Sunday, 3 June 2018

हा विजय संपूर्ण आघाडीचाच - नाना पटोले


Image result for nana patole + praful patel


विरोधकांनी कट कारस्थान थांबवावे, अन्यथा जशास तसे उत्तर

गोंदियादि.03- गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीचे निवडीचे श्रेय कांग्रेस, राष्ट्र‘वादी काॅंग्रेस, आरपीआय गवईगट, पिरीपा, खोरिपा, कम्युनिस्ट पाटरू यासह असंख्य संघटना आणि त्यांच्या पदाधिकारी  कार्यकर्ते यांचा हा विजय आहे. मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या एका वर्तमान पत्रात चुकीचे वृत्त प्रकाशित करण्यात आले. सदर वृत्त दिलाभूल करणारे आहे. राकां नेते प्रफुल पटेल व आम्ही या निवडणूकीत अथक परिश्रम घेतलेले आहे. हा विजय आघाडीतील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आहे. प्रफुल पटेल व नाना पटोले एक मध्य भारतातील वेगळे समीकरण आहे. जे सत्ता परिवर्तनाच्या लक्ष्याकडे आगेकुच करत आहे. अनेकांना हे जुळलेले समीकरण डोळ्यात खुपत आहे. त्यामुळे वाट्टेल तशी चर्चा कर!न दिशाभूल केले जात आहे. दिशाभूल करणाऱ्यांना आम्ही वेळीच वठणीवर आणू. येणाऱ्या काळात आपल्या पायाखालची वाळू सरकत आहे असा भास विरोधकांना झाला असल्याने त्यांचे काही त्यांच्या मार्फत बंदर नाचवून अप्रचार करत आहेत. प्रफुल पटेल व नाना पटोले हे एक तयार झालेले मोठे समीकरण आहे. जे भाजप करिता उद्याचा काळ ठरेल. त्याची धास्ती भाजपला असून वाट्टेल त्या प्रकारे फूट पाडयाचा प्रयत्न केला जात आहे. विरोधकांनी कट कारस्थान थांबवावे नाहीत जशास तसे उत्तर देउ, असे नाना पटोले यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकातून म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...