओ.बी.सी च्या जागा पूर्ववत 27% असावेत यासंदर्भात  तसेच ओ.बी.सी. समाजाच्या विवीध मागण्यासंदर्भात प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी गोंदिया मार्फत निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्वारदी कांग्रेस चे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन,  विनोद हरीणखेडे, राजलक्ष्मीताई तुरकर, अशोक शाहारे, जयंत कछवाहा, नानु मुदलियार, देवचंद तरोणे, प्रमोद लांजेवार, डाॅ. कीशोर पारधी, अजय हलमारे,एकनाथ वहीले,चंद्रकुमार चुटे,राजेशकुमार तुरकर, कीरनकुमार बंसोड, नंदकीशोर शरणागत, डा. विनोद पटले, सुखदास धकाते, राजकुमार ठाकरे, लिलाधर डोमळे उपस्थित होते.

पक्ष संघटनेसाठी पदाधिकार्‍यांनी कार्य करावे- माजी आ. जैन

गोंदिया, दि.२८ः-पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकर्‍यांच्या समस्यांकडे लक्ष पुरवावे. याशिवाय पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित सभेत माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
स्थानिक रेलटोली येथील पक्षाच्या कार्यालयात जिल्हा बैठक पार पडली. या बैठकीत नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून पंचम बिसेन यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला. सभेला मार्गदर्शन करताना माजी आ. जैन यांनी पक्ष संघटनेला महत्व देत कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी कार्य करावे, असे निर्देश दिले. या सभेत माजी जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे तसेच नवनियुक्त जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी माजी आमदार दिलीप बन्सोड, विजय शिवणकर, नरेश माहेश्‍वरी, राजलक्ष्मी तुरकर, गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रिकापुरे, किशोर तरोणे, रमेश ताराम, केतन तुरकर, कुंदन कटारे, बालकृष्ण पटले, डॉ. अविनाश काशिवार, कमलबापू बहेकार, लोकपाल गहाणे, तुकाराम बोहळे, मनोज डोंगरे, गणेश बर्डे यांनीही विचार व्यक्त केले. या सभेत मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सभेचे संचालन रवी मुंदडा तर आभार अशोक शहारे यांनी मानले.

Wednesday 27 June 2018

'फडणवीसांभोवती खुन्यांचा वावर; योग्यवेळी फटाके वाजतील'- शिवसेना

uddhav thackeray on dsk issue and home department
मुंबई,दि.27- 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे भोळे सांब आहेत. ते भाजपचे निष्ठावान सेवक आहेत. मुख्यमंत्री म्हणून ते पूर्ण वेळ पक्षविस्तारांत, निवडणूक लढवण्यात व्यस्त असल्याने त्यांचे गृहखात्याकडे दुर्लक्ष आहे. याचा गैरफायदा फडणवीसविरोधी गटाने घेतला. मुख्यमंत्र्यांच्या आसपास अलीकडे संशयास्पद व्यक्तींच्या हालचाली दिसत आहेत. दोन-चार खून करून सुटलेले काही लोक भाजपच्या अंतर्गत गोटात घुसले असून त्यांचा वावर मुख्यमंत्र्यांच्या आसपास दिसतो. याबाबत योग्य वेळी फटाके वाजतीलच,' असा इशारा शिवसेनेने भाजपला दिला आहे. 

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिला आहे. 'गृहखात्यात दिवसा पसरलेल्या अंधाराने मुख्यमंत्री गुदमरले आहेत. गृहखात्यातच मुख्यमंत्र्यांविरुद्ध षड्यंत्र रचले जात असेल तर कसे व्हायचे! फडणवीसविरोधी गटाने गृहखात्यास वाळवी लावली आहे. त्यामुळेच भीमा-कोरेगाव प्रकरणाने महाराष्ट्र पेटला. याच विरोधी गटाने राज्यातील अबलांवर बलात्कार व खून करायला लावले. या विरोधकांनी लातुरात परवा कोचिंग क्लास मालकाचा खून करायला लावला. नक्षलवाद्यांपेक्षा हे भयंकर असून गृहखात्यातील मुख्यमंत्रीविरोधी घुसखोरांशी कुणाचा संबंध आहे? यावर रावसाहेब दानवे, आशिष शेलार, एकनाथ खडसे, नितीन गडकरी वगैरे मंडळींनी तत्काळ झोत टाकायला हवा,' असं आवाहन करतानाच उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. 

BERARTIMES_26JUN-03JUL_2018





संस्था चालकांचे शिक्षण उपसंचालकांना निवेदन

भंडारा,दि.२६ ःशाळा समितीच्या नियमानुसार खासगी शिक्षण संस्थांचे कार्यप्रणाली चालत आलेली आहे. परंतु शिक्षण उपसंचालक, नागपूर यांनी मुख्याध्यापक यांच्या वेतनवाढ संस्थांच्या ठरावाशिवाय करण्याचे पत्र काढल्यामुळे भंडारा जिल्हा संस्था  चालक संघटना आणि महाराष्ट्र राज्य संस्थाचालक संघटना यांनी उपशिक्षणाधिकारी सतीश मेंढे यांना निवेदन दिले. यावर सविस्तर चर्चा करून वेळीच मार्ग काढण्याचे या निवेदनात सांगण्यात आले. शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांनी अशा प्रकारचे पत्र तातळीच रद्द करण्याचे आश्वासन संस्थाचालक पदाधिकाऱ्यांना दिले.
याउपरही शैक्षणिक सत्र आज पासून सुरू होऊन नव्या भरती बाबद शासन स्तरावर अजूनही परीक्षांचे आणि पोर्टलचे वारे वाहत आहेत. सरकारद्वारे मराठी शाळा बाबदचे उदासीन धोरण पाहून सामान्य नागरिक आणि विद्यार्थी त्रस्त झाले आहे. खाजगी अनुदानित शाळांना शिक्षक न मिळाल्यामुळे भरतीवर परिणाम होतांना प्रकर्षाने जाणवते. तर दुसरीकडे शासन समायोजन करण्याचे मुद्दे पुढे आणून शिक्षण क्षेत्रात संदिग्धता निर्माण करीत आहेत. २०१२ पासून शिक्षक भरती बंद आहे आणि २००२ पासून शिक्षकेतर कर्मचारी भरती बंद आहे अशा परिस्थितीत तासिका बेल कोण मारणार असाही सवाल विचारला जातो आहे. यावेळी निश्चय दोनाडकर, दिपक दोनाडकर, नरेश मेश्राम,  दिगंबर मेश्राम, गौतम हुमणे, दिलीप मेश्राम, उमरावजी डोंगरे, हेमंत बांडेबुचे, आल्हाद भांडारकर, लाखनीकर, अण्णाजी फटे, जयपाल वनवे आदी मोठ्यासंख्येने संस्थाचालक उपस्थित होते.

पिंडकेपार येथुन उभरणार वृक्ष लागवडीसाठी लोकचळवळ

 रेव्यानीच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी होणार भव्य वृक्षारोपण
गोरेगाव,दि.२६ :- राज्य शासनाने तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्यिष्ट ठेवले आहे. यावर्षी १३ कोटी वृक्षारोपण करण्याचा संकल्प घेण्यात आला आहे. यासाठी गोंदिया जिल्ह्यातील वांढरा चिचगड येथुन जनजागृतीसाठी २८ जुन रोजी वृक्षदिंडी निघत आहे. ही दिंडी गोरेगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत येणा-या पिंडकेपार या गावी पोहचणार आहे. दिंडीचे स्वागत करण्यासाठी वनविभाग व पिंडकेपार वासी सज्ज झाले आहे. विषेश म्हणजे, १३ कोटी वृक्ष लागवड वनमोहस्तवानिमित्त रेव्यानी च्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा पिडकेपार येथे वृक्षारोपण करून त्या वृक्षांना दत्तक घेण्याचा मानस तेथील गावक-यांनी घेतला आहे.
यावर्षी राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्यात ३१ लाख ६४ हजार वृक्षारोपण करण्यात येणार आहे. जनजागृती करण्यासाठी वांढरा येथुन वृक्षदिंडीची सुरवात वित्त नियोजन व वने महाराष्टÑ राज्य मंत्री सुधिर मुंनगंटीवार यांच्या हस्ते केले जाणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष समाज कल्याण व सामाजीक न्याय मंत्री राजकुमार बडोले, खासदार अशोक नेते, आमदार संजय पुराम, वनविकास महामंडळ चंदनसिंग चंदेल, वांढरा ग्रामचे सरपंच मिराताई कुंजाम,, विधान परिषद सदस्य नागो गानार, रामचंद्र आंबटकर, परिणयम फुके आमदार विजय रहांगडोाले, आमदार अनिल सोले, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, मुख्य वनसंरक्षक संजय गौड, उपवनसरंक्ष मल्लिका अर्जुन, वनराई अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, जि.प. उपाध्यक्ष, अल्ताफ हमीद, आदि उपस्थित राहणार आहेत. हे दिंडी सडक अर्जुनी व गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार येथे पोहोचणार आहे. यासाठी जिल्हा परिषद शाळा पिंडेपार येथे वृक्षदिंडीचे भव्य स्वागत होणार असुन या निमित्ताने स्वर्गीय रेव्यानी राधेश्याम रहांगडाले च्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी भव्य वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या रोपट्यांना गावकरी व जिल्हा परिषद शाळा पिंडकेपार कडुन दत्तक घेण्यात येणार आहे. यासाठी गावकरी व युवक सज्ज झाले आहेत.

Tuesday 26 June 2018

कानाखाली मारून आरक्षणाचा हक्क परत मिळवा- कल्याण सिंह


reservation is your right slap if any body snatch it says kalyan singhलखनऊ,दि.25 (वृत्तसंस्था)- 'कोणी आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या कानाखाली मारून आरक्षण परत मिळवा आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क असून हा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही' असे राजस्थानचे राज्यपाल आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी मागासवर्गीयांना म्हटले आहे. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

काहीही झाले तरी आरक्षणाचा हक्क गमावू नका, असेही कल्याण सिंह यांनी यावेळी सांगितले. आपण घटनात्मक पदावर असल्याने राजकारणाबाबत वक्तव्य करू शकत नाही. मात्र सामाजिक विचार जरूर व्यक्त करू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
'आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष माजी दिवंगत पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी खूप संघर्ष केलेला आहे. त्यांनी मंडल आयोग लागू केला. त्यावेळी देशात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलने झाली, रक्तसुद्धा वाहिले, परंतु त्यांनी कशाचीही पर्वा न करता मंडल आयोग लागू केला. त्यांच्यामुळेच आज तुम्हाला आरक्षण आहे, असे त्यांनी व्ही. पी. सिंग यांच्याविषयी सांगितले.
कुठल्याही वर्गाला आरक्षण मिळाले तरी आपल्याला त्याची चिंता नसावी, परंतु आपला आरक्षणाचा हक्क कोणी हिरावून घेत असेल, तर आपण शांत बसता कामा नये, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य’चा ‘राष्ट्रीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार

नवी दिल्ली,दि.26 – सामाजिक न्याय विभाग केंद्र शासन, दिल्ली तर्फे संपूर्ण भारतात समाजात व्यसनमुक्तीवर कार्य करणाऱ्या संस्था, संघटना व व्यक्ती यांचा सन्मान जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त मंगळवारी (२६ जून २०१८) पुरस्कृत केले गेले. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य गेल्या ५९ वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात २५ पदाधिकारी, ४० संघटक, ५०० स्वयंसेवक यांच्या अथक प्रयत्नांतून कार्यरत असून व्यसनमुक्ती प्रचार, प्रसार, प्रबोधनाच्या माध्यमातून कार्यक्रम राबवत समुपदेशन, उपचार केंद्रामध्ये दाखल करुन त्यांना योग्य ते उपचार देऊन सातत्याने त्यांच्याशी संपर्कात राहुन उपचार्थींना व्यसनमुक्त करण्याचे काम करीत समाजातील व्यसनांना हद्दपार करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. या कार्याची दखल केंद्र शासनाने घेत राष्ट्रीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०१८ ने देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद व सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते गौरवण्यात आलेले आहे. हा पुरस्कार नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व चिटणीस अमोल स. भा. मडामे यांनी स्वीकारला. यावेळी राष्ट्रपती यांनी आपण सर्व व्यसनमुक्तीचे  ब्रँण्ड अॅम्बेसेडर असल्याचे मनोगत व्यक्त केले.

जि.प.अध्यक्षांच्या गावातच आरोग्य केंद्राला ठोकले गावकऱ्यांनी कुलूप

अमरावती,दि.26- चांदूर रेल्वे तालुक्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांचे गाव पळसखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला रात्री ११ च्या सुमारास गंभीर स्थितीत उपचारासाठी नेले असता, मुख्य डाॅक्टरसह सहायकही उपस्थित नसल्याचे बघून गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला रात्री ११.३० च्या सुमारास कुलूप ठोकून नाराजी व्यक्त केली. त्यामुळे गावात खळबळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य बघून जि. प. अध्यक्ष नितीन गोंडाणे यांना पीएचसीकडे धाव घ्यावी लागली. त्यांनी गावकऱ्यांची समजूत घालून त्यांना शांत केले.जि. प. अध्यक्षांच्या गावातील ही स्थिती तर इतर गावातील स्थिती कशी असेल, अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. निवासी डॉक्टर उपस्थित नसल्याने योग्य उपचार होऊ शकला नाही. रुग्णाची गंभीर स्थिती बघून त्याला १०८ रुग्णवाहिकेतून चांदूर रेल्वे येथे पाठवले. सध्या गोपालची प्रकृती स्थिर आहे. मात्र पीएचसीमध्ये उपस्थित राहणे गरजेचे असताना निवासी डाॅक्टर अनुपस्थित असल्याने गावकरी संतापले.

पदवीधर तरुणाची आत्महत्या

भंडारा,दि.26ः-शहराच्या काझीनगर परिसरात बेरोजगारीमुळे आलेल्या नैराश्यापोटी राहत्या घरात २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.२४)  उघडकीस आली.
प्रमोद भाऊराव निमजे असे मृत तरुणाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रमोद नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होता. त्याचे पदवीपयर्ंत शिक्षण पूर्ण झाले होते. मात्र नोकरी मिळविण्यात सतत अपयश येत असल्याने तो तणावात होता. रविवारी घरी कुणीच नसल्याने त्याने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. त्याने स्लॅबच्या हुकला साडीच्या लाल रंगाच्या लेसने गळफास लावून आत्महत्या केली. प्रमोदने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतल्या ओळी मन सुन्न करणार्‍या आहेत. या चिठ्ठीत प्रमोद म्हणतो की, ‘मम्मी-पप्पा सॉरी, मी तुमच्यासाठी काहीच करू शकलो नाही’ मी माझ्या पूर्ण शुद्धीत हे पाऊल उचलत आहे. त्यासाठी माझे कुटूंबीय किंवा इतर कुणालाही जबाबदार धरू नये. मी माझ्या आयुष्याला खूप कंटाळलो आहे. त्यामुळे आता मला जगायची कुठलीच आस नाही. मी जे करतोय त्याला सर्वतोपरी मीच जबाबदार आहे. म्हणून माझ्या मागे कुणालाही त्रास द्यायची गरज नाही.’ याप्रकरणी भंडारा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून र्मग दाखल केला असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार ईलमकर करीत आहेत.

विरोधीपक्ष नेते स्व.पी.डी.रहागंडाले यांच्या पत्नी शांताबाई रहागंडाले यांचे निधन

गोंदिया,दि.२६-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व विरोधी पक्षनेते स्व.पी.डी.रहागंडाले यांच्या धर्मपत्नी शांताबाई रहागंडाले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले.त्या प्रविण व यशपाल रहागंडाले(वडद,कटंगटोला)यांच्या आजी होत.त्यांच्यावर बुधवार २७ जून रोजी सकाळी ९ वाजता गोंदिया येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.रेलटोलीस्थित त्याच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघेल.

प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली आत्महत्या

अमरावती,दि.26 : नजीकच्या गोरेगाव येथील एका प्रेमीयुगुलाने नरखेड-अमरावती रेल्वेवरील बेनोडा येथे मालगाडीखाली आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. वीरेंद्र राजूलाल आहाके (२२) असे यातील युवकाचे नाव असून मुलगी अल्पवयीन आहे.
वरूड तालुक्यातील गोरेगाव येथील या युगुलाचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या आंतरजातीय प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध असल्याने शनिवारी ९.३०च्या सुमारास ते घरून पळून गेले. त्यांनी लग्न करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्याने तो यशस्वी होऊ शकला नाही. अखेर कंटाळून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. वीरेंद्रने रविवारी रात्री घरी फोन करून ‘हा माझा शेवटचा फोन’ असल्याचे कळविले होते.

लाखनी ओबीसी सेवा संघानेही नोंदविला केंद्रसरकारचा निषेध

लाखनी,दि.25ः- वैद्यकीय प्रवेशात ओबीसी प्रवर्गाला केंद्रीय कोट्यातील प्रवेशामध्ये २७ टक्के आरक्षण न देता फक्त २ टक्केच आरक्षण देण्यात आल्याच्या निषेधार्थ लाखनी तालुका ओबीसी सेवा संघ,ओबीसी विद्यार्थी संघटनेच्यावतीने तहसिलदारांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात केंद्र सरकारने ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर केलेला अन्याय त्वरीत दूर करण्यात यावे. आरक्षणाच्या धोरणानुसार एस.सी. व एस.टी प्रवर्गाला नियमानुसार आरक्षण देण्यात आले आहे. परतु ओबीसी प्रवर्गाला २७ टक्के आरक्षण असतांना देखील फक्त २ टक्केच आरक्षण केंद्रीय वैद्यकीय प्रवेश समितीने दिल्याने ओबीसींच्या २५ टक्के जागा अनारक्षित खुल्या प्रवर्गाकडे वळविल्या गेल्या आहेत.त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यावर केंद्रातील सरकारने केलेला अन्याय त्वरीत दूर करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष उमेश सिंगनजुडे, उपाध्यक्षअशोक फ.गायधनी ,शिक्षकपरिषदेचे यादवराव गायकवाड ,सचिव गोपाल नाकडे, शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष्य बाबूरावजी निखाडे ,प्राथमिक शिक्षक संघाचे रशेषश्कुमार फटे, अशोक देशमुख भास्कर गिर्हेपुंजे, लाकेश धरमसारे सुनील चाफले ,नरेंद्र झलके,नरेश भदाडे उपस्थित होते.

ओबीसी संघर्ष कृती समितीचा चक्का जाम: केंद्रसरकारच्या नोंदविला निषेध

चक्काजाम करून केंद्र शासनाच्या आरक्षण नीतीचा विरोध
ओबीसी संघटनेचा राज्यातील पहिलाच रास्ता रोको आंदोलन

