Monday 27 February 2017

सैनिक कन्या म्हणते, ABVPला घाबरत नाही

नवी दिल्ली - दिल्ली विद्यापीठाच्या रामजास महाविद्यालयात बुधवारी (ता. 22) "अखिल भारतीय विद्यार्थी परिषद' आणि डाव्या विचारसरणीच्या "ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन'च्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या जोरदार संघर्षानंतर दुसऱ्या दिवशी कारगिलमधील एका हुतात्मा सैनिकाच्या मुलीने सोशल मीडियावर "अभाविपला मी घाबरत नाही' असा प्रचार सुरू केला. तो आता व्हायरल झाला आहे. 
"जेएनयू'मधील विद्यार्थी उमर खालिद आणि शेहला मसूद यांना चर्चासत्रासाठी आमंत्रित करण्यावरून तणाव निर्माण झाला होता. त्यातून "अभाविप' व "एआयएसए'च्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष झाला. त्याने व्यथित झालेल्या गुरमेहर कौर या लेडी श्रीराम महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने ""मी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. "अभाविप'ला मी घाबरत नाही. मी एकटी नाही तर देशातील प्रत्येक विद्यार्थी माझ्याबरोबर आहे,'' अशा मजकुराचा फलक हातात धरलेले छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केले आहे. "स्टुडंट्‌स अग्नेस्ट एबीव्हीपी' या शीर्षकाखाली तिने सोशल मीडियावर प्रचार मोहीम सुरू केली आहे. कारगिल युद्धात हुतात्मा झालेले कॅ. मनदीपसिंग यांची गुरमेहेर मुलगी आहे. 
"अभाविप'ने निरपराध विद्यार्थ्यांवर केलेला हल्ला हा व्यथित करणारा असून, तो थांबवायला हवा होता. हा केवळ आंदोलकांवरील हल्ला नसून देशवासीयांच्या हृदयात वसणाऱ्या लोकशाहीतील प्रत्येक घटकावरील हल्ला आहे. कल्पना, नैतिकता, स्वातंत्र्य व भारतात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या अधिकारावरील हा हल्ला आहे. तुम्ही केलेल्या दगडफेकीमुळे आमच्या शरीरावर जखमा झाल्या तरी आमच्या मूल्यांना तुम्ही धक्का पोचवू शकत नाही. भयाच्या जुलमाचा निषेध मी माझ्या छायाचित्रातून केला आहे,'' असे तिने फेसबुकवर म्हटले आहे. 
गुरमेहरच्या पोस्टला मोठा प्रतिसाद 
साहित्याचा अभ्यास करणाऱ्या गुरमेहरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी व समवयस्कांनी तिची पोस्ट शेअर केली असून, विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी त्यांची फेसबुकवरील छायाचित्रे गुरमेहरच्या छायाचित्रांप्रमाणे करण्याचे आवाहन केले आहे. तिच्या पोस्टवर दोन हजार 100 प्रतिक्रिया आल्या असून, तीन हजार 456 जणांनी ती शेअर केली आहे, तर 543 कमेंट्‌स आल्या आहेत.

Sunday 26 February 2017

ओबीसींचे जिल्हा अधिवेशन ५ मार्च रोजी देवरीत

गोंदिया- ओबीसी आंदोलनाला गतिमान करणाèया ओबीसी सेवासंघ आणि ओबीसी कृती समिती, गोंदिया यांचे संयुक्त वतीने ओबीसी समाजाचे जिल्हा अधिवेशन येत्या रविवार (ता. ५मार्च) देवरी येथे आयोजित करण्यात आले आहे.
स्थानिक आफताब मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता आयोजित या अधिवेशनातील पहिला सत्राचे उद्घाटन मुंबईचे इंजि. प्रदीप ढोबळे यांचे अध्यक्षतेत ब्रम्हपुरीचे सामाजिक कार्यकर्ते इंजि. संजय मगर यांचे हस्ते होणार आहे. यावेळी ओबीसी सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष भैयाजी लांबट,आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे गोंदिया जिल्हा सचिव चेतन उईके, सेवासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. बी एम करमकर, जिल्हासंघटक डॉ. गुरुदास येडेवार, संघर्ष कृतिसमितीचे महासचिव मनोज मेंढे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून सुदर्शन लांडेकर हे उपस्थित राहतील. या सत्रात ‘जातीनिहाय जनगणनेशिवाय ओबीसी मंत्रालय अर्थपूर्ण की अर्थहीन‘ असा हा विषय चर्चेला घेण्यात येणार आहे.
दुसèया सत्रात ‘ओबीसींच्या आत्महत्या का?‘ या विषयावर विचारमंथन  होणार असून या  सत्रात मार्गदर्शक म्हणून यवतमाळचे बाळासाहेब गावंडे हे उपस्थित राहणार आहेत. सत्राध्यक्ष म्हणून ओबीसी कृती समितीचे जिल्हासचिव बबलू कटरे हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सविता बेदरकर, अमर वèहाडे, राजेश चांदेवार, सावन कटरे, संजय दरवडे,भरत शरणागत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 या अधिवेशनाच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या खालील प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
१) ओबीसींची जातीनिहाय जनगणना करून शेतकरी व शेतमजुरांच्या विकासाकरिता अर्थसंकल्पात लोकसंख्येनुसार आर्थिक तरतूद करण्यात यावी.
२) पदोन्नतीतील प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे.
३) लोकसंख्यानिहाय प्रतिनिधित्व देण्यात यावे.
४) तामिलनाडू राज्याप्रमाणे असंवैधानिक क्रिमीलेअरची अट रद्द करावी.
५) बिहार राज्याप्रमाणे शैक्षणिक भत्ता लागू करावा.
६) ओबीसी विद्याथ्र्यांसाठी तालुका व जिल्हास्तरावर वसतिगृह व आश्रमशाळा सुरू करणे
७) व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिष्यवृत्ती व शिक्षण प्रतिपूर्ती शुल्क थकबाकीसह देण्यात यावी.
८) ओबीसींसाठी स्वतंत्र मतदारसंघ व मंत्रालय निर्माण करण्यात यावे.
९) रेल्वे बजेटप्रमाणे शेतकèयासाठी स्वतंत्र बजेट असावे.
१०) ओबीसींचे परंपरागत उद्योग राखीव ठेवून प्रोत्साहन देण्यात यावे.
११) शिक्षणाचे बाजारीकरण थांबवून समान शिक्षण पद्धती लागू करण्यात यावी.
१२) मंडल आयोग व नच्चीपन समितीच्या शिफारशी लागू करणे.
या अधिवेशनाला ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Friday 24 February 2017

आरटीई-2009ः 25 टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेला 2 मार्चपर्यंत पुन्हा मुदतवाढ

इम्पॅक्ट

देवरी - राज्यात बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत शिक्षण विभागाने  इयत्ता पहिलीमध्ये 25 टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया चालविली आहे. या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला राज्यातील ग्रामीण भागात मिळणारा प्रतिसाद बघता शिक्षण संचालनालयाने 25 फेब्रुवारीला संपणाऱ्या प्रक्रियेची पुन्हा 2 मार्चपर्यंत मुदतवाढ केली आहे. उल्लेखनीय म्हणजे बेरारटाईम्सने काल (ता23) रोजी या विषयीचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत शिक्षणविभागाने याविषयीचे पत्रक आज (ता.24) काढले.
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार आरटीई कायद्याखाली इयत्ता पहिलीमध्ये गरजू विद्यार्थ्याना मिळणाऱ्या 25 टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेच्या मुदतीत येत्या 25 तारखेपर्यंत मुदतवाढ केली होती. या योजनेत ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे, अशा पालकांच्या पाल्यांनाच शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. यामध्ये इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग गटातील संबंधित पालकांनी अर्ज करुन या योजनेचा लाभ अपेक्षित आहे. असे असले तरी ग्रामीण भागात या योजनेची माहिती अद्यापही पाहिडे त्या प्रमाणात पालकांपर्यंत पोचली नाही. त्यामुळे ग्रामीण  भागात या प्रक्रियेसाठी फार कमी प्रमाणात अर्ज आले. परिणामी, या प्रवेश प्रक्रियेला येत्या 2 मार्चच्या सायंकाळपर्यंत मुदतवाढ देण्याविषयीचे पत्र प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक गोविंद नांदेडे याच्या स्वाक्षरीने काढण्यात आले.

Thursday 23 February 2017

नाशिकमध्ये जमावावर हवेत गोळीबार

नाशिक- हिरावाडी परिसरातील मिनाठाई ठाकरे स्टेडियममध्ये मतमोजणी दरम्यान प्रभाग तीनच्या मतमोजणीमध्ये गोंधळ झाल्याचा आरोप शिवसेना व अन्य काही पक्षांच्या उमेदवारांनी केला. चारही जागांवर भाजपच्या उमेदवारांना आघाडी मिळाल्याने मतमोजणीमध्ये 
फेरफार झाल्याच्या संशयावरुन अन्य राजकिय पक्षांचे कार्यकर्ते या ठिाकणी मोठ्या संख्येने एकत्र आले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यावेळी जमावाने पोलिसांच्या दिशेने मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यास सुरवात केली. हिंसक जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागल्याचे वृत्त आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एकूण चार राऊंड फायर केल्याची माहिती आहे. दगडफेकीमध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. अन्य उमेदवार पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांच्याकडे अन्यायाविरुध्द दाद मागत आहे. परिस्थीती आटोक्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

प्रभाग तीन मधील चारही जागांवर भाजपाच्या उमेदवारांची आघाडी असल्याने अन्य उमेदवारांनी आक्षेप घेतला. तसेच एकूण मतदान २७००० प्रभाग तीन साठी दाखविण्यात आले मात्र मुळामध्ये एकूण २३००० मतदान झाल्याची नोंद आहे, असा दावा अन्य पक्षांच्या उमेदवारांनी केला आहे. या कारणावरून पोलीस आणि उमेदवार आमने-सामने आले. अन्य उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसह भाजपाचे कार्यकर्ते आपआपसांत भिडले. आमदार बाळासाहेब सानप हे भाजपाचे शहराध्यक्ष असून त्यांचा हा मतदारसंघ असलेला परिसर आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या उद्रेकाचा संताप पत्रकारांवर व प्रसिध्दीमाध्यमांच्या छायाचित्रकारांवर काढला. लाठीचार्जमध्ये प्रसिध्दीमाध्यमांचे प्रतिनिधींनाही पोलिसांनी लक्ष्य के ल्याचे वृत्त आहे. या भागामध्ये झालेल्या दगडफेकीत सुमारे वीस वाहनांचे नुकसान झाले आहे.

मुंबईत शिवसेनाच नंबर वन - उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 23 - मुंबईकर मतदारांनी शिवसेनेला भरीव यश मिळवून देऊन नंबर 1चा पक्ष बनवला आहे, असं वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. महापालिका निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर ते बोलत होते. मुसलमान मतदारही शिवसेनेकडे वळले असून, वांद्र्यातल्या बेहराम पाड्यात शिवसेनेनं विजय मिळवला आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
नाशिकमध्ये मतदारांची नावं गायब होणं हा मोठा घोळ आहे. मतदारांचा अधिकार कोणीच हिरावून घेऊन शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाला जबाबदार असलेल्या कोणालाही शिक्षा झालीच पाहिजे. या मागे षड्यंत्र आहे का हेही आधी तपासून पाहिलं पाहिजे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मतदार यादीतील घोळावर चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांत भाजपानं पूर्ण ताकद पणाला लावली होती. सत्ता आणि संपत्तीच्या जोरावरच भाजपानं हे यश मिळवलं आहे.

भारनियमन विरोधात शेतकèयांचे आमरण उपोषण आंदोलन

साकोली,दि.२३-तालुक्यातील शेतकèयांनी सत्ताधारी आमदार खासदारासंह सर्वच लोकप्रतिqनधीनी दिलेल्या खोट्या आश्वासनाचा निषेध नोंदवित शेतकरी संटकमोचन समितीच्या नेतृत्वात १६ तासाचे भारनियमन बंद करण्याच्या मागणीला घेऊन आज २३ फेबुवारीपासून विज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलनाला सुरवात केली आहे.जोपर्यंत मागणी पुर्ण होत नाही,तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार समितीच्या सदस्यांनी घेतला आहे.या आंदोलनाचे नेतृत्व डॉ.अजयराव तुमसरे,राम महाजन आदि करीत आहेत.

