वर्धा,दि.16- शेतकऱ्याला सात बारा देण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना जामनी येथील तलाठी विनोद रघुनाथ खेकडे याला एसीबी वर्धा दलाने अटक केली. शेतकऱ्याला शेती कामासाठी सात बारा पाहिजे होता, परंतु तलाठी खेकडे त्याला सात बारा देत नव्हता. सात बारा हवा असेल तर ५०० रुपये द्यावे लागतील असे तलाठ्याने शेतकऱ्याला सांगितले.शेतकऱ्याने बाबत वर्धा एसीबी दलाकडे तक्रार केली त्यावरुन एसीबी दलाने सापळा रचून हिंगणघाट येथील प्रशासकीय भवनाजवळ ५०० रुपयांची लाच घेताना तलाठी खेकडे याला अटक केली. ही कार्यवाही १५ जून सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास उपअधीक्षक बाळासाहेब गावंडे, पोलिस निरीक्षक सुहास चौधरी, अतुल वैध, श्रीधर उईके, सागर भोसले, रोशन निंबाळकर यांनी केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment