चिचगड,दि.5- नुकत्याच आलेल्या वादळामुळे धमदीटोला (पर.) येथे विजेच्या तारा तुटल्या. या तारांचा स्पर्शाने एका शेतकऱ्याचा बैल दगावून 40 हजाराचे नुकसान झाल्याची घटना घडली. दरम्यान, महावितरण कंपनीने शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पुढे आली आहे.
गेल्या 25 तारखेला परिसरात वादळासह पाऊस आला. या वादळात अनेक धमदीटोला येथे विजेच्या तारा तुटल्या. दुसऱ्या दिवसी रामदास मळकाम हा शेतकरी आपले बैल चारण्यासाठी शेतात गेला असता त्या तुटलेल्या तारांमध्ये बैलाचे पाय अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. विजेच्या तारा तुटूनही त्या तारांमधील वीज प्रवाह महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बंद न केल्यान त्या बैलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्या शेतकऱ्याने केला आहे. यामुळे शेतकऱ्याचे 40 हजाराचे नुकसान झाले आहे. पुढे शेतीचा हंगाम असल्याने आणि यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने महावितरण कंपनी ने त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment