तिरोडा,दि.16 : तालुक्यातील इसापूर येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून विनयभंगाचा व्हिडीओ तयार करून तो व्हाट्सअप वर व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी तिरोडा येथील तीन युवकांना तिरोडा पोलिसांनी अटक केली आहे. तालुक्यातील इसापूर येथील फिर्यादी १५ वर्षीय मुलगी २० एप्रिल रोजी चुरडी रोड जवळील एका झाडाखाली आपल्या मैत्रिणींसह नास्ता करीत असतांना तिरोडा येथील ३ युवकांनी तिचा विनयभंग करून संगनमताने विनयभंगाचा विडिओ तयार केला.त्यानंतर तो व्हाट्सअपवर व्हायरल करून बदनामी करून मारहाणाची धमकी दिल्याच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भादवी कलम ३५४ (ड) ५०४, ५०६, ३४ RW ४-६-८-१०-६७ ITC कलम १०,२००८ व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.या प्रकरणात हर्षल आत्माराम सरोदे (२४) नेहरू वार्ड तिरोडा,भुवन उमानंद नागरीकर व नयन सुनील नागरीकर दोन्ही राहणार भूतनाथ वार्ड तिरोडा यांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment