अकोला दि.१८(विशेष प्रतिनिधी): विदर्भ एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. विदर्भ एक्स्प्रेस नागपूरकडे जात असताना अकोल्यातील कुरुम स्थानकात हा तांत्रिक बिघाड झाला. यामुळे दोन तासांपासून विदर्भ एक्स्प्रेस कुरुम स्थानकात थांबवली आहे. यामुळे इतर रेल्वे गाड्यांचे नियोजन विस्कळीत झाले असून प्रवासी सुद्धा त्रस्त झाले आहेत.अपडाऊन करणारे कर्मचारी यांचेही वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे प्रवासी व रेल्वे प्रशासन, कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. इतर रेल्वे गाड्यांचे नियोजन विस्कळीत झाले आहे.दरम्यान, घटनास्थळी रेल्वे प्रशासन दाखल झाले असून दुरुस्तीचे काम सुरु आहे. तसेच, या मार्गावरील वाहतूक लवकरच पूर्व पदावर येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment