तालुका प्रशासनाची दुपट्टी कार्यवाहीचा आरोप
गोंदिया,दि.23- देवरी तालुक्यामध्ये प्रशासन आणि स्थानिक राजकारणी यांच्या संगणमतातून अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे वृत्त आहे. या प्रकारामुळे अवैध रेती वाहतुक करणारे आणि अवैध रेतीची विक्री करणाऱ्या संबंघित दलालांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय तालुका प्रशासन करीत असलेली तोंडदेखली कार्यवाही या आगीत तेल ओतत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
![]() |
रेती घाटावरून अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर सोडून अशा प्रकारे वाहन चालक पळून जातात व नंतर सेंटीग करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. |
तालुक्यात असलेल्या रेती घाटांचा अ्द्याप लिलाव करण्यात आला नाही. यामुळे तालुक्यात होत असलेल्या बांधकामासाठी विशेषतः शौचालय बांधकाम आणि घरकूल बांधकामासाठी लागणाऱ्या रेतीचा पुरवठा हा अवैधरीत्या होत आहे. यासाठी तालुक्यातील घाटावरील रेतीची स्थानिक लोक ही ट्रॅक्टरमार्फत अवैध रेतीची वाहतुक करीत आहेत.
![]() |
स्थानिक राजकारणी आपल्या लोकांना वाचविण्यासाठी अशा प्रकारे रेती रिकामी करून अधिकारी येण्यापूर्वी पसार होण्यास मदत करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. |
या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिकार नसताना वाहनचालकांकडून अवैधरीत्या वसूली करणाऱ्या मंडळींवर तसेच कार्यवाहीत भेदभाव करून मलई खाणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांचेवर कार्यवाही करण्याची मागणी तालुकावाशीयांनी केली आहे.
असा प्रकार तालुक्यात कोठेही सुरू नाही- विजय बोरुडे
या संबंधी तहसीलदार विजय बोरूडे यांचेशी संपर्क केला असता त्यांनी असा प्रकार कोठेही सुरू नसल्याचे म्हटले. आम्ही रात्री बेरात्री होणारी अवैध रेतीची वाहतुक रोखण्यासाठी आणखी कठोर पावले उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment