गोंदिया,दि.14ः- सध्या राज्यसरकारच्यावतीने प्रशासकीय बदल्यांचा काळ सुरु आहे.त्यातच गोंदिया जिल्हा परिषदेत यापुर्वी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत राहिलेले सचिन साबळे यांची काही काळानंतर महिला बालविकास अधिकारी म्हणून बदली झाली.गोंदिया जिल्हा परिषदेत पंचायत विभागात असताना सन 2013-14 मध्ये त्यांच्याच कार्यकाळात तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा येथे नदीपात्रात जुना व मोडकळीस आलेला डोंगा उलटून 10-12 लोक ठार झाल्याची घटना घडली होती.विशेष तो डोंगा निकामी असल्याने त्या ठिकाणी नवा डोंगा देण्यात यावा असा प्रस्ताव त्यावेळी पंचायत समिती तिरोडाने पाठविल्यानंतरही त्याठिकाणी नवीन डोंगा खरेदी करण्यासाठी जे प्रयत्न लवकर करायला हवे होते.ते साबळे यांनी व त्यावेळच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी न केल्याने त्या डोंग्यामुळे निष्पापांचा जीव गेला.त्याप्रकरणा दाबण्यासाठी पंचायत राज समितीपासून ते सर्वच स्तरावर चांगलेच प्रयत्न त्यावेळी संबधिताकडून करण्यात आले होते.तेच सचिन साबळे सद्या ठाणे परिसरात महिला बालविकास अधिकारी म्हणून कार्यरत असून गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास अधिकारी या पदावर परत येण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा समोर आली आहे.त्यासाठी त्यांनी त्यापध्दतीने नियोजन केल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरु असून घाटकुरोडा डोंगा प्रकरणात ज्यांनी हयगय केली टाळाटाळ केली असे अधिकारी महिला बालविकास प्रकल्प कार्यालयात आल्यास काय होणार याही चर्चा रंगू लागल्या आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment