Thursday 21 June 2018

रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा नाही : रामदास आठवले

नागपूर,दि.20- ‘रिपब्लिकन पक्षाला सत्तेत दहा टक्के वाटा मिळेल, असे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र, सत्तेत येऊन ४ वर्षांचा कालावधी उलटूनही रिपब्लिकन पक्षाला सत्तेत सामावून घेण्याचे प्रयत्न झाले नाहीत,’ या शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली.खोरिपचे नेते उमाकांत रामटेके यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आठवले मंगळवारी सकाळी नागपुरात आले होते. याप्रसंगी आठवले यांनी भाजपला आश्वासनाची आठवण करून दिली. ‘२०१४ च्या निवडणुकीत भीमशक्ती भाजपच्या पाठीशी राहिली. त्याचा परिणाम म्हणून भाजपला मोठा विजय मिळाला होता. केंद्रात भाजप-शिवसेनेसोबत आघाडी करतानाच भाजपने सत्तेत दहा टक्के वाटा देण्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाला दिले होते. केंद्र व राज्यातील सत्तेला चार वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला तरी भाजपकडून आश्वासनाची पूर्ती झाली नाही.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...