गोंदिया,दि.१६ : ः- गोंदिया जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी.गावडे यांचे पुणे येथे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक या पदावर स्थानांतरण झाल्याने जिल्हा परिषदेच्यावतीने शुक्रवार(दि.15)ला त्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजा दयानिधी यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला.या सत्कार समारंभाचे आयोजन मुकाअ यांच्या सभागृहात करण्यात आले होते.गावडे यांनी आपल्या गोंदिया जिल्हा परिषदेतील अल्प कार्यकाळातील अनुभवावर विचार मांडत सर्वांचे आभार मानले.तसेच उपस्थित विभागप्रमुखांनीही यावेळी विचार व्यक्त केले.गावडे यांच्या निरोप समारंभाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, एन.के. भांडारकर,राजेश बागडे,राजेश राठोड,महिला बालकल्याण विभागाचे डी.बी.पारखे,कृषी विकास अधिकारी कु. वंदना शिंदे,शिक्षणाधिकारी यु.के.नरड,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.आर.व्ही.वासनीक,कार्यकारी अभियंता आर.एस. वेरागकर व संजय विश्वकर्मा यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment