Tuesday 12 June 2018

शिक्षण विभागाचे प्रधानसचिव नंदकुमारांची अखेर बदली

मुंबई,दि.11ः- राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने आज वरिष्ठ आयएएस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेले शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची सामान्य प्रशासन विभागात हकालपट्टी करण्यात आली आहे.नंदकुमार यांच्याबद्दल शिक्षणक्षेत्रात मोठा रोष उफाळून आलेला होता. 8 वरिष्ठ अधिका-यांचा खांदेपालट करण्यात आला आहे.त्यामध्ये शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची अखेर बदली करण्यात आली असून, त्यांना सामान्य प्रशासन विभागात पाठवण्यात आले आहे. बांधकाम विभागात आशिषकुमार सिंह यांच्या जागी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सतीश गवई यांची पर्यावरण विभागातून उद्योग विभागात बदली करण्यात आली आहे. सुनील पोरवाल हे गृह विभागाचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव असणार आहेत.आतापर्यंत गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असलेले सुधीर श्रीवास्तव यांची बदली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव अनिल डिगीकर यांची बदली पर्यावरण विभागात करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह यांची बदली परिवहन विभागात करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...