नवी दिल्ली दि.२३ :: महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भातील वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. विधानसभेच्या सदस्यांनी निवडून दिलेल्या ११ सदस्यांचा कार्यकाळ २७ जुलै २०१७ रोजी संपत आहे. त्यात जयदेवराव मारुतीराव गायकवाड, विजय विठ्ठल गिरकर, माणिकराव गोविंदराव ठाकरे, संजय सतीशचंद्र दत्त, अनिल दत्तात्रय परब, नरेंद्र अण्णासाहेब पाटील, अमरसिंग शिवाजीराव पंडित, शरद नामदेव रणपिसे, सुनील दत्तात्रय तटकरे, महादेव जगन्नाथ जानकर आणि जयंत प्रभाकर पाटील यांचा समावेश आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ५ जुलै आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ९ जुलै असेल. मतदान व मतमोजणी एकाच दिवशी १६ जुलैला होईल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया,दि.२१ : स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे, तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करुन स्त्रियांचे मोठ्या ...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
No comments:
Post a Comment