अमरावती,दि.26- चांदूर रेल्वे तालुक्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांचे गाव पळसखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला रात्री ११ च्या सुमारास गंभीर स्थितीत उपचारासाठी नेले असता, मुख्य डाॅक्टरसह सहायकही उपस्थित नसल्याचे बघून गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला रात्री ११.३० च्या सुमारास कुलूप ठोकून नाराजी व्यक्त केली. त्यामुळे गावात खळबळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य बघून जि. प. अध्यक्ष नितीन गोंडाणे यांना पीएचसीकडे धाव घ्यावी लागली. त्यांनी गावकऱ्यांची समजूत घालून त्यांना शांत केले.जि. प. अध्यक्षांच्या गावातील ही स्थिती तर इतर गावातील स्थिती कशी असेल, अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. निवासी डॉक्टर उपस्थित नसल्याने योग्य उपचार होऊ शकला नाही. रुग्णाची गंभीर स्थिती बघून त्याला १०८ रुग्णवाहिकेतून चांदूर रेल्वे येथे पाठवले. सध्या गोपालची प्रकृती स्थिर आहे. मात्र पीएचसीमध्ये उपस्थित राहणे गरजेचे असताना निवासी डाॅक्टर अनुपस्थित असल्याने गावकरी संतापले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment