Sunday 10 June 2018

चिचगड-ककोडी रस्ता बांधकामात अनियमितता


निकृष्ट बांधकामावर अभियंत्याचे मौन

चिचगड,दि.५- चिचगड ते ककोडी या २० किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरण्याचा कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता असून रस्त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. या प्रकरणातील अनियमिततेची चौकशी करून भ्रष्टाचारावर अंकुश लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, या बांधकामाची जबाबदारी असलेले सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी बाळगलेले मौन हे या गैरव्यवहाराची साशंकता वाढवीत असल्याचे चित्र आहे.
सविस्तर असे की, गेल्या दोन महिन्यापासून ककोडी ते चिचगड या राज्यमार्गाची दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम, उपविभाग देवरीच्या मार्फत केले जात आहे. या कामाचे कंत्राट गोंदियाच्या एका कंत्राटदाराला असून या बांधकामावर २ कोटी ९५ लाखाचा खर्च प्रस्तावित आहे. या रस्त्यावरील डांबराचे जुने थर काढून नवे कोट करणे आणि साइट भरणे असे कामाचे स्वरूप असताना संबंधित कंत्राटदाराने देखावा म्हणून केवळ निवडक ठिकाणी डांबराचे थर काढले. मात्र, मोठ्या प्रमाणावर आहे त्याच परिस्थितीत रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा सपाटा कंत्राटदाराने लावला आहे. याशिवाय साइट भरण्यासाठी मुरूम टाकण्याऐवजी रस्त्याच्या कडेला खोदकाम करून साइट भरणे सुरू आहे.
सदर परिसर हा नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील असल्याने वरिष्ठ अधिकाèयाचे या क्षेत्रातील विकास कामांवर फारसे लक्ष नसते. परिणामी, कंत्राटदार आणि अभियंते विकास कामात मोठ्याप्रमाणावर गैरप्रकार करीत असल्याचे नेहमीचे गाèहाणे आहे. याशिवाय या मार्गावरून टोल व पथकर आणि सीमा तपासणी चुकविण्यासाठी छत्तीसगड राज्यातील वाहने या आडमार्गाचा वापर करीत असतात. यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर जड वाहने धावत असतात. याकडे सुद्धा शासनाचे लक्ष नसल्याने अधिकाèयांच्या अवैध कमाईत वाढ झाल्याचा आरोप होत आहे. परिणामी, या रस्त्याच्या बांधकामावर लक्ष दिल्यास रस्ता दुरुस्तीचा फायदा अधिककाळ होणार आहे. तरी या गैरप्रकारावर वरिष्ठ अधिकारी आणि शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, या संबंधी अधिक माहिती जाणून घेण्याकरीता देवरीच्या गुप्ता नामक अभियंत्याला फोन लावला असता त्यांनी फोन स्वीच ऑफ केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...