Sunday 24 June 2018

अर्जूनी-मोर येथे विविध कामाचे भूमीपुजन

अर्जुनी-मोर,दि.२४ः- विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकासाला आपण प्राधान्य दिले आहे. विविध विभागाच्या माध्यमातून या क्षेत्रातील अनेक गावात विविध विकासाची कामे करण्यात आली. दळणवळणच्या दृष्टीने मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्याच्या झपाट्याने विकास करण्यात आले असून बहुतांशी गावामध्ये समाज मंदीर, चावड्या या सारखे विकासाची कामे करण्यात आली आहेत. सोबतच शासनाच्या वैयक्तीक लाभाच्या योजना गरजु लाभथ्र्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केले आहेत. पर्यटन विकास तिर्थक्षेत्र विकास असो  अन्य विकास  यासाठी आपण निधी कमी पडू दिला नाही. क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाययमंत्री तथा गोदिया जिल्हाचे पालकमंत्राी राजकुमार बडोले यांनी केले.
ते मोरगाव व अर्जूनी येथे विविध कामाच्या भुमीपुजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थनी जिप अध्यक्षा सिमा मडावी होत्या. अतिथी म्हणून सभापती अरविंद शिवणकर, भाजपा तालुकाअध्यक्ष उमाकांत ढेगे,  जिप सदस्य तेजुकला गहाणे, मंदा कुंभरे, सरपंच विजया उईके, उपसरपंच राजु पालीवाल, मंजुषा तरोणे, नामदेव कापगते, रघुनाथ लांजेवार, लायकराम भेंडारकर, विनोद नाकाडे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व प्रथम मोरगाव येथे आमदार स्थानीक विकास निधी अंतर्गत चार लाखाच्या निधीतून तयार होणारे कोहळी समाज भवन, हनुमान मंदिराजवळ दोन लाखाच्या निधीतून होणारे चावडी बांधकामाचे भूमीपुजन ना. बडोले यांनी केले. त्यानंतर जिल्हा निधीमधून मंजूर झालेल्या पंस पटांगणावर ४० लाखच्या निधीतून तयार होणाèया अकरा व्यवसायीक दुकान गाळ्यांचे भूमीपुजन बडोले यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार देशमुख, गटविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता तथा विविध विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...