Thursday 30 April 2020

मुल्ला येथील जि.प. शाळेतून एलईडी संच लंपास

मुख्यालयात एकही शिक्षक राहत नसल्याने चोरट्याचे फावले

देवरी, दि. 30 - देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मुल्ला येथील जिल्हा परिषद वरिष्ठ शाळेतील एलईडी संच चोरीला गेल्याची घटना आज गुरूवारी (दि.30) उघडकीस आली आहे. दरम्यान, कोरोना संक्रमणामुळे असलेल्या टाळेबंदीचा गैरफायदा उचलत शाळेतील सर्व शिक्षकांनी वरिष्ठांच्या परवानगी शिवाय मुख्यालय सोडल्याची बाब समोर आली आहे. परिणामी, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आता कोणती भूमिका घेतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. उल्लेखनीय म्हणजे शाळेच्या इतिहासातील चोरीची पहिलीच घटना असल्याचे गावकरी सांगत आहेत.
सविस्तर असे की, संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट आहे. यामुळे सर्वत्र टाळेबंदी आहे. शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थितीवर नियंत्रण करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी आपले मुख्यालय सोडून आपल्या स्वगावी निघून गेल्याचे चित्र आहे. शिक्षण विभागातील तर परिस्थिती याहूनही गंभीर आहे. अनेक कर्मचारी हे आपल्या वरिष्टांची परवानगी न घेता जिल्ह्याबाहेर वास्तव्यास असल्याचे बोलले जाते. नेमका याच गोष्टीचा फायदा चोरट्यांनी उचलायला सुरवात केल्याची घटना मुल्ला शाळेतील एलईडी संच चोरट्यांनी लंपास केल्यावरून दिसून येते.
मुल्ला शाळेतील युनिवर्सल कंपनीचा 32 इंच टीवी संच 9 ते 30 एप्रिल दरम्यान चोरट्यांनी लंपास केल्याचे शाळा व्यवस्थापन समितीच्या एका सदस्याने प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले. ही बाब आज शालेय पोषण आहार वाटप करण्यासाठी बाहेरगावून आलेल्या शिक्षिकेच्या लक्षात आली. यापूर्वी सदर शिक्षिकेने 9  एप्रिल रोजी शालेय पोषण आहाराचे वाटप केल्याचेही सांगण्यात येत आहे. चोरट्याने शाळेचे कुलूप तोडून चोरी केल्याचे समोर आले आहे.  उल्लेखनीय म्हणजे शाळेच्या इतिहासात अशी घटना यापूर्वी घडली नसल्याचेही गावकरी सांगत आहेत. शाळेचे कर्मचारी हे मुख्यालयात राहत नसल्याने चोरट्यांचे फावले आहे. महत्त्वाचे म्हणजे जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहत असल्याबाबत गावच्या ग्रामसभेचा ठराव आपल्या वरिष्ठ कार्यालयास देणे बंधनकारक आहे. मात्र, या शासनाच्या आदेशाला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे.

महाराष्ट्र सायबर विभाग;लॉकडाऊनच्या काळात ३३३ गुन्हे दाखल


मुंबई दि. ३० – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३३३ गुन्हे दाखल केले आहेत.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये ज्या ३३३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यापैकी १३ गुन्हे अदखलपात्र (N.C )आहेत.
जिल्हानिहाय गुन्हे
त्यामध्ये बीड २९, पुणे ग्रामीण २७, जळगाव २६, मुंबई २०, कोल्हापूर १६, सांगली १२, नाशिक ग्रामीण १२, नाशिक शहर ११, जालना ११, सातारा १०, बुलढाणा १०, लातूर १०, नांदेड ९, पालघर ९,ठाणे शहर ८,परभणी ८, सिंधुदुर्ग ७, नवी मुंबई ७, अमरावती ७, ठाणे ग्रामीण ७, हिंगोली ६,नागपूर शहर ६, गोंदिया ५, सोलापूर ग्रामीण ५, पुणे शहर ४, रत्नागिरी ४ ,सोलापूर शहर ४, नागपूर ग्रामीण ४, भंडारा ३, चंद्रपूर ३, पिंपरी- चिंचवड ३,रायगड २, धुळे २, वाशिम २, औरंगाबाद १ (एन.सी), यवतमाळ १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे .
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १३८ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १२५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,titktok विडिओ शेअर प्रकरणी १० गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ६ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत १५२ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी ६० आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे .
नागपूर ग्रामीण
नागपूर ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद झाली आहे, त्यामुळे नागपूर ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील नोंद केलेल्या गुन्ह्यांची संख्या ४ वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपी क्र.१ याने फिर्यादी हा कोरोना महामारीच्या काळात हरवला आहे,अशा आशयाचा मजकूर आपल्या फेसबुक प्रोफाईल वर टाकला होता. तर आरोपी क्र २ याने तोच मजकूर असणारी पोस्ट व फिर्यादीचा फोटो जोडून सदर पोस्ट विविध व्हाट्सअँप ग्रुपवर पोस्ट केली होती .
पुणे ग्रामी
पुणे ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद झाली आहे ,त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील नोंद केलेल्या गुन्ह्यांची संख्या २७ वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपी महिलेने आपल्या फेसबुक पोस्टवर कोरोना महामारीबाबत चुकीची माहिती असणारी व अफवा पसरविणारी पोस्ट शेअर केली होती . त्यामुळे कोरोना महामारीच्या सरकारी उपाययोजनांबाबत स्थनिक लोकांमध्ये द्वेष पसरून ,परिसरातील शांतता बिघडून ,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता .
वेबसाईटची खातरजमा करावी
सध्या लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे व नागरिक ऑनलाईन शॉपिंग करत असल्यामुळे, इंटरनेटवर अनेक संकेतस्थळ (website) सुरु झाल्या आहेत ज्या आपण परदेशातील महागड्या ब्रँड्सचे वितरक आहोत अशा आशयाचा दावा आपल्या संकेतस्थळावर (website)जाहीरपणे करतात .महाराष्ट्र सायबर विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येते की, अशा लिंक्सवरून काही खरेदी करताना सावध राहा ,सायबर भामट्यांनी फसविण्यासाठी तयार केलेली ती नकली (fake) वेबसाईटसुद्धा असू शकते . कृपया अशी एखादी वेबसाईट तुमच्या पाहण्यात आली तर आधी खातरजमा करून घ्या कि ती वेबसाईट खरी आहे व मगच त्यावर ऑनलाईन खरेदी करा व कुठेही आपल्या बँक खात्याची सर्व माहिती तसेच डेबिट/ क्रेडिट कार्ड पिन नंबर देऊ नका .
सर्व नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

देचलीपेठापरिसरातील २२ ग्रा.पं. कडून नक्षल गावबंदीचा ठराव मंजूर


अहेरी,दि.30ः– तालुक्यातील किष्टापूर नाला पुलाच्या बांधकामावरील ८ एप्रिल रोजी नक्षल्यांनी वाहनांची जाळपोळ केली होती. यावेळी या किष्टापूर नाल्याचा फायदा होणार्‍या पंचक्रोशीतील अनेक ग्रामपंचायतींनी नक्षलवाद्यांच्या या कृत्यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून देचलीपेठा पंचक्रोशीतील २२ ग्रामपंचायतीकडून नक्षल गावबंदीचा ठराव मंजूर केला आहे. जिल्ह्यात प्रथम असा ठराव मंजूर केल्याने पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ग्रामस्थांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अहेरी तालुक्यातील किष्टापूर नाल्यावरील पुलाच्या नाल्यावरील पुल बांधकामाचा फायदा या भागातील अनेक ग्रामस्थांना दळणवळणासाठी होणार आहे. याची जाणीव ग्रामस्थांना आहे. पावसाळय़ात या नाल्याला पूर आल्यानंतर या भागातील ग्रा.पं. चा गडचिरोली जिल्ह्याशी संपर्क पूर्णपणे तुटतो. यामुळे शालेय विद्यार्थी, मजूर व वैद्यकीय सेवेची आवश्यक असलेल्या नागरिकांची ये-जा बंद होते. यामुळे उपचाराअभावी मृत्यू होण्याचा धोका देखील संभवतो. यामुळे सदर नाल्यावरील पूल बांधकामाचे महत्व पंचक्रोशीतील नागरिक जाणून आहेत. किष्टापूर नाल्यावरील पूल पंचक्रोशीतील नागरिकांसाठी अतिमहत्त्वाचा असल्यानेच पोलिस दलाने युद्धपातळीवर विशेष प्रयत्न करून या पुलाच्या बांधकामाची परवानगी प्राप्त केली होती. यावेळी या भागातील दोन हजार नागरिकांनी पोलिस दलाचे मिठाई वाटत आभार मानले होते.
नक्षल्यांनी कोणत्याही बाबीचा विचार न करता केवळ स्वत:च्या फायद्यासाठी येथील पुलाचे बांधकाम हाणून पाडण्यासाठी वाहनांची जाळपोळ केली, असल्याचे सांगत पंचक्रोशीतील दोडगीर, शेडा, आसली, मुखनपल्ली, बिर्‍हाडघाट, कोंजेड, येलाराम, कामासूर, मुत्तापूर, तोडका, मिट्टीगुडम, पेठा, जोगनगुडा, कोडसापल्ली, देचलीपेठा, सिंध, किष्टापूर, पेरकाभट्टी, दोडगीर, पत्तीगाव, लखनगुडा, शेडा या २२ गावानी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत घेतलेल्या ग्रामसभेत नक्षल गावबंदीचा ठराव मंजूर केला आहे. ठरावात नक्षलवाद्यांना गावात पाय ठेवू न देणे तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करणे याचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रशासनाने किष्टापूर नाल्याच्या पुलावरील बांधकाम सुरू ठेवून लवकरात लवकर पंचक्रोशीतील ग्रामस्थांना नवसंजीवनी देणारा हा पूल उभारावा, असे ठरावात म्हटले आहे. या पुलाच्या बांधकामासाठी प्रशासनाला ग्रामस्थ स्वत: पुढकार घेऊन मदत करीत, अशी ग्वाहीही ठरावात देण्यात आली आहे. यावेळी ग्रामस्थांनी नक्षलवादी स्वत:च्या फायद्यासाठी करून घेत असलेला जनतेचा वापर नक्षल्यांनी तत्काळ थांबवावा व जनतेच्या विकासाच्या आड येवू नये, असा इशारा पंचक्रोशीतील २२ ग्रामपंचायतीच्या नागरिकांनी नक्षल्यांना दिला आहे.
ग्रामसभेत नक्षल गावबंदी ठराव संमत करणार्‍या या १६ ग्रामपंचायतीचे नक्षल गावबंदीचे ठराव जिल्हाधिकारी यांचे कार्यालयास पाठवून महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे या गावांच्या विकासासाठी ६ लाख रूपये प्रोतसाहनात्मक अनुदान म्हणून मंजूर करण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाकडून पाठपुरावा करण्यात येणार आहे. या १६ गावात नक्षल गावबंदी ठराव संमत करणार्‍या ग्रामस्थांच्या कृतीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, यांनी स्वागत केले असून, नक्षल गावबंदी योजनेंतर्गत या गावांच्या विकासासाठी गडचिरोली पोलिस दल सदैव या ग्रामस्थांच्या पाठीशी राहील तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पोलिस दल प्रयत्न करेल, असे आश्‍वासन पोलिस अधीक्षकांनी ग्रामस्थांना दिले.

Saturday 25 April 2020

सोलापूर निवासी एसआरपीएफच्या पोलिस उपनिरिक्षकाची आत्महत्या

गडचिरोली,दि.23ः-राज्य राखीव पोलिस दलाच्या सोलापूर गट 10 या बटालियनमधील एका पोलिस उपनिरिक्षकाने बुधवारच्या रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास आपल्या सर्विस रिवाल्वरने डोक्यात गोऴी घालून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.ही घटना जिल्ह्यातील धानोेरा पोलिस उपविभागांतर्गत येणा-या सावरगाव पोलिस मदत केंद्रात घडली. एसआरपीएफची सदर तुकडी गेल्या दीड ते दोन महिन्यापासून सावरगाव येथे कर्तव्यावर आहे.
चंद्रकांत शिंदे (वय 45) असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असुन ते सोलापूर जिल्ह्याचे निवासी असल्याची माहिती आहे.

शिंदे हे कित्येक दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे वृत्त समोर आले आहे.त्यांना 6 ते 7 वर्षांपासुन पाठीच्या कण्याचा गंभीर त्रास होता.त्यात गडचिरोली जिल्ह्यात नक्षली भागात तैनाती झाल्याने सतत ऑपरेशन मोडवर रहावे लागत असल्याने त्यांचा त्रास अधिक वाढत  गेल्याने शारीरिक व्याधीला कंटाळून निराशेच्या गर्तेत येऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

12 तास लोटूनही त्या वाईनशाॅपवरील कारवाईची माहिती गुलदस्त्यातच

गोंदिया,दि.24ःराज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सध्या संचारबंदी व लाॅकडाऊन असल्यामुळे देशीविदेशी दारुची सर्वच दुकाने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही बंद आहेत.दरम्यान याच काळात मोठ्याप्रमाणात देशी विदेशी दारु अवैधरित्या विक्री करतांना व वाहतुक करतांना पकडण्यात आले.तर दुसरीकडे 200 रुपये दर असलेली दारुची बाटल 400 रुपयाला तर मोहफुलाचीही दारु 500 रुपये डबकीप्रमाणे जिल्ह्यात विक्री सुरु असल्याचे वृत्त समोर येत आहे.
यादरम्यानच गुरुवारला राज्य उत्पादन शुल्क विभाग गोंदियाच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत गोंदियातील दुर्गाचौक परिसरात असलेल्या एका वाईनशाॅपवर धाड घालून चौकशी करण्यात आली.ही कारवाई गुरुवारला सायकांळी 7 वाजेच्या सुमारास सुरवात करण्यात आली.प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीना कळल्यावर अनेकांनी धाव घेत कारवाई बघितली तर काहींनी संबधित अधिकार्यांशी संपर्क साधून माहिती कधी मिळणार अशी विचारणाही केली.मात्र त्या कारवाईला तब्बल 12 तासाचा कालावधी लोटूनही त्या कारवाईदरम्यान काय मिळाले हे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अद्यापही न सांगितल्याने या कारवाईतील चौकशीच संशयाच्या भोवर्यात आली आहे.त्या वाईनशाॅपमधून माल बाहेर विक्रिला जात असल्याची चर्चा परिसरात होती.तर त्याच भागात असलेल्या एका काॅलनीत बनावट दारु केली जात असल्याची चर्चा असून गोंदिया शहरात सध्या विक्री होत असलेली बियर व विदेशी दारु ही त्या एका काॅलनीत तयार केली जात असून त्याठिकाणी कारखाना असल्याचे बोलले जात आहे.

२.३८ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त १२ जणांवर कारवाई


गोंदिया,दि.25 : कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचाच लाभ घेत ग्रामीण क्षेत्रामध्ये मोहफुलाची दारू गाळून अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे, अशी माहिती मिळताच जिल्हा पोलिस दलाने धाड कारवाईचे सत्र सुरू केले. २० ते २२ एप्रिल दरम्यान पाच ठिकाणी धाड कारवाई करून २ लाख ३८ हजार ९१० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी १२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून प्राप्त आहे.
लॉकडाऊनच्या काळात अवैधरित्या मोहफुलाची दारू गाळून विक्री केली जात आहे. त्याचप्रमाणे जुगार देखील खेळविला जात असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षकांना मिळाली. या आधारावर जिल्हा पोलिस अधिक्षक मंगेश शिंदे यांनी पथकाच्या माध्यमातून धाडसत्र सुरू केले आहे. २० एप्रिल रोजी आसोली येथे देवानंद बन्सोड याला दारू गाळताना पकडण्यात आले. दरम्यान त्याच्याकडून २० हजार ९०० रूपयाचा माल जप्त करण्यात आला. २१ एप्रिल रोजी पांढराबोडी येथील लिखन टेकलाल दमाहे याच्या घरी धाड कारवाई ७ हजाराची दारू जप्त करण्यात आली. त्याचप्रमाणे बरबसपुरा येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. दरम्यान घटनास्थळावरून ८ जणांना रंगेहात पकडून १ लाख ६८ हजार ८६० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील आरोपीमध्ये अजबलाल दमाहे (३०), सौरभ डहाट (२७), महेश दमाहे (२९), रंजीत कोल्हे, प्रितीलाल डहाट सर्व रा.बरबसपुरा, उमेश लिल्हारे (४८) रा.इर्री, संदिप दमाहे (२७) रा.पांढराबोडी यांचा समावेश आहे. २२ एप्रिल रोजी फुलचूर येथील छन्नीलाल बघेले याला अवैधरित्या दारूविक्री करताना पकडण्यात आले. त्याच्याकडून २ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नागरा येथील चिमन रामकृष्ण नेवारे याला दारू गाळताना पकडण्यात आले. त्याच्याकडून ३९ हजार ६५० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असे एकूण पाच कारवाईमध्ये २ लाख ३८ हजार ९१० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

चोरीच्या दागिन्यांसह चोर व सराफा अटकेत


सडक अर्जुनी, दि.25ः सात महिन्यापूर्वी घरफोडीच्या घटनेत सोन्याचांदीने चोरी करणार्‍या चोरट्यासह त्यातील काही दागिने विकत घेणार्‍या सराफा व्यवसायीकाला डुग्गीपार पोलीसांनी अटक केली. अशलेश रेवा लाडे (वय २७ रा. कोहमारा) असे चोरट्याचे तर तेजस येरपुडे (रा. कोहमारा) असे सराफाचे नाव आहे.
डुग्गीपार येथील मुकेश रामकृष्ण कापगते यांच्या घरी २९ सप्टेंबर २0१९ रोजी घरफोडीची घटना घडली होती. याप्रकरणी डुग्गीपार पोलीसात नोंद करण्यात आली होती. तर संशयीत आरोपी म्हणून अशलेश लाडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो गावातून फरार होता. दरम्यान अशलेश लाडे हा सालेकसा तालुक्यात असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. या माहितीवरुन डुग्गीपार पोलीसांनी १९ एप्रिल रोजी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याने घरफोडी करुन २ लाख ७५ हजार ८00 रुपयांचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेल्या दागिन्यापैकी काही दागिने विकल्याची माहिती दिली. पोलीसांनी अशलेशकडून २ लाख १८ हजार ५00 रुपयांचे दागिने जप्त करुन त्याला अटक केली तसेच अशलेशने दिलेल्या माहितीच्या आधारे २३ एप्रिल रोजी कोहमारा येथील सराफा तेजश येरपुडे याच्या सराफा दुकानावर धाड टाकली असता त्याने चोरीचे ५७ हजार रुपयांचे दागिने विकत घेतल्याचे कबूल केले. पोलीसांनी येरपुडे याला अटक केली असून विकत घेतलेले दागिने जप्त केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात डुग्गीपारचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल कुंभरे, पोलीस नायक चंद्रीकापुरे, पोलीस शिपाई चंदनवाटवे, वाटोरे यांनी केली.

पालकमंत्री अनिल देशमुख 25 एप्रिल रोजी जिल्ह्यात

गोंदिया दि.24( जिमाका): पालकमंत्री अनिल देशमुख हे 25 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.25 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता नागपूर येथून मोटारीने कोहमारामार्गे गोंदियाकडे प्रयाण करतील.सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे आगमन व कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत आढावा बैठक घेतील.दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे गोंदिया जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतील व सोयीनुसार नागपूरकडे मोटारीने प्रयाण करतील.

गोंदिया भंडारा जिल्हयातील शेतकर्यांना मिळू लागली बोनसची रक्कम,खा.पटेलांच्या प्रयत्नांना यश

गोंदिया,दि.24ः-पुर्व विदर्भासह ज्या जिल्ह्यात धानाचे उत्पादन होते,त्या जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकर्यांसाठी बोनसची घोषणा राज्यसरकारने हिवाळी अधिवेशनात केली होती.त्यामध्ये अधिक 200 रुपये वाढवून 700 रुपये बोनस देण्याची मागणी खा.प्रफुल पटेलांनी केली होती.त्यानंतर धान उत्पादक शेतकर्यांसाठी 700 रुपये बोनस जाहिर करण्यात आले होते.त्या बोनसची रक्कम आता शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागली आहे.गोंदिया जिल्ह्यासाठी 113 कोटी तर भंडार जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपयाचा निधी खा.पटेलांच्या पुढाकारानंतर जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे जमा झालेला आहे.
वास्तविक बोनसची रक्कम शेतकर्यांना मिळण्यास उशीर झाले होते,त्यातच मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाने जनजिवन विस्कळित केल्यानंतर देशभरात संचारबंदी लागू झाल्याने सर्वसामान्य धान उत्पादक शेतकर्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.त्या अडचणी लक्षात घेत खासदार प्रफुल पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन पत्रव्यवहार करीत त्वरीत बोनस शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली होती.त्यातच दोन दिवसापुर्वी गोंदिया व भंडारा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत राज्याच्या अ्न्नपुरवठा विभागाच्या सचिवांशी चर्चा करुन बोनसची रक्कम देण्यासंबधी चर्चा करीत संबधित विषय त्वरीत मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते.त्या अनुषंगाने गोंदिया जिल्हयातील शेतकर्यांना बोनस देण्यासाठी 195 कोटीची गरज असुन त्यापैकी आज तारखेपर्यंत गोंदिया जिला मार्केटिंग अधिकारीकडे 113 कोटीचा निधी प्राप्त झाला.त्यापैकी 101.81 कोटीचा निधी शेतकर्यांंच्या खात्यात वळता झालेला आहे.तर उर्वरीत रक्कम येत्या दोन दिवसात खात्यावर वळती करणार असल्याची माहिती गोंदिया जिला मार्केटिंग अधिकार्यांंनी खासदार पटेल यांना दिली.भंडारा जिल्हयातील धान उत्पादक शेतकर्यांसाठी  जिला मार्केटिंग अधिकारी भंडाराकडे 100 कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून भंडारा जिल्हयातील शेतकर्यांच्या खात्यावर येत्या दोन दिवसात बोनसची रक्कम  जमा करण्यात येणार आहे.गेल्या दोन दिवसात खा.पटेलांनी सतत लक्ष घालून बोनसची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आल्याने दोन्ही जिल्ह्यातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी खा. पटेल यांचे आभार मानले आहे.

इलेक्ट्रिक,चष्मा, फॅन दुकाने, सिमेंट,रेती,गिट्टी आदी बांधकाम विक्री दुकाने 8 ते 2 पर्यंत राहणार सुरु

गोंदिया दि.25(जिमाका) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे.त्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषित केले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी इलेक्ट्रिक फॅन दुकाने, सिमेंट,रेती,गिट्टी आदी बांधकाम विषयक साहित्य विक्रीची दुकाने, आणि चष्मा(ऑप्टिकल) ची दुकाने सोमवारी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजता या वेळेत सुरू करण्यास एका आदेशाद्वारे अटी व शर्तीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या काळात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून दिलेल्या दिवशी ही दुकाने वेळेत सुरु दुकान करावी.संबंधित दुकानापुढे चुन्याने प्रत्येक तीन फुटावर एक रेष ओढावी.एका रेषेवर एक व्यक्ती उभा राहील. जेणेकरून सामाजिक अंतर पाळणे शक्य होईल. जर अशा ठिकाणी गर्दी होत असेल तर गर्दी नियंत्रणात आणणे शक्य नसेल त्यावेळी पोलिस विभागाने हस्तक्षेप करून गर्दी नियंत्रणात आणावी.प्रत्येक दुकानासमोर हॅन्डवॉश स्टेशन असणे आवश्यक आहे.त्या ठिकाणी संबंधित दुकान मालकाने हँडवॉशसाठी साबण व पाणी इत्यादी उपलब्ध करून ठेवावे. किमान कर्मचारीवर्ग नियुक्त करावा. आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित व्यक्ती तसेच संस्था यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येईल.असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष डॉ कादंबरी बलकवडे यांनी एका आदेशाद्वारे कळविले आहे.

Friday 24 April 2020

जि.प.सदस्य दीपक पवार कडून 120 किट तहसीलदारांना हस्तातंरित

देवरी,दि.24 - संपूर्ण जगात कोविड-19 या आजाराने थैमान घातल्याने सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर कोणीही अन्नपाण्यावाचून  उपाशी राहू नये, यासाठी देवरी तालुका प्रशासन कार्यरत आहे. तहसीलदार विजय बोरूडे यांच्या आवाहनाला समाजातील दानदाते आपापल्या परीने मदत करीत असल्याची चित्र देवरी तालुक्यात पहावयास मिळत आहे. तहसीलदार बोरुडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक दायित्व म्हणून पुराडा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य दीपक पवार यांनी 100 आणि वीज वितरण कंपनीच्या मुल्ला वितरण केंद्राचे अभियंता बावनथडे यांनी 20 किटची मदत प्रशासनाला केली आहे.

Thursday 23 April 2020

दिलासादायक:राज्यात ७२२ रुग्ण कोरोनामुक्त


मुंबई, दि. २२: कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही दिलासादायक बाब असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या ७२२ जणांपैकी पुरूषांची संख्या सर्वाधिक ४४१ असून २८१ महिला आहेत. त्यामध्ये ३१ ते ५० या वयोगटातील ३१८ रुग्णांचा समावेश आहे. त्या खालोखाल २१ ते ३० वयोगटातील १६० रुग्ण बरे झाले आहेत तर ९८ रुग्ण हे ५१ ते ६० वयोगटातील आहेत. लक्षणीय बाब अशी की ९१ ते १०० वयोगटातील एका रुग्णाने कोरोनाला हरविण्यात यश मिळविले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
दरम्यान, राज्यात जास्त रुग्ण मुंबई परिसरात आढळून येत असतानाच बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईची ३७४ एवढी आहे. त्यापाठोपाठ पुणे महापालिका परिसरात १२० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
राज्यात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढतेय. २३ मार्चला पहिले दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यानंतर आतापर्यंत साधारणत: महिन्याभरात ७२२ रुग्ण घरी गेले आहे. हे प्रमाण पाहता राज्यात दररोज सुमारे २६ रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.
राज्यात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या सर्वाधिक असल्याने रुग्णांचे निदान होण्याची संख्याही वाढत आहे. मंगळवारपर्यंत राज्यात ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि त्यांचा वयोगट पाहता लक्षात येईल की साधारणता ३१ ते ६० वयोगटातील ४१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोना मुक्त ७२२ रुग्णांचा वयोगट आणि कंसात बरे झालेल्यांची संख्या: शून्य ते १० (१९); ११ ते २० (५९) ; २१ ते ३० (१६०); ३१ ते ४० (१६४); ४१ ते ५० (१५४); ५१ ते ६० (९८); ६१ ते ७० (४५); ७१ ते ८० (१५); ८१ ते ९० (७); ९१ ते १०० (१).
घरी सोडण्यात आलेल्या ७२२ रुग्णांची जिल्हा- मनपा निहाय संख्या : अहमदनगर मनपा- ५, अहमदनगर ग्रामीण-११, औरंगाबाद मनपा- १४, बुलढाणा- ८, गोंदीया, हिंगोली, जळगाव मनपा प्रत्येकी १, कल्याण-डोंबिवली मनपा- ३१, कोल्हापूर मनपा-२, लातूर ग्रामीण-८, मीरा भाईंदर मनपा- ५, मुंबई मनपा- ३७४, नागपूर मनपा- १२, नाशिक मनपा व ग्रामीण प्रत्येकी १, नवी मुंबई मनपा- १९, उस्मानाबाद- ३, पालघर ग्रामीण-१, पनवेल मनपा- १३, पिंपरी-चिंचवड मनपा- १२, पुणे मनपा- १२०, पुणे ग्रामीण- ५, रायगड ग्रामीण-३, रत्नागिरी-१, सांगली ग्रामीण- २६, सातारा- ३, सिंधुदूर्ग-१, ठाणे मनपा १६, ठाणे ग्रामीण- ४, उल्हासनगर मनपा- १, वसई-विरार मनपा- १२, यवतमाळ-७

Wednesday 22 April 2020

जिल्हाधिकारी मॅडम, गरीब घरकुल लाभार्थींकडे सुद्धा लक्ष द्या!


सुरेश भदाडे/ बेरारटाईम्स स्पेशल

साडेसहा लाखांच्या उद्दिष्टांपैकी ...देवरी,दि.21- अख्ख्या जगावर कोरोनाचे सावट आहे. जवळपास संपूर्ण जगाला टाळेबंदीचे ग्रहण लागले आहे. जो तो आपल्या घरात स्वतःला कोंबून बसला आहे. जग पूर्णतः थांबलेले आहे. उपाशीपोटी कोणीही राहू नये, यासाठी शासन, प्रशासनासह समाजिक बांधिलकीचे भान ठेवून लोक ही इतरांची काळजी घेत आहेत. पोलिस, आरोग्य संस्था आणि सफाई कामगार हे नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसत आहेत. पण हा सर्व प्रपंच सांभाळत असताना आपल्या डोक्यावरचे छत सताड उघडे करून शासनाच्या मदतीवर घरकुल तयार करणाèया लाभार्थ्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये, अशी आर्त हाक घरकूल लाभार्थ्यांनी शासनाकडे केली आहे. परिणामी, जिल्हाधिकारी मॅडम, गरीब घरकुल लाभार्थींकडे सुद्धा लक्ष द्या! असे म्हणण्याची पाळी जिल्हा वासीयांवर आली आहे.
 जिल्ह्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने आवास योजना आणि शौचालय  बांधकामाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात आहे. या साठी शहरी आणि ग्रामीण भागात शबरी आवास योजना, रमाई घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, गुरांसाठी गोठे आणि स्वच्छ भारत योजनेच्या माध्यमातून शौचालय बांधकाम आदी योजना गरीब लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येतात. यामध्ये एका घरकूलासाठी लाख-सव्वा लाखाची शासकीय मदत लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने देण्यात येते. माहितीगार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या संपूर्ण जिल्ह्यात असे एक ते सव्वालाख घरकुल शौचालयाचे बांधकाम सुरू आहेत. यामध्ये अनेक लाभार्थ्यांनी आपले आधीचे मोडकडीस आलेले घर संपूर्ण जमीनदोस्त करून घराचे काम हाती घेतले आहे. या योजनांमधून मिळणाèया अनुदानाच्या भरवश्यावर या लाभार्थ्यांच्या डोक्यावर स्वतःचे हक्काचे घर होणार आहे. पक्क्या घराचे स्वप्न उराशी बाळगून जवळपास सर्वच लाभार्थी एकतर उघड्या आभाळाखाली वा कोणाच्या गोठ्याच्या आसèयाने आपले जीवन जगत आहेत. अनेकांना पहिल्या टप्प्यातील अनुदान मिळाले सुद्धा आहेत. घराचे बांधकाम हातात घेताच देशात कोरोनाचे वादळ घोंघावू लागल्याने संपूर्ण देशात टाळेबंदी केली गेला. परिणामी, जे काम जेथे होते, तिथेच थबकले. शासकीय अनुदान सुद्धा मिळेनासे झाले. कार्यालयाच्या चकरा आणि वरून टाळेबंदी अशा दुहेरी संकटात घरकुल लाभार्थी सापडले आहेत. सध्या बांधकामाला टाळेबंदीतून काहीशी सवलत मिळणार असल्याची आशा पल्लवीत झाली आहे. या टाळेबंदीमुळे बांधकामास लागणाèया साहित्याची किमती आकाशाला भिडल्या आहेत. विटांचे दर तर सहा हजाराच्या घरात आहेत. शासकीय अनुदानाची रक्कम थकली आहे. बांधकामाला लागणारी वाळू कोठेही उपलब्ध नाही, अवैध वाळू वाहतुकदारांनी अव्वाच्या सव्वा दराने वाळूची विक्री सुरू केली आहे. जिल्ह्यात वाळूच्या घाटांचे अद्यापही लिलाव झालेले नाहीत. एका अधिकाèयाने तर नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, जिल्ह्यात ज्या भूखंडातून वाळूचा उपसा करण्याची परवानगी दिली, तिथे वाळूचा साठाच उपलब्ध नसल्याची धक्का दायक माहिती दिली. या सर्व बाबींचा परिणाम ग्रामीण भागातील घरकुल बांधकाम योजनांवर होणार आहे. या भीतीने सर्वच घरकूल योजनेचे लाभार्थी धास्तावले आहेत.
या टाळेबंदीच्या काळात लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान वेळेवर दिले गेले नाही आणि बांधकामासाठी लागणाèया वाळूची व्यवस्था झाली नाही, तर अनेक गरीब लाभार्थ्यांना पावसाळ्याच्या दिवसात उघड्यावर राहण्याची नामुष्की ओढावण्याचा शक्यता आहे. जिल्ह्यात घाटांचे लिलाव झालेले नाहीत. अशाच वाळूची तस्करी करणारे या गरजूंना चार चार हजार रुपये प्रती ब्रास दराने निकृष्ट रेतीचा पुरवठा करीत आहेत. याकामी लागणारी वाळू लाभार्थ्यांना मिळावी, यासाठी 5 ब्रास वाळूची वाहतूक करण्यास मनाई करू नये, असा आदेश राज्याच्या महसूल आणि वनविभागाने काही वर्षापूर्वी काढला होता. मात्र, या आदेशाची अमलबजावणी योग्यरीत्या होत नसल्याचे दिसून येत आहे. महसूल विभागाचे अधिकारी लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष भेटावे असे म्हणतात, तर वनविभागाचे अधिकारी अशा आदेशाची आम्हाला कल्पना नाही असे सांगून घरकूल लाभार्थ्यांची पिळवणून करतात. समजा लाभार्थी तालुकास्थळी आलेच तर अधिकारी त्यांना भेटतील वा त्यांना तात्काळ परवानगी मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे या परवानगीसाठी तालुकास्थळी येणे हे आर्थिक आणि मानसिक दृष्ट्यातरी गरीब लाभार्थ्याच्या अवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे घरकूल बांधकामाचे कार्यादेश देताना सदर लाभार्थ्याला 5 ब्रास वाळूचा उपसा करण्याची परवानगी दिल्यास या प्रकारात होणाèया गैरप्रकाराला आळा बसेल. वनविभाग आणि महसूल विभाग अवैध वाळू उपसाकरणाèया तस्करांसोडून अशा गरीब लाभार्थ्यांनाच टार्गेट करीत असल्याची चर्चा सुद्धा ग्रामीण भागात ऐकावयास मिळत आहे. 
गरीब लाभार्थ्याचे आर्थिक बजेट न बिघडू देता त्याला मिळणाèया शासकीय मदतीतून घरकूल बांधकाम पावसाळ्यापूर्वी कसे पूर्ण होईल, याकडे जिल्हाधिकारी मोहदयांनी लक्ष देणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा घराच्या स्वप्नापोटी झोपडी मोडणाèया गरीबाला पावसाळ्यात दिवस काढावे लागतील. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

22 to 28 Berartimes Epaper





Tuesday 21 April 2020

राज्यातील दारुची दुकानं उघडू शकतात, फक्त एका अटीवर- राजेश टोपेंचे संकेत

coronavirus: Now liquor shops will be opened in Maharashtra, but social distancing has to be compulsory BKP | राज्यातील दारुची दुकानं उघडू शकतात, फक्त एका अटीवर; राजेश टोपेंचे संकेतमुंबई,दि.21 - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील दारूची दुकाने गेल्या महिनाभरापासून बंद आहेत. दारूची दुकाने बंद असल्याने मद्यपींची गैरसोय झाली आहे. दरम्यान, राज्यातील मद्याची दुकाने सोशल डिस्टंसिंगचे पालन करून सुरू करण्यात येतील, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
 काल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना राजेश टोपे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, जर सोशल डिस्टंसिंगचे योग्य प्रकारे पालन होणार असेल तर दारूच्या दुकानांवर बंदी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, ही दुकाने कधीपासून सुरू होतील, याबाबत आरोग्यमंत्र्यानी माहिती दिली नाही. यासंदर्भातील वृत्त मनीकंट्रोल.कॉमने दिले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात आहे. केंद्र शासनाने काही निकष लावून राज्याला रॅपीड टेस्ट करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात ७५ हजार चाचण्या केल्या जातील. मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर राज्याच्या कोरोना उपचार रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यावर भर देण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती त्यांनी दिली.

उद्धव ठाकरे सरकार होरपळून राख होईल-उमा भारती


Palghar mob Lynching Thackeray's government will burnt ashes: Uma Bharti hrb | उद्धव ठाकरे सरकार होरपळून राख होईल; उमा भारती संतांच्या हत्येवरून संतापल्या


नवीदिल्ली,दि.21 : पालघर मध्ये झालेल्या दोन संत आणि त्यांच्या चालकाच्या हत्येमुळे देशातील वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना या प्रकरणाला जातीय़ रंग देऊ नका असे आवाहन केले आहे.

खेळाडू, अभिनेते यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतले आहे. अखेर या घटनेचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी राज्य सरकारवर विश्वास नसून याचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणीही विरोधाकांनी केली आहे. या प्रकरणी अद्याप १०१ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. प्रथमदर्शनी अफवेमुळे झालेल्या गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणावरून माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. पालघरमध्ये या महान संतांच्या हत्येमध्ये ठाकरे सरकार जळून खाक होईल. या घटनेला मी कधीही विसरणार नाही, असा संताप भारती यांनी व्यक्त केला.

युवकाच्या मृतदेहासह चौदा जण परतले गावी


गोरेगाव,दि.21 : तालुक्यातील परसाडीटोला येथील काही युवक मजुरीच्या कामासाठी आंध्रप्रदेश राज्यात गेले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे ते युवक पायी प्रवास करीत गावाकडे निघाले. काही अंतरावर एक टँकर मिळाल्याने त्या माध्यमातून प्रवास करीत होते. त्यातच टँकरचा अपघात झाल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर चौदा युवक जखमी झाले. सर्व जखमींना आंध्रप्रदेशातील रूग्णालयात दाखल करण्यात आले. आणि  (दि.१९) रूग्णालयातून सुट्टी देवून रूग्णवाहिकेच्या माध्यमातून गोरेगाव तालुक्यातील परसाडीटोला गावात सोडण्यात आले. दरम्यान एका युवकाच्या मृतदेहासह चौदा युवक गावात पोहोचताच परिसरात शोककळेसह खळबळ उडाली.
गोरेगाव तालुक्यातील काही युवक मजुरीच्या कामासाठी आंध्रप्रदेश राज्यात रोजगारासाठी गेले होते. संचारबंदीमुळे ते युवक तिथेच अडकून पडले. १५ एप्रिलनंतर मुभा मिळेल, या आशेवर कंत्राटदाराच्या आश्रयाखाली ते तिथेच थांबले. मात्र, १५ एप्रिलनंतर संचारबंदीत वाढ झाल्याने ते १५ युवक गावी येण्यासाठी पायदळ निघाले. काही अंतरावर आल्यानंतर एक टँकर चालकाने त्यांना मदत केली. सर्व युवक टँकरमध्ये बसून येत असताना टँकरचा अपघात झाला. या घटनेत राजेश प्रेमलाल ऊईके रा. परसाडीटोला या युवकाचा मृत्यू झाला. तर चौदा जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी हैदराबाद येथे पुन्हा दाखल करण्यात आले. रूग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर १४ युवकांना राजेशच्या मृतदेहासह रूग्णवाहिकेने गोरेगाव येथील परसाडीटोला येथे पाठविण्यात आले. ते १४ युवक मृतदेहासह गावी पोहोचताच शोककळेसह एकच खळबळ उडाली.

कोरोनाविरुध्दच्या लढाईत सर्वांनी एकत्र यावे- गृहमंत्री अनिल देशमुख

यवतमाळ, दि.21 : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने सर्व विभागामध्ये अतिशय चांगला समन्वय घडवून आणला असून प्रशासनाचे काम उत्तम आहे. कोरोना विरुध्दची लढाई ही सर्वांच्या सहकार्याने लढणे आवश्यक असल्यामुळे या लढाईत सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार सर्वश्री ख्वाजा बेग, डॉ. अशोक उईके, डॉ. संदीप धुर्वे, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते.
3 मे पर्यंत सर्व राज्य व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्याचे आदेश देण्यात आले आहे, असे सांगून गृहमंत्री श्री. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात असलेल्या परप्रांतीयांची व इतर जिल्ह्यातील नागरिकांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाला करण्याचे आदेशित केले आहे. आहे त्या ठिकाणी राहणे, हाच सध्या एकमेव मार्ग आहे. कुटुंबात एखाद्याचे निधन किंवा कोणी अतिशय गंभीरावस्थेत असले तर अशा परिस्थितीत जिल्हास्तरावरील समितीकडून परवानगी घेऊन संबंधितांना जाता येऊ शकते. शासनाच्या वतीने अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सर्वांना लाभ तसेच बीपीएम, एपीएल, अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना धान्य देण्यात येत आहे. ज्या नागरिकाकडे राशन कार्ड नाही, अशा लोकांसाठी जिल्हास्तरावर विशेष निधीची तरतूद करून त्यांना प्राधान्याने धान्य पोहचवावे, अशा सुचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.
यावेळी पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे खावटी देण्याचा निर्णय शासनाच्या वतीने लवकरात लवकर घेण्यात येईल. तसेच ज्यांच्याकडे कार्ड नाही त्यांना धान्य देण्यासाठी निधीची तरतूद करण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदारांनी शासन व प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले. तसेच काही सुचना देखील त्यांनी केल्या.

गृहमंत्र्यांची मेमन सोसायटीमध्ये पाहणी : यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शहरातील प्रतिबंधित असलेल्या मेमन सोसायटीमध्ये भेट देऊन प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी बोलतांना गृहमंत्री म्हणाले, जिल्हा व पोलिस प्रशासन चांगले काम करीत असून सर्व विभागचा समन्वय चांगला आहे. कोरोना संदर्भात डॅशबोर्डच्या माध्यमातून नागरिकांना रोज अपडेट माहिती उपलब्ध होते. ग्रामस्तरावरील सर्व यंत्रणा चांगल्या काम करीत असून इंदिरा नगर, जाफर नगर, मेमन सोसायटी हा भाग पूर्णपणे सील करण्यात आला आहे. या भागात प्रशासनाच्यावतीने अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 63 तबलिगी समाजाचे लोक आले होते. यासर्वांकडे प्रशासनाने अतिशय गांभिर्याने लक्ष दिले. सोशल मिडीयाच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी. असे आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल. यवतमाळ जिल्हा लवकरच रेड झोनमधून ऑरेंज व नंतर ऑरेंज झेानमधून ग्रीन झोनकडे वाटचाल करेल, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी एकूण 670 चाचण्या करण्यात आल्याचे सांगितले. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 16 पॉझेटिव्ह रुग्णांपैकी 9 जणांना सुट्टी देण्यात आली असून सद्यस्थितीत 7 पॉझेटिव्ह रुग्ण भरती आहे. संस्थात्मक विलगीकरणात एकूण 142 जण तर गृह विलगीकरणात एकूण 789 जण असल्याचेही त्यांनी सांगितले.

Monday 20 April 2020

राष्ट्रीय महामार्गवर 20 एप्रिलपासून पुन्हा सुरू होईल टोलवसुली

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.18. सरकारने देशातील ट्रक वाहतुकीस मान्यता दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 20 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर टोलवसुली पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी कोरोनाव्हायरसमुळे एनएचएआयने 25 मार्चपासून सर्व महामार्गांवरील टोलवसुली बंद केली होती. आता एनएचएआयने पुन्हा टोल वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एनएचएआयला लिहिलेल्या एका पत्रात म्हटले की, गृहमंत्रालयाने 20 एप्रिलपासून ट्रक आणि सामनाची वाहतून करणाऱ्या वाहनांना परवानगी दिली आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानंतर एनएचएआयने 20 एप्रिलपासून टोल वसुली सुरू करावी.
टोल वसुलीला अखिल भारतीय मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचा विरोध
ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने (एआयएमटीसी) 20 एप्रिलपासून टोल वसुलीला विरोध दर्शविला आहे. एकीकडे, सरकारला सर्व आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करण्याची इच्छा आहे, जे आम्ही प्रत्येक कठीणप्रसंगी करण्यास तयार आहोत. मात्र दुसरीकडे, सध्याच्या परिस्थितीत मोडकळीस आलेल्या वाहतूक व्यवसायाला कोणतीही सवलत देण्यास तयार नाही. सरकारने ट्रान्सपोर्टला काही लाभ द्यावेत जेणेकरून त्यांना थोडी मदत मिळू शकेल.
20 एप्रिलपासून शासनाने वाहतुकीस परवानगी दिली
20 एप्रिलपासून सर्व प्रकारच्या मालाची वाहतूक करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. रेल्वेद्वराे सामान आणि पार्सल पाठवण्यात येतील. कार्गो विमाने देखील मदत करण्यासाठी आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी वापरण्यात येतील. बंदरांतून देशामध्ये आणि बाहेर एलपीजी, अन्न व वैद्यकीय पुरवठा केला जाईल. रस्त्याद्वारे आवश्यक वस्तू घेऊन जाणारे ट्रक आणि वाहनांना परवानगी दिली आहे. यामध्ये दोन चालक आणि एक मदतनीसला परवानगी मिळेल.

वृत्तपत्र वितरणावरील बंदीला नागपूर खंडपीठात आव्हान



नागपूर,दि.20 : वृत्तपत्र छापावेत मात्र त्यांचे घरोघरी जाऊन वितरण करू नये या राज्य सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेत राज्याचे मुख्य सचिव, माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला नोटीसा बजावल्या असून दोन दिवसात म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 एप्रिल रोजी होणार आहे.
महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे संयुक्तपणे सोमवारी सकाळी ही याचिका दाखल करण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी दिली.
या याचिकेत राज्य सरकारने वृत्तपत्र वितरणावरील बंदीला तीव्र विरोध दर्शविला असून त्याला बेकायदेशीर, अतार्किक आणि असंवैधानिक म्हणून संबोधले आहे. वृत्तपत्रांचे प्रसारण आणि वितरणावरील बंदी हा भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करणारा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने आधी दिलेल्या अनेक निर्णयांविरूद्ध आहे, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर कोरोना सारख्या साथरोगांचा प्रसार होऊ नये यासाठी जो भाग प्रतिबंधित केला आहे, त्या भागात घरोघरी वृत्तपत्र टाकण्यात येऊ नये ही सूचना योग्य आहे. परंतू सरसकट राज्यभरात वितरणावर बंदी हा आदेश मान्य करता येणारा नाही. एकीकडे सरकार किराणा, भाजीपाला घरपोच देण्याच्या सूचना दुकानदारांना देत आहे. तसेच हॉटेलचालकांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी घेऊन घरोघरी अन्न पोहचवण्याची सक्ती करीत आहे. आणि दुसरीकडे वृत्तपत्रे मात्र घरोघरी पोहचवू नयेत, अशी सक्ती करीत असून हा विरोधाभास आहे. आजघडीला वृत्तपत्र निर्जंतुकीकरण करून छापण्यात येत आहेत, त्याचबरोबर वृत्तपत्राच्या वितरणामध्ये विक्रेता आणि ग्राहक यांच्यामध्ये संपर्कही येत नाही. त्यामुळे वृत्तपत्र वितरणावर बंदी घालणे म्हणजे नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करण्यासारखेच आहे. नागरीकांना विश्वासार्ह बातम्या मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचाही मुद्दा याचिकेत नोंदला आहे.

सर्व हल्लेखोर तुरुंगात, सीआययडी कसून तपास करीत आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई दि 20: पालघर येथे तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून यातील प्रमुख ५ हल्लेखोर आणि सुमारे १०० जणांना पकडले असून गुन्हा अन्वेषण विभाग कसून तपास करीत आहे. मृतांमध्ये दोन साधू होते मात्र या प्रकरणाला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते आज सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते.
सध्या आम्ही कोरोनाचे युद्ध नेटाने लढत आहोत. काही जण या घटनेवरून सोशल मिडीयाच्या माध्यमातून वातावरण तापवण्याचा प्रयतन करीत आहे मी याविषयी गृहमंत्री अमित शहा यांना सकाळी दूरध्वनीवरून बोलून सर्व कल्पना दिली आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या घटनेवर अधिक भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की १६ तारखेस कासा पोलीस ठाणे हद्दीत ज्या ठिकाणी हा घृणास्पद प्रकार घडला तेथून अवघे काही मीटर अंतरावर दादरा नगर हवेली या केंद्र शासित प्रदेशाची सीमा सुरु होते.
संबंधित साधू आणि त्यांच्याबरोबरची मंडळी या सीमेवरून जात असतांना तेथील पोलिसांनी एवढ्या मध्यरात्री त्यांना अडवून परत पाठवले आणि ते परतत असतांना या दुर्गम ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला गेल्या काही दिवसांपासून त्या भागात पसरलेल्या अफवेमुळे गैरसमजुतीने झाला. हा भाग पालघर पासून ११० किमी अंतरावर आहे. मात्र महाराष्ट्र पोलिसांनी अतिशय तातडीने याठिकाणी धाव घेतली आणि दिवसभरात १०० पेक्षा जास्त लोकांना पकडले , त्यात ९ अल्पवयीन मुले असून त्यांना रिमांड होम मध्ये पाठवण्यात आले आहे. उर्वरित हल्लेखोर तुरुंगात असून अतिशय कठोर कारवाई करणार आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले.
दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा याप्रकरणी निलंबितही केले आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की माझे गृहमंत्री त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही बोलणे झाले आहे. याठिकाणी कुठलाही धार्मिक संदर्भ नाही तसेच जातीय वळण देणे अतिशय चुकीचे आहे असे आपण त्यांना सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पोलिसांवर देखील या जमावाने हल्ला केला तसेच त्यांच्या वाहनांची नासधूस केली असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अटी व शर्तीच्या अधीन राहून,जिल्ह्यातील रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू करावे

गोंदिया दि.20ः जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना अमलात आणण्यात येत आहे.जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कायदा लागू करण्यात आला आहे.3 मेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे विभागाची कामे अपूर्ण असून प्रगतीपथावर आहे. येणारा पावसाळा व आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता रस्त्याची व रेल्वेची कामे पूर्ण होणे गरजेचे आहे.त्यामुळे अत्यावश्यक सेवा ही कोलमडणार नाही.
केंद्र शासनाच्या 15 एप्रिलच्या आणि राज्य शासनाच्या 17 एप्रिलच्या आदेशाने रस्त्यांचे बांधकाम व जलसंधारणाची कामे इत्यादी प्रकल्प सुरू ठेवण्यास अनुमती दिली आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य अभियंत्यांनी सुद्धा राष्ट्रीय महामार्गांतर्गत येणारी कामे सुरू करण्याबाबत सूचित केले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष डॉ. कादंबरी बलकवडे यांनी एका आदेशाद्वारे पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून रेल्वे विभागाची व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कामे चालू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सद्यस्थितीत संबंधित कामाच्या ठिकाणी असलेल्या मजुरांकडून ही कामे करण्यात यावी.बाहेरून कोणतेही नवीन मजूर आणू नये.मजुरांना व त्यांच्या कुटुंबीयांना कामाचे क्षेत्र सोडून जाण्यास पूर्णता प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हयाबाहेरून या कामाकरिता नवीन मजुर आणता येणार नाही. मजुरांना बांधकामाच्या ठिकाणी दैनंदिन जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी अन्नधान्य, भाजीपाला,किराणा व इतर आवश्यक बाबी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था संबंधित कंत्राटदाराने करावी.
कामाच्या ठिकाणी कंत्राटदाराने हँडवॉश स्टेशन तयार करावे. मजुरांना सॅनिटायझर व मास्क पुरवावे.सामाजिक अंतर ठेवून प्रत्यक्ष कामे होत असल्याची खात्री संबंधित कंत्राटदाराने करावी.कामावरील मजुर, त्यांचे कुटुंबीय,पर्यवेक्षीय कर्मचारी व अभियंते यांच्यापैकी कोणालाही कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्यास तातडीने महसूल किंवा आरोग्य विभागात कळवावे. स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची राहील.
कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत सर्व मजूरांना व कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना त्यांच्या मातृभाषेतच स्पष्टपणे सांगाव्यात. मजुरांची नियमित वैद्यकीय तपासणी करावी. कोणत्याही मजुरांची प्रकृती बिघडणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. एक वेगळी नोंदवही यासाठी तयार करून ठेवावी.यामध्ये मजुरांची दैनंदिन आरोग्य स्थिती लिहिलेली असावी. मजुरांसाठी पासेस देण्याबाबत स्वतंत्र आदेश पारित करण्यात येतील.
लॉकडाऊन लागू होतांना नगरपालिका/ नगरपंचायत क्षेत्रातील जे बांधकाम प्रकल्प सुरू होते व ज्या प्रकल्पांमध्ये कामाच्या ठिकाणी कामगार उपलब्ध असून बाहेरून कामगार आणण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकल्पांचे काम सुरू ठेवण्यास 20 एप्रिलपासून परवानगी देण्यात आली आहे.मात्र सदर सवलत/परवानगी ही कन्टेन्टमेंट झोनला लागू असणार नाही.तसेच एखादे नवीन क्षेत्र कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित झाल्यास अशा क्षेत्रातील सवलती रद्द होतील.
परवानगी देतेवेळी वरील सर्व सूचनांचे पालन करणे ही संबंधितांची जबाबदारी राहील. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष डॉ.कादंबरी बलकवडे यांनी एका आदेशात नमूद केले आहे.

Monday 6 April 2020

रानडुकराचे मास विकतांना वनविभागाने रंगेहात पकडले


अर्जुनी-मोर(संतोष रोकडे)दि.06ः अर्जुनी-मोर तालुक्यातील इटखेडा येथील हेमराज ऊर्फ विक्की भोजराज कांबळे (वय 26)याला रान डुकराचे मास आपल्या राहत्या घरी शिजवून तसेच विक्री करताना रंगेहात पकडून भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आले.
आरोपी हेमराज आपल्या राहत्या घरी रानडुकराचे मास शिजवून विक्री करीत असल्याची माहिती मिळताच अर्जुनी-मोर वन परिक्षेत्र अधिकारी बी.टी.दुर्गे,वडेगाव क्षेत्र सहाय्यक एम.ओ.राऊत,इटखेडा वनरक्षक कु.पी.आर.राऊत,एन.के.भैसारे,प्र.मो.केळवतकर व इतर वनविभागाचे वनकर्मचारी यांनी 4 एप्रिल रोजी आरोपीच्या घरी धाड घालून चौकशी केली असता त्यांना रानडुकराचे अर्धवट शिजविलेले मांस,लोखंडी काता आदी साहित्य आढळून आल्याने वनरक्षक कु.पी.आर.राऊत यांनी गुन्हा नोंद करून आरोपीला अटक करून कोर्टात हजर केले.

दिवा लावण्याचा नादात जिवती तालुक्यात घरच जळाले



चंद्रपूर,दि.06 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी घरातील लाईट बंद करून दिवे, टार्च लावून दारात उभे राहण्याचे आवाहन केले होते.या आवाहनाला एकीकडे जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला असतानाच मात्र लावलेल्या दिव्यामुळे जिवती तालुक्यात दोन घरे जळाली. 
पाटण येथील कुंदन उईके व पल्लेझरी श्रीहरी वाघमारे यांना दिवे लावणे महागात पडले.जिवती तालुक्यातील पाटण येथील कुंदन देवराव उईके यांनी रविवारी रात्री ९ वाजता पंतप्रधानांच्या आवाहनानुसार आपल्या घरामध्ये लाईट बंद करून दिवे लावले. त्यानंतर उईके यांचे कुटुंबीय झोपी गेले. दरम्यान, रात्री १ वाजताच्या सुमारास अचानक दिव्यामुळे घराला आग लागली. काही वेळात ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरड केली असता गावातील लोकांनी पाणी टाकून आगीला आटोक्यात आणले. मात्र तोपर्यंत घरातील धान्य व जीवनावश्यक वस्तू तसेच महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक झाले. रोख रक्कम १५ हजार रुपये, एक ते दीड क्विंटल तुरी, स्वस्त धान्य दुकानातून आणलेले ५० किलो धान्य, ज्वारी, वडिलोपार्जित जमिनीचा सातबारा, जातीचे दाखले, मतदान कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक इत्यादी वस्तू आगीत जळाल्याची माहिती कुंदन देवराव उईके, विमल कुंदन उईके यांनी दिली. पाटण येथील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौधरी व बिट अमलदार साहेबराव कालापाहड यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.पल्लेझरीतील घरालाही आगजिवती तालुक्यातीलच पल्लेझरी येथील श्रीहरी वाघमारे यांच्या घरालाही रविवारी लावलेल्या दिव्यामुळे आग लागली. श्रीहरी वाघमारे यांनी रविवारी रात्री कोरोनाशी लढा देण्यासाठी आम्ही सारे एक आहोत, हा संदेश देण्यासाठी रात्री ९ वाजता घरी दिवे लावले. मात्र याच दिव्यामुळे त्यांच्या घराला आग लागली. गावकऱ्यांनी पाण्याने ही आग विझविली. मात्र आगीत वाघमारे यांचे मोठे नुकसान झाले.

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ६३८ वर 32 मृत्यू


 

मुंबई,दि.05. राज्यात शनिवारी २४ तासांत एकूण १४५ नव्या रुग्णांची नोंद असून आज सकाळी बुलडाण्यात आणखी 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
एकूण रुग्णांची संख्या ६३८ वर पोहोचली आहे. यापैकी ९९ रुग्णांची नोंद ही मुंबईत झाली आहे. पुण्यात १२, ठाणे जिल्हा व अन्य मनपामध्ये २२, नागपूर, अहमदनगर, हिंगोली, अमरावती प्रत्येकी १, लातूर ८, उस्मानाबादेत २ रुग्णांची नोंद झाली. शनिवारी ६ जणांचा मृत्यू नाेंद झाला. यापैकी ४ जण मुंबईतील, १ मुंब्रा ठाणे व १ अमरावतीचा आहे. मृत्यूंचा आकडा आता ३२ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात ४२ हजार ७१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २९१३ जण संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत. मरकजमधील रुग्णांचा आकडा ७ वर स्थिर आहे. यात निलंग्यातील रुग्णांचा समावेश नाही. यातच आता पुण्यातील मृतांचा आकडा 5 वर गेला आहे. पुण्यातील एका स्लम भागात वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पाचही मृत्यू झालेल्या रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. स्थानिक संसर्गातून या पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

Saturday 4 April 2020

जनतेला मी वाचवेन पण ‘तुम्हाला’ सोडणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


अफवा पसरविणाऱ्यांना इशारा
Coronavirus: I will save the public from corona but will not leave you; Chief Minister Uddhav Thackeray's warning pnm | Coronavirus:...तर खबरदार, जनतेला मी वाचवेन पण ‘तुम्हाला’ सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा


मुंबई,दि.04 – कोरोनाविरुद्धच्या लढाईत अनेक हॉटेल्सने युद्धात लढणाऱ्या डॉक्टरांची राहण्याची सोय करतात. अनेक जण या कार्यात मदत करतायेत. त्या सर्वांचे आभार मानतो. मी माझ्या आवाहनात हात जोडतो, विनंती करतो हे शब्द वापरतो. पण कोविड १९ सारखा आणखी एक व्हायरस समोर येत आहे. जनतेला वाचवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन, नोटांना थुकी लावून व्हिडीओ पसरवले जात आहेत. जर कोणी जाणूनबुजून अफवांचे व्हायरस पसरवत असाल तर खबरदार, तुम्हाला सोडणार नाही. जनतेला मी कोविड पासून वाचवेन पण तुम्हाला कायद्यापासून कोण वाचवणार नाही असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, सिंगापूरच्या पंतप्रधानांनी मंगळवारपासून लॉकडाऊन सुरु होणार आहे . देश कोणताही असो, जातपात धर्म कोणताही असो शत्रू एकच आहे. नाईलाजास्तव घरात राहावंच लागणार आहे. पंतप्रधानांशी चर्चा होत असते. सोनिया गांधी, शरद पवारांशी चर्चा झाली, अनेक धर्मगुरु, मौलवी यांच्याशी चर्चा सुरु आहे. प्रत्येक जण आपापल्या परिने आवाहन करत आहे. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन संपणार आहे. पण राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आपल्याला काळजी घ्यायला हवी असं त्यांनी सांगितले.तसेच कोरोनाची चाचणी केंद्र वाढवण्यात आली आहे. ५१ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेलेत. दुर्दैवाने काही मृत्यू झालेत यात वृद्ध, आजारी व्यक्ती यांचा समावेश आहे. आपल्या घरातील वृद्ध लोकांची काळजी घ्या. त्यांच्यापासून अंतर राखणे, घराबाहेर जाऊ नये, हात स्वच्छ करुन त्यांची सेवा करा. सर्व देशात हीच काळजी घेतली जात आहे. दिल्लीत जे घडले ते महाराष्ट्रात होऊ दिलं नाही. राज्यात परवानगी मागण्यात आली पण कोरोनामुळे ही परवानगी नाकारली. जे दिल्लीतून राज्यात आले त्यांची यादी मिळाली यातील १०० टक्के लोकांचा शोध घेतला आहे. त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवलं आहे. येत्या काही दिवसात पुढील सूचना मिळेपर्यंत महाराष्ट्रात कोणताही राजकीय,क्रीडा आणि धार्मिक कार्यक्रमाला परवानगी दिली जाणार नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.त्याचसोबत राज्यात ५ लाखाच्या आसपास परराज्यातील मजूर वास्तव्यात आहे. त्यांना दोन वेळचं जेवण, डॉक्टर्स वैगेरे सुविधा दिल्या आहेत. कोणालाही कुठे जायची गरज नाही. आमच्या राज्यातील लोकांचीही इतर राज्यात काळजी घ्यावी. इतर राज्यात कोणीही माणूस अडकला आहे तर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधावा, त्यांची मदत करण्याबाबत त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.दरम्यान, अतिरेक्यांचे लक्ष मुंबईत असते तर व्हायरसचं लक्षही मुंबई आहे. मुंबईकर शौर्याने या संकटाला सामोरे जात आहे. मुंबईने अनेक धक्के पचवले आहेत. त्यामुळे मुंबईला काही होणार नाही. लोकांनी काळजी घ्या. कोविड १९ ची लक्षण आढळत असतील तर जे हॉस्पिटल दिलेत तिथेच चाचणी करण्यास जा. सर्दी, खोकला या सर्वापासून खबरदारी घ्या.  अत्यावश्यक कामासाठी जर बाहेर जात असाल तर मास्क लावलं पाहिजे असं सिंगापूरमध्ये सांगितलं तसं आपल्याकडेही करायला हरकत नाही. मास्क पाहिजे असं नाही घरातील स्वच्छ कापड तोंडाला बांधून बाहेर जा. मार्केटमध्ये गर्दी करु नका, २४ तास दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. गर्दीतसुद्धा अंतर ठेऊन राहा अशीही सूचना मुख्यमंत्र्यांनी लोकांना दिली.

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५३७ वर



मुंबई,दि.0४: राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ४७ ने वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला कोरोनाग्रस्तांचा आकडा ५३७  वर पोहोचला आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. या ४७ रुग्णांपैकी ४३ रुग्ण हे मुंबई आणि ठाण्यातले आहेत. यापैकी २८ पॉझिटिव्ह रुग्ण मुंबईत तर १५ पॉझिटिव्ह रुग्ण ठाण्यात सापडले आहेत. अमरावतीत १ रुग्ण, २ पुण्यात, तर पिंपरीत १ रुग्ण सापडला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ५३७ वर गेली आहे. कालरात्रीपर्यंत ही संख्या ४९० होती. आता ही संख्या ५३७ झाली आहे.
आज मुंबईत 28, ठाणे 15, अमरावती 1, पुणे 2, पिंपरी-चिंचवडमध्ये 1 अशा एकूण 47 नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यातील एकूण रुग्णांच्या संख्येवर नजर टाकल्यास  मुंबईत सर्वाधिक 306, पुण्यात 73, ठाणे आणि एमएमआर परिसरात 70, सांगली 25, अहमदनगर 20, नागपूर 16, बुलढाणा 5, यवतमाळ 4,सातारा आणि औरंगाबाद प्रत्येकी 3, कोल्हापूर आणि रत्नागिरी प्रत्येक 2 आणि सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, उस्मानाबाद, वाशीम, जळगाव आणि अमरावती येथे प्रत्येकी एका कोरोनाबधिताची नोंद झाली आहे.  राज्यातील कोरोनाचं संकट वाढताना दिसत आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या सरकारची चिंता वाढवणारी आहे. अशातच आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचे ३ रुग्ण आढळून आल्याने खळबळ माजली आहे. धारावीत कोरोनाचं संक्रमण वाढलं तर कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू शकते. त्यानंतर हे रोखणं सरकारसमोर आव्हान असणार आहे. त्याचसोबत मुंबईत सीआयएसएफच्या ६ जवानांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 

तात्पुरत्या निवाऱ्यातील महिलेने दिला बाळास जन्म


देवरीतील आरोग्य चमू धावली मदतीला

सुरेश भदाडे

देवरी,दि.०४- कोरोना संसर्गाच्या भीतीने देशात सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती. सर्वकाही थांबलेले. प्रत्येकजण आहे तेथेच थांबलेला. अशातच देवरीतील एका खासगी पब्लिक स्कूलमध्ये सोलापूर जिल्ह्यातील पोटासाठी भटकंती करणाऱ्या एका गटासाठी प्रशासनाने तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली. या निवाऱ्यातील लोकांच्या आरोग्याची खबरदारी आरोग्यविभागावर सोपविण्यात आली. काल त्यातील एका महिलेला अचानक प्रसूती कळांचा त्रास जाणवायला लागल्या. अन तिच्या मदतीला आरोग्य विभागाची चमू देवदूतासारखी धावून आली. त्या महिलेने साकोलीच्या एका खासगी रुग्णालयात एका गोंडस बाळाला जन्म दिला.
हातावर पोट असलेला समाज राज्यात भटकंती करून आपले जीवन जगत असतो. असाच एक लोकांचा समूह देवरी तालुक्यात सुद्धा भटकंतीवर होता. अचानक देशात कोरोना संसर्गाने आणीबाणीची स्थिती उत्पन्न झाली. देशात सर्वत्र एकाचवेळी लॉकडाऊन घोषित करण्यात आले. प्रत्येक जण आहे तिथेच अडकला गेला. परिणामी, या भटकंती करणाऱ्या समाजावरही थांबण्याची वेळ आली. यावेळी तालुका प्रशासन त्यांच्या मदतीला धावून आला. त्या सर्वांची देवरीच्या एका स्थानिक पब्लिक स्कूलमध्ये राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय करण्यात आली. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे यांच्या चमूने घेतली. या निवाऱ्यात असलेल्या एका गर्भवती महिलेला काल सायंकाळी अचानक प्रसूती कळा यायला सुरवात झाली. डॉ. कुकडे यांनी यांची वेळीच दखल घेतली. डॉक्टर आणि परिचारिकांची चमू तेथे पोचली. प्राथमिक तपासणी करून रुग्णाला देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, प्रसूती गुंतागुंतीची असल्याने स्थानिक डॉक्टरांपुढे पेच निर्माण झाला. देवरी येथे प्रसूती शक्य नसल्याने डॉ. कुकडे यांनी त्या महिलेला साकोली तेथील पार्वती नर्सिंग होम येथे नेण्याचा निर्णय घेतला. पार्वती नर्सिंग होमचे डॉ. लंजे यांच्या देखरेखीत त्या महिलेवर शल्यचिकित्सा करण्यात आली. अखेर त्या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
प्रियंका कैलास इंगोले (वय २३) राहणार पडोळकरवाडी, पोस्ट हुन्नर, तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असे आहे. नवजात बाळाचे वजन १९०० ग्रॅम असून बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप असल्याची माहिती देवरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे यांनी बेरारटाईम्सशी बोलताना दिली.  डॉ. कुकडे यांनी पुढे सांगितले की, या महिलेसह तिच्या बाळाच्या आरोग्याची जबाबदारी आरोग्यविभागाने उचललेली असून प्रसूतिपश्चात चार दिवसाने बाळ आणि बाळंतीण हिला एका खास रूममध्ये शिफ्ट करण्यात येणार असून दोघांच्याही आरोग्याची खबरदारी घेण्यात येईल. अडचणीच्या काळात मदतीला देवासारखे धावून येणाऱ्या वैद्यकीय चमूचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


Friday 3 April 2020

देवरीत शिवभोजन योजनेचा शुभारंभ

देवरी,दि.03 - गरीब आणि गरजू नागरिकांसाठी राज्य सरकारने सुरु केलेल्या शिवथाळी भोजन योजनेचा आज शुक्रवारी (दि.03) देवरी येथे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे कोरोना संक्रमण काळात लाभार्थ्यांना नाममात्र पाच रुपयात या योजनेचा लाभ घेता येईल.
स्थानिक तहसील कार्यालयासमोरील रेशीम भोजनालयामध्ये शिवथाळी भोजन योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी पुरवठा निरीक्षण अधिकारी अगळे, पुरवठा अधिकारी झोडापे, पत्रकार सुनील चोपकर, महेंद्र वैद्य, प्रितम गजभिये, सुरेश भदाडे, सुनील अग्रवाल, शिवसेना उपतालुकाप्रमुख राजेश पटले, नंदू शर्मा रेशीम भोजनालयाचे संचालक ज्योतिबा धरमशहारे आदी मान्यवर उपस्थित होते. या भोजन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दहा रुपयांत भोजन मिळेल, मात्र, कोरोना संक्रमण काळात या भोजनथाळीची किमत पाच रुपये ठेवण्यात आली आहे. देवरीमध्ये प्रारंभी 75 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ सकाळी 11 ते 3 वाजेदरम्यान घेता येईल. लाभार्थ्यांना या योजनेच्या लाभासाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

Wednesday 1 April 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लाभार्थ्यांना मिळणार त्या – त्या महिन्यातच धान्य


*अतिरिक्त धान्य मोफत मिळणार*
गोंदिया दि.१(जिमाका) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत एप्रिल ,मे आणि जून 2020 चे धान्य एकत्रितपणे देण्याचे शासनाने घोषित केले होते. शासनाच्या नवीन निर्देशानुसार एप्रिल, मे आणि जून 2020 चे धान्य आता त्या-त्या महिन्यातच लाभार्थ्याला वितरित करण्याचे निश्चित केले आहे.
जिल्ह्यातील सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांचा एप्रिल महिन्याचा धान्यसाठा पॉस मशीनवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना 35 किलो धान्य यामध्ये 10 किलो गहू आणि 25 किलो तांदूळ असा दोन रुपये प्रति किलो गहू आणि तीन रुपये प्रति किलो तांदूळ याप्रमाणे मिळणार आहे.प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती दोन किलो गहू दोन रुपये प्रति किलो दराने आणि तीन किलो तांदूळ तीन रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे फक्त अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना एक किलो साखर 20 रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे.
प्रधानमंत्री गरीब कुटुंब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना अर्थात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती अतिरिक्त 5 किलो तांदूळ प्रति महिना 31 मार्च 2020 च्या शासन निर्णयानुसार मंजूर केले आहे. हे अतिरिक्त धान्य लाभार्थ्यांना मोफत मिळणार आहे.त्याचा डेटा अद्याप पास मशीनवर उपलब्ध झालेला नाही. तो डेटा आणि धान्य लवकरच उपलब्ध झाल्यानंतर याच महिन्यात अतिरिक्त पाच किलो तांदळाचे मोफत वाटप करण्यात येईल. त्यानंतरही मे आणि जूनचे मोफत धान्य त्या-त्या महिन्यातच वाटप करण्यात येईल. तोपर्यंत सर्व शिधापत्रिकाधारकांनी एप्रिल महिन्याचे आपआपले धान्य आपल्या स्वस्त धान्य दुकानातून गर्दी न करता सामाजिक अंतर ठेवून घेऊन जावे. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी केले आहे.

विस्थापित, बेघर व भिकारी आढळल्यास निवारागृहात पाठवा- जिल्हाधिकारी


भंडारा, दि. 01 :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक कामगारांना फटका बसला आहे. अशा कामगारांसह बेघर व भिकारी जिल्ह्यात कुठेही आढळल्यास तात्काळ सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील निवारागृहात त्यांची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसीलदार यांना दिल्या आहेत.
भंडारा जिल्ह्यात 9 ठिकाणी निवारागृहे (शेल्टर होम) सुरू करण्यात आले आहेत, या निवारागृहात 700 नागरिकांची राहण्याची व्यवस्था आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात ही सोय करण्यात आली आहे. भंडारा 4, लाखनी 2, साकोली, तुमसर, लाखांदूर व पवनी प्रत्येकी एक अशा 9 वसतिगृहात निवारागृह तयार करण्यात आले आहेत.
विस्थापित, कामगार, बेघर व भिकारी व्यक्तीची राहण्याची अथवा जेवणाची सोय नाही व्यकींना निवारागृहात ठेवण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त आशा कवाडे यांच्याशी संपर्क साधून गरजूंची तात्काळ व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना अन्न मिळेल याकडे जातीने लक्ष पुरवावे असे त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे जिल्हा पुरवठा कार्यालयाने गरीब व गरजू व्यकींना वितरीत करण्यासाठी 14 क्विंटल तांदूळ उपलब्ध करून दिला आहे. हा तांदूळ तहसीलदार यांच्याकडे देण्यात आला अजून गरजूंना तांदुळ वाटपाचे काम प्रत्येक तालुक्यात तहसीलदार यांचे मार्फत सुरू आहे. मागणी वाढल्यास तांदूळ पुरवठा केला जाईल.
लॉकडाऊनच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात बेघर झालेले नागरिक, विस्थापित झालेले तसेच परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्नधान्य, व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत, त्या नुसार जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष तसेच अडकलेल्या व बेघर नागरिकांसाठी निवारागृहे सुरू केली आहेत.
बेघर तसेच विस्थापित कामगारांसाठी निवारागृहात अन्नधान्य, भोजन, पाणी, वैधकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
विविध ठिकाणाहून येणाऱ्या विस्थापित व बेघर नागरिकांची व्यवस्था करण्याची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त आशा कवाडे यांच्या कडे आहे. त्या स्वतः जातीने व्यवस्था पाहत आहेत. निवारागृहातील नागरिकांना दोन वेळचे जेवण, चहा, नास्ता, गरजूंना कपडे, सॅनिटायझर, ब्रश, साबण, तेल इत्यादी वस्तू पुरविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवूनच सर्व व्यवहार केले जातात. नागरिकही हा नियम कसोशीने पाळतात. आरोग्य विभागाच्या वतीने आज येतील नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...