Wednesday 20 June 2018

म्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू

श्रीनगर(वृत्तसंस्था),दि.20: जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाली आहे. भाजपाने पीडीपीची साथ सोडल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे सरकार काल कोसळले. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सनंदेखील सरकार स्थापन करण्यास उत्सुक नसल्याचं स्पष्ट केले होते. त्यामुळे राज्यपाल नरिंदर नाथ वोहरा यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू करण्यात यावे, अशी शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती. याला कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाली आहे.
काल भाजपाने जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. यानंतर मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे सरकार कोसळले. त्यामुळे मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यपाल वोहरा यांनी मुफ्ती, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी. ए. मीर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यात यावी, अशी शिफारस वोहरा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती.
एकूण 87 आमदार असलेल्या जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत नाही. जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत पीडीपीचे सर्वाधिक 28 आमदार आहेत. तर भाजपाचे 25, नॅशनल कॉन्फरन्सचे 15 आणि काँग्रेसचे 12 आमदार आहेत. इतर पक्षांच्या आणि अपक्ष आमदारांची संख्या 7 इतकी आहे. भाजपानं पीडीपीची साथ सोडल्यावर कोणत्याही पक्षानं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केलेला नव्हता. त्यामुळे राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यात आली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...