गोंदिया,दि.25ः- : मंडल आयोगावरील सर्वोच्च न्यायालयाचा ओबीसी आरक्षणाचा निकाल डावलून ओबीसींचे २७ टक्के असलले आरक्षण वैद्यकीय प्रवेशाच्या वेळी केंद्रीय कोट्यात केवळ २ टक्के एवढे करून ओबीसी विद्यार्थ्यांना वैद्यकीय  प्रवेशापासून केंद्र सरकारने वंचित केले. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोधात गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती, राष्ट्रीय ओबीसी महासंघ,ओबीसी सेवा संघ व बहुजन एकता मंचसह सर्व ओबीसी समाज संघटानानी निषेध नोंदवित आज (दि.२५) स्थानिक जयस्तंभ चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन करून चक्काजाम आंदोलन केले.ओबीसी सघटनेच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा एैनवेळेवर करण्यात आल्याने बंदोबस्तासाठी नसलेल्या पोलीस प्रशासनाची चांगलीच ताराबंळ उडाली.संघटनेच्या महिला पुरुषासह युवक पदाधिकारी यांनी जयस्तंभं चौकातील चारही बाजूने रस्त्यांना घेराव घालून आंदोलन केले.सुमारे अर्धातास चाललेल्या या आंदोलनामुळे शहरातील वाहतुक व्यवस्था चांगलीच खोळबंली गेली.
विशेष म्हणजे महाराष्ट्रात आजपर्यंत ओबीसी संघटनानी निवेदने देऊन धरणे आंदोलन केली.मात्र रास्तारोकोसारखे आंदोलन केली नव्हती यावेळी मात्र गोंदियाच्या ओबीसी संघर्ष कृती समितीने सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदविण्यासाठी आक्रमक होत रास्तारोको आंदोलन केले,हे आंदोलन ओबीसी संघटनेच्यावतीने केलेले पहिलेच आंदोलन ठरले आहे.त्यातच यापुढे नागपूरात सुरु होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्याा पुर्वी जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदाराच्या निवासस्थानी सुध्दा आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.भंडारा-गोंदिया जिल्ह्यात ओबीसी संघटनेच्या कारकिर्दिला उद्या 26 जून रोजी दोन दशक पुर्ण होत आहेत.26 जून 1998 रोजी जिल्ह्याती गोरेगाव येथे ओबीसी संघटनेची स्थापना करण्यात आली होती.त्यासंघटनेच्या दोनदशक काळाच्या पुर्वसंध्येला ओबीसी संघटनेने केलेले हे आंदोलन या जिल्ह्यातील ओबीसी समाजाला संघटित करण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.चक्काजामनंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली.
विशेष म्हणजे, संघटनांच्या वतीने राज्यातील पहिलेच चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यापूर्वी निवेदन अथवा धरणेच्या माध्यमातूनच हे आंदोलन करण्यात येत असे.ओबीसीनी हे आंदोलन शातंतेत केल्याने या आंदोलनाबद्दल शहरातही कौतुक केले जात होते.कुठलेही तोडफोड नाही किंवा हाणामारी नाही त्यातच अनेक व्यवसायकिंनी ओबीसी आत्ता जागे झाले त्यांच्यावर झाले असून अन्यायाच्या विरोधात अधिक लढाई त्रीव होणार अशा प्रतिक्रिया होत्या.पोलीस निरिक्षक मनोहर दाभाडे यांच्या चमूनेही आंदोलकांची भूमिका समजून घेत त्यांना सहकार्य केले.तर आंदोलकानीही पोलिसांना सहकार्य केले.
केंद्र शासनाच्या केंद्रीय आरक्षणानुसार वैद्यकीय प्रवेशासाठी १५ टक्के आरक्षण ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून केंद्र शासनाच्या वतीने हे आरक्षण २ टक्क्यावर आणण्यात आले आहे. तसेच ओबीसींच्या २५ टक्के जागा अनारक्षित खुल्या प्रवर्गांकडे वळविलेल्या आहेत. एस.सी. प्रवर्गासाठी १५ व एस.टी. साठी ७ टक्के जागा आरक्षित करून ७६ टक्के जागा केवळ खुल्या प्रवर्गासाठी ठेवलेल्या आहेत. यातही राज्यातील २१ शासकीय व अनुदानित वैद्यकीय महाविद्यालय तसेच केंद्र शासनाच्या यादीमधील १७७ महाविद्यालयांत ओबीसी विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी आरक्षणच ठेवले नाही. त्यामुळे विज्ञान विषयात चांगले गुण घेवून बारावीची परीक्षा पास केलेल्या व सीईटीमध्ये उत्तम गुण घेवून उत्तीर्ण झालेल्या ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार केंद्र शासनाने सुरू केल्याच्या निषेधार्थ आज धरणे आंदोलनासह चक्काजाम आंदोलन करण्यात आले. स्थानिक जयस्तंभ चौक येथील ओबीसी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात झाली. उपस्थित बांधवांनी वैद्यकीय क्षेत्रातील आरक्षणाच्या मुद्यावरून शासनाला चांगलेच धारेवर धरले. आंदोलनानंतर जयस्तंभ चौक येथील चहू बाजूचे रस्ते रोकून तासभर आंदोलन केले. दरम्यान, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दाभाडे यांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून पोलिस ठाण्यात नेले.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, कार्याध्यक्ष अमर वराडे, मार्गदर्शक  आनंदराव कृपाण, प्रा.एच.एच. पारधी,खेमेंद्र कटरे,कैलास भेलावे, राजेश नागरीकर, मनोज मेंढे, सावन डोये,प्रा.बी.एम.करमकर,सावन कटरे,लक्ष्मण नागपूरे, गौरव बिसने,  सुनिल भोंगाडे, अल्काताई कृपाण,विमल कटरे,सविता बेदरकर,पुष्पाताई खोटेले,शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे,भाकपचे हौसलाल रहांगडाले,परेश दुरुगकर,मिलिंद गणवीर, विनोद हरिणखेडे, मनोज शरणागत, डी.एस. मेश्राम, पी.डी. चव्हाण, प्रेमलाल साठवणे, रवी भांडारकर,हरिष कोहळे,दिनेश हुकरे,प्रा.काशीराम हुकरे,जितेश टेंभरे,हरिष ब्राम्हणकर,लिलाधर गिरेपुंजे,उमेंद भेलावे,सुनिल भोगाडे,रवी दखने,भोजू फुंडे,बंशीधर शहारे,नाननबाई बिसेन,धनपाल कावळे,रुपसेन बघेले,राजू ब्राम्हणकर,कमलबापू बहेकार,निलम हलमारे,राजीव ठकरेले  सुनील तरोणे,बालू गंधे,सोनू पारधी,शेरु यादव,विशाल वानखेडे,संतोष यादव,राजू रहागंडाले,नरेंद्र पदमाकर,ओमेंद्र पारधी,राजेश कापसे,अनिल मुनेश्वर,विजय मुनेश्वर,महेंद्र बिसेन,मनोड डोये,ज्योतीबा धरमशहारे,शिव नागपूरे,दिपक बहेकार  यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी समाजातील महिला पुरुषबांधव सहभागी झाले होते.

Monday 25 June 2018

आपतग्रस्त परिवाराला बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांच्याकडून आर्थिक मदत

गडचिरोली,दि.25:- सिरोंचा तालुक्यातील टेकडाताला येथील आपतग्रस्त परिवाराला नुकतेच बांधकाम व वित्त सभापती भाग्यश्री आत्राम यांच्याकडून आर्थिक मदत देण्यात आली.नामे वेंकटी दुर्गम यांच्या घराला आग लागली होती. वेंकटी दुर्गम यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या वित्त तथा बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनी सिरोंचा तालुक्यातील टेकडाताला गाठून त्यांच्या परिवाराला भेट दिल्या आणि परिस्थिती जाणून घेतल्या.यावेळी वेंकटी आणि त्यांच्या पत्नीने घरी कोणीही नसताना अशी घटना घडल्याचे सांगितले.त्यांना लहान-लहान मुलंबाळं असल्याने आर्थिक संकट कोसळल्याने समजताच भाग्यश्री आत्राम यांनी मोठी रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली आहे. त्यामुळे वेंकटी दुर्गम यांना खुप मोठा आधार मिळाला आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिरोंचा तालुका उपाध्यक्ष सत्यण्णा पिडगू,राका चे संयोजक निलवार जी,जेष्ठ कार्यकर्ते चीनण्णाजी तसेच टेकडाताला येथील राका चे समस्त कार्यकर्ते उपस्थित होते.

आयएमए गोंदिया नवीन कार्यकारिणी पदग्रहण सोहळा

गोंदिया,दि.25ः- येथील आयएमए(  Indian medical association Gondia)  चा पदग्रहण सोहळा गोंदियाचे प्रसिध्द बालरोगतज्ज्ञ डॉक्टर सुधीर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली  आयएम सभागृहात पार पडला. डॉक्टर निर्मला जयपुरीया यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली तसेच सचिव पदावर डॉ. संजय डी. भगत यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष म्हणून डॉक्टर नरेश मोहरकर यांची नियुक्ती करण्यात आली. या समारंभात डॉक्टर सोमानी, डॉ. राजेंद्र जैन, डॉ. पुरोहित, डॉ.बाहेकर,डॉ.बग्गा, डॉ. जयपुरिया, डॉ.घनश्याम तुरकर,डॉ.धारस्कर, डॉ.चिटणवीस तसेच सर्व आयएमए सदस्य उपस्थित होते.आयएमए  अध्यक्ष डॉ. संजय अग्रवाल तसेच सचिव डॉ. निलेश जैन यांनी त्यांच्या कारकिर्दीतील केलेल्या कामाचा आढावा दिला. मावळते कोषाध्यक्ष डॉ. आनंद इसरका यांनी प्रास्तविक केले.डॉ.निर्मला जयपुरीया यांनी तपासणी शिबिर, डॉक्टर रुग्णातील संबध, वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन यांच्यावर विचार व्यक्त केले.आभार नवनियुक्त सचिव डॉ. संजय डी भगत यांनी मानले.

स्वच्छता अभियानाचे वाजले तीन तेरा

 स्वच्छता ही सर्वांचीच जबाबदारी
मोहाडी,(नितीन लिल्हारे),दि.25ः-: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम अभियान सुरु करण्यात आले. पारितोषिक मिळविण्याच्या उद्देशाने का होईना ग्रामीण भागातील गावे स्वच्छ व सुंदर बनली होती. मात्र विद्यमान माणसांना, लोकप्रतिनिधी, शासन- प्रशासन व सरपंचांना  स्वच्छ भारत अभियानाचा पुरता विसर पडला आहे.
मोहाडी तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतीच्या गावामध्ये जागोजागी अस्वच्छता दिसून येत आहे. सालई खुर्द परिसरा बरोबर टाकला, काटेबाम्हणी,उसर्रा, विहिरगाव,अकोला, डोंगरगाव, भिकारखेडा, टांगा, ताळगाव, धोप, मलदा, सकरला, शिवणी, आंधळगाव  आदी गावात सर्वत्र घाणच घाण दिसून येत आहे. गावातील नागरिकांनी घरातील सांडपाणी शोचखड्डे तयार करून साठवायचे असते. मात्र कुणाचीही तमा न बाळगता तो वर्दळीच्या रस्त्यावर टाकले जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकारामुळे तालुक्यात स्वच्छ भारत अभियानाचा पुरता फज्जा उडाला आहे. हातात झाडू घेऊन केवळ फोटो काढण्यापुरतेच स्वच्छता अभियान राबविल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा या महापुरुषांच्या नावाने सुरु केलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाचा आता अनेक गावांना विसर पडलेला दिसून येत आहे.
शौचालय बांधले, मात्र वापरावर प्रश्नचिन्ह  मोहाडी पंचायत समिती अंतर्गत ७५ ग्रामपंचायतीचा समावेश असून १०८ गावांचा समावेश आहे. या गावामध्ये स्वच्छ भारत अभियान १०० टक्के राबविण्याचे प्रमाणपत्र सर्व ग्रामपंचायतीला देण्यात आले. स्वच्छता अभियान राबविण्याच्या वेळेस वेगवेगळ्या अँगलमध्ये फोटो काढून कांगावा करण्यात आला. त्यानंतर या अभियानाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या अभियानाचा फज्जा उडाला. ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले. मात्र बांधण्यात आलेल्या शौचालयाचा वापर होत आहे का? याची प्रत्यक्ष तपासणी झाल्याचे दिसून येत नाही. ग्रामीण भागात अजूनही उघड्यावर शौचास जाण्याचा प्रकार दिसून येत आहे. अनेकांनी शौचालयांना स्नानघर बनविले आहे.
शासनाने रोगराईवर आळा घालण्यासाठी स्वच्छता किती महत्वाची आहे, याचे विविध योजनेतून प्रबोधनातून बाळकडू पाजले. व तसे निर्देशही दिले. पण येथील समाजमन स्वच्छतेविषयी जागृत नाही. म्हणून प्रशासनाने राबविलेला स्वच्छता अभियान केवळ कागदावरच असल्याचे चित्र भेजगाव परिसरात पहावयास मिळत आहे.   स्वच्छता ही सर्वांचीच जबाबदारी आहे. हे येथील समाजमन मानायला तयार नाही. घरातील कचरा रस्त्यावर फेकण्याची सवय अजूनही नागरिकांची गेली नाही. म्हणून कचरा वाढत आहे. गावेच्या गावे कचरामय होताना दिसत आहेत. स्वच्छ भारत मिशनमुळे स्वच्छतेची जाणीव प्रत्येकाला व्हायला पाहिजे होती. मात्र ती अद्यापही झालेली नाही. यामुळे आजघडीला स्वच्छता टिकवून ठेवणे लोकांना जमले नाही. परिणामी या योजनेचा फज्जा उडाल्याची चित्र दिसून येत आहे.

शाखा अभियंता शैलेष कटरे यांचे निधन




गोंदिया,दि.25ः-येथील सिव्हील लाईन निवासी गोंदिया जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागात कार्यरत शाखा अभियंता शैलेष कटरे यांचे आज सोमवारला पहाटे निधन झाले.ते गेल्या दोन तिनदिवसापासून आजारी होते.त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच निधन झाले.आज दुपारी 12.30 वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या सिव्हीललाईन निवास्थान येथून निघेल.येथील मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या मागे बराच मोठा आप्तपरिवार आहे.

रेल्वेरुळाशेजारी आढळला बिबट मृतावस्थेत

नागभिड,दि.24 : नागभिड तालुक्यातील किरमिटी (मेंढा) रोड जवळील रेल्वेरुळाच्या छोट्या पुलाजवळ रविवार सकाळच्या सुमारास मृतावस्थेत बिबट आढळून आला.लगेच नागभिड वनपरिक्षेत्रांच्या वरिष्ठांना माहिती देण्यात आली.अधिकार्यानीही माहिती मिळताच घटना स्थळ गाठले आहे. बिबट्याचा बछ्डा असून बिबटयाच्या मृत्युचे कारण अद्याप कळले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळू शकणार आहे.

मणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रदूषणाचा मुद्दा विधानसभेत गाजणार




चंद्रपूर,दि.24ः- कोरपना तालुक्यातील गड़चांदुर येथील माणिकगड सिमेंट व पॉवर प्लांटच्या वायुप्रदूषणामुळे गडचांदुर व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय धोटे यांनी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधण्याची तयारी केली आहे. मणिकगड सिमेंट कंपनीद्वारे होणारे हवा, वायु, जल, केमिकल मिश्रित धुळ यासबंधी प्रश्न उपस्थित केले जाणार आहे.
मणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रदुषणामुळे गड़चांदुर व परिसरातील जनआरोग्यचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे अनेक आजार जडले जात आहे. हे मानवी आरोग्य दृष्टीने अतिशय हानिकारक व शरीराला बाधा पोहचविणारे आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतपिकांवरसुद्धा याप्रदूषणाचा परिणाम होत आहे. तसेच जिल्हाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाने जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होते किंवा कसे काय ? व यासर्व बाबींचा शेतमालावर काय परिणाम होत आहे याबाबत अहवाल सादर करण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा कृषी अधिक्षक यांना आदेश दिले होते परंतू २ महिने उलटूनही याबाबतचा अहवाल सादर झाला नाही.
तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने आमदार संजय धोटे यांना दिलेल्या अहवालात माणिकगड सिमेंट कंपनी यांनी प्रदूषण रोखण्याकरिता उभारलेली यंत्रना हि अपुरी असल्याचा अहवाल सादर केला होता.परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीवर पाहिजे त्याप्रकारे कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे ही गंभीर बाब लक्षात घेऊन  नागरिकांच्या आरोग्याच्या दृस्टिकोणातून हा प्रश्न आमदार धोटे यांनी उपस्थित करण्याचा मानस व्यक्त केला आहे. कंपनीच्या प्रदुषणाबाबत भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी निवेदन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार संजय धोटे यांना निवेदन दिले आहे.

स्कॉर्पिओ व ट्रकची समोरासमोर धडक, तीन जणांचा जागीच मृत्यू

यवतमाळ,दि.24ः- – वणी ते चंद्रपूर मार्गावरील शहरालगत असलेल्या टोलनाक्याजवळ स्कॉर्पिओ व ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.  तर पाच जण गंभीररीत्या जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. प्रमिला रामकृष्ण आस्वले (४५), शशीकला पंढरीनाथ कुबडे (४८) व प्रशांत देवराव खाडे (२५) सर्व रा.जैन ले-आऊट वणी अशी मृतांची नावे आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.

नक्सलियों ने पटरियां उखाड़ी, मालगाड़ी के 3 इंजन सहित 8 डिब्बे पटरीसे उतरे

दंतेवाड़ा,दि.24। छत्तीसगढ़ के धुर नक्सली क्षेत्र दंतेवाड़ा में नक्सलियों ने रेल पटरियों को निशाना बनाया है। नक्सलियों ने शनिवार रात को लाइन रेलवे ट्रैक को उखाड़ दिया। इसके चलते एक मालगाड़ी डिरेल हो गई। मालगाड़ी के 3 इंजन सहित 24 डिब्बे पटरी से उतर गए। ट्रेन के चालक और गार्ड से नक्सली उनका वॉकी टॉकी भी छीन ले गए।सूचना है कि मालगाड़ी के 8 डिब्बे पुलिया से नीचे जा गिरे हैं। रेलवे और पुलिस विभाग के अधिकारी मौके पर पहुंच चुके हैं। वह रेल आवागमन को सामान्य करने में जुटे हैं। राहत की बात रही की इस घटना में कोई जनहानि नहीं हुई।
नक्सली मनाएंगे दमन विरोधी सप्ताह
जवानों के ऑपरेशन के खिलाफ नक्सली आर्थिक नाकेबंदी करेंगे और दमन विरोधी सप्ताह मनाएंगे। इसके लिए 28 जून से 2 जुलाई की तारीख तय की है। इससे पहले ही नक्सलियों ने इस बड़ी घटना को अंजाम दिया है।- मौके पर नक्सलियों के फेंके पर्चे भी बरामद हुए हैं। इनमें से एक पर्चे को वहीं पेड़ पर लगाया गया था। इसमें लिखा है कि शिक्षा, स्वास्थ्य सेवाओं को प्राइवेट कंपनियों को देकर जनता के साथ धोखा किया गया है। इस निजीकरण के खिलाफ संघर्ष करेंगे।
छत्तीसगढ़ के नक्सल प्रभावित सुकमा से पुलिस ने शनिवार को नक्सलियों के चार सहयोगियों को गिरफ्तार किया है। पकड़े गए चारों आरोपी आईईडी लगाने की फिराक में घूम रहे थे। पुलिस ने सूचना के बाद जंगल में सर्चिंग ऑपरेशन चलाया था। आईजी विवेकानंद सिन्हा ने इसकी पुष्टि की है।पकड़े गए नक्सल सहयोगियों में बुस्का सोढ़ी, वंजामी मंगा, सोढ़ी नंदा, भैरम सिंह शामिल है। सभी थाना कुंभलगढ़ जिला सुकमा के निवासी है। आरोपियों के पास से कई नक्सली उपयोगी सामान और विस्फोटक सामग्री बरामद हुई है।

Sunday 24 June 2018

सिमावर्ती प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी गुरुवारी शिष्टमंडाळासोबत करणार चर्चा

बिलोली(सय्यद रियाज ),दि.24ः- बिलोली विश्राम गृहात सिमावर्ती भागाचे प्रश्न याविषयी बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणिस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विकासाचा आराखडा सादर करण्याचे ठरले. दरम्यान जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी या विषयी गुरुवारी शिष्ट मंडळास चर्चेसाठी पाचारण केले आहे. या चर्चेसाठी अकरा व्यक्तीचे शिष्टमंडळ भेटणार आहे.
 या बैठकीत मागील चार बैठकाच्या आढावा घेण्यात आला. याचबरोबर मुख्यमंञ्याकडे सादर करावयाचा विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. सर्वसंमतिने सामुयिक विकासाचे सर्व समावेशक निवेदन तयार करण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी गुरुवार दि.28 जुन 2018 रोजी विकास विषयक निवेदनाच्या चर्चेसाठी पाचारण केले आहे.प्रारंभी निवेदन चर्चा गरज पडली तरच आंदोलन करावे अशी भुमिका सर्व सदस्यांनी मांडले.शेतकऱ्यांच्या पेरणीचे दिवस असल्याने यात जनतेच्या प्रश्नांसाठी शेतकऱ्यांना गुंतवल्या जावू नये.अशी भुमिका काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सदर याबैठकीत ज्येष्ठ पञकार तथा प्रश्न सिमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक श्री गोविंद मुंडकर,गंगाधरराव प्रचंड,माजी नगराध्यक्ष जावेद मजीदसेठ, राजु पाटील शिंपाळकर, राजेंद्र पा.जामनोर कारलेकर, सिध्दनोड व्यंकटरराव, माधव हळदेकर, देविदास कोंडलाडे,नागोराव लोलापोड, संतोष मेहरकर,गंगाधरराव गटूवार, दमय्यावार श्रीनिवास,गंगाधरराव कोंडावार,नरसिंग कलमुर्गे,नरसिंमलु कोटलावार,नरसिंमलु कोंडावार, बालाजी महाजन आदीनी सहभाग घेऊन सुचना मांडल्या. तब्बल चार तास चाललेल्या बैठकीत विविध विकास विषयक घडामोडीवर चर्चा करून पुढील कार्याचे रुपरेषा ठरविण्यात आली.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...