नवी दिल्ली,दि.26 – सामाजिक न्याय विभाग केंद्र शासन, दिल्ली तर्फे संपूर्ण भारतात समाजात व्यसनमुक्तीवर कार्य करणाऱ्या संस्था, संघटना व व्यक्ती यांचा सन्मान जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त मंगळवारी (२६ जून २०१८) पुरस्कृत केले गेले. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य गेल्या ५९ वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात २५ पदाधिकारी, ४० संघटक, ५०० स्वयंसेवक यांच्या अथक प्रयत्नांतून कार्यरत असून व्यसनमुक्ती प्रचार, प्रसार, प्रबोधनाच्या माध्यमातून कार्यक्रम राबवत समुपदेशन, उपचार केंद्रामध्ये दाखल करुन त्यांना योग्य ते उपचार देऊन सातत्याने त्यांच्याशी संपर्कात राहुन उपचार्थींना व्यसनमुक्त करण्याचे काम करीत समाजातील व्यसनांना हद्दपार करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. या कार्याची दखल केंद्र शासनाने घेत राष्ट्रीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०१८ ने देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद व सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते गौरवण्यात आलेले आहे. हा पुरस्कार नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व चिटणीस अमोल स. भा. मडामे यांनी स्वीकारला. यावेळी राष्ट्रपती यांनी आपण सर्व व्यसनमुक्तीचे ब्रँण्ड अॅम्बेसेडर असल्याचे मनोगत व्यक्त केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment