Thursday 14 June 2018

अर्जूनीमोर येथे कृषीमेळाव्याचे आयोजन

अर्जुनीमोर, दि. 14,- स्थानिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य आवारात पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांचे अध्यक्षतेत काल बुधवारी (दि.13)कृषी कर्ज मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 
या मेळाव्याला उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनोले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी जिप उपाध्यक्ष रचना गहाणे, माजी सभापती अरविंद शिवणकर, नामदेवराव कापगते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लायकरामजी भेंडारकर, माजी जिरप सभापती प्रकाश गहाणे,कमल पाऊलझगडे,  मंदा कुंभरे, तेजूकला गहाणे रघुनाथजी लांजेवार, गजानन डोंगरवार, मंजूषा तरोणे,रचना वकेकार,मीना शाहारे  आदी मान्यवर उपस्थित होते.  
जिल्ह्यातील शेतकरीवर्गाच्या कृषी विषयक समस्या लक्षात घेऊन मा. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी कर्ज मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  
कृषी कर्ज मार्गदर्शन मेळाव्या प्रसंगी तालुक्यातील विविध बॅंकाचे स्टाॅल, कृषी विभागाचे स्टाॅल, महसुल विभागाचे स्टाॅल, वन विभागाचे स्टाॅल, पंचायत समिती चे स्टाॅल लावण्यात आले होते. कृषी कर्ज मार्गदर्शन प्रसंगी कर्ज मुक्ती व खरीप हंगामातील कृषी कर्ज याविषयीही विशेष मार्गदर्शन श्री बडोले  आणि  उपविभागीय अधिकारी यांनी केले. 
यावेळी हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी आपली हजेरी लावली होती. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...