इंदूर,दि.03 - देशभर भाजप नेत्यांची वादग्रस्त विधाने काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. त्या भर म्हणून आणखी एका नेत्याने वादग्रस्त विधान करीत नव्या वादाला तोंड फोडले आहे. मध्य प्रदेशमधील भाजप नेते जगन्नाथ सिंह रघुवंशी यांनी राज्य विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्याला दिलेल्या धमकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रघुवंशी सरकारी कर्मचाऱ्याला तोंड काळे करण्याची धमकी देताना दिसत आहेत.
"तुम्ही माझ्या दयेवर इथे जगत आहात. अन्यथा मी तुमचे तोंड काळे केले असते," असे रघुवंशी यांनी धमकावले. तोंड काळे करेन आणि जोड्याने हाणेन अशी भाषा भाजपा नेत्याने वापरली आहे. या व्हिडिओवरुन रघुवंशी यांच्यावर सगळीकडून टीका होत आहे. कर्मचाऱ्याने तुमच्यावर चार लाखांचे विद्युत बिल थकित असल्याचे सांगितल्यानंतर रघुवंशी कर्मचाऱ्यावर मोठमोठ्याने ओरडताना आणि शिवीगाळ करत असतना या व्हिडिओत दिसत आहेत.
No comments:
Post a Comment