वर्धा जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता कायम

वर्धा दि. 23 : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने पूर्ण बहुमत घेतले असून सत्ता कायम राखली आहे. या जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोठे प्रस्थ सुरेश देशमुख यांचा पूर्ण पराभव झाला असून राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळू शकली. वर्धा जिल्हा परिषदेत असलेल्या 52 जागांचे निकाल घोषित झाले असून त्यापैकी भाजपला 29 जागांवर विजय मिळाला आहे. कॉंग्रेसचे नेते दत्ता मेघे भाजपमध्ये गेल्यानंतर भाजपची बाजू भक्कम झाली होती. याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला. वर्धा जिल्ह्यात कॉंग्रेसला कोणतेही नेतृत्व नाही

ब्लासम पब्लिक स्कूलला आयएसओ मानांकन


 देवरी-  स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूलचा आयएसओ 9001:2015 हे गुणवत्ता व्यवस्थापन पद्धतीमधील मानांकन देऊन नुकताच गौरव करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, गोंदियाच्या कल्पवृक्ष शिक्षण संस्थेद्वारे गेल्या 8 वर्षापासून देवरी येथे पब्लिक स्कूल चालविले जात आहे. सदर शाळा ही अल्पावधीतच आपल्या कल्पक शिक्षण पद्दतीमुळे नावारुपास आली. या शाळेतील सर्वांगीण शिक्षण पद्धतीत झालेल्या सुधारणांबद्दल संस्थेच्या संचालकसचिव निर्मल अग्रवाल यांनी  या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक सुजीत टेटे यांना  बेरारटाईम्सशी बोलताना दिले.
मुख्याध्यापक टेटे यांनी शाळेला आयएसओ मानांकन मिळण्यासाठी शाळेत आवश्यक तो सुधार करून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न चालविले होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश येत आयएएफ या संस्थेने गेल्या 11 फेब्रुवारी रोजी आयएसओ 9001 हे प्रमाणपत्र देऊन गौरव केला. शाळेला मिळालेल्या मानांकनाबद्दल शाळा व्यवस्थापन आणि पालकांसह तालुक्यातील अनेक मान्यवरांनी मुख्याध्यापक टेटे आणि त्यांच्या सहकाऱ्याचे अभिनंदन केले.

आरटीई २००९ः 25 टक्के मोफत प्रवेशप्रक्रियेला येत्या शनिवारपर्यंत मुदतवाढ


देवरी-  बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,  2009 अतंर्गत राज्याच्या शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीमधील 25 टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेला येत्या शनिवार (ता.25) पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार आरटीई कायद्याखाली इयत्ता पहिलीमध्ये गरजू विद्यार्थ्याना मिळणाऱ्या 25 टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेच्या मुदतीत येत्या 25 तारखेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या नियमांतर्गत गोंदिया जिल्ह्यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ही  05 फेब्रुवारी 2017 पासुन सुरु करण्यात आली होती. ज्यांचे नागरिकांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे, असा पालकांच्या पाल्यांनाय योजनेचा लाभ दिल्या जातो. यामध्ये इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग गटातील संबंधित पालकांनी अर्ज करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ब्लॉसम पब्लिक स्कूलचे मुख्याधापक सुजित टेटे यांनी केले आहे. या योजने अंतर्गत देवरी तालुक्यात एकूण ७५ जागा असून १० जागा ब्लॉसम स्कूल मध्ये आहेत. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने ठरविलेल्या नियमावलीनुसार पालक व पाल्याचे आधारकार्ड , रहिवासी प्रमाणपत्र, शाळेपासून 3 किमीपेक्षा जास्त अंतर नसल्याचा पुरावा, तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला,  जातीचा दाखला , भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांसाठी दुय्यम निबंधक यांचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. गोंदिया जिल्ह्यात उपलब्ध जागांचा तपशील याप्रमाणे

अ.क्र.   तालुका           एकूण शाळा         एकूण जागा      एकूण प्राप्त अर्ज     प्रलंबित अर्ज    मंजूर अर्ज

1         अर्जूनी मोर          11                       126                  35                           09                  26
2         आमगाव             10                       120                 124                          32                  92
3         देवरी                  11                       75                    58                           21                  37
4         गोंदिया               50                       464                700                           172               528
5         गोरेगाव             14                        93                   97                             18                 79
6       सालेकसा             07                      77                   71                              18                 53
7       सडक अर्जूनी       11                      83                   59                              10                 49
8       तिरोडा                 16                     159                221                             44                 177


एकूण                         130                   1197                1365                           324              1041

पंकजा मुंडे मंत्रिपद सोडणार

बीड, दि. 23 - राज्यातील ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. परळीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत पंकजा मुंडे राजीनामा देणार असल्याचं म्हणाल्या आहेत.
 
परळीतील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. पंकजा मुंडेंचा परळीवरचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपात पंकजा मुंडेंची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्युत खांब घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटला

गोंदिया : विद्युत खांब घेऊन भरधाव वेगाने जाणारा ट्रॅक्टर उलटून दोघे जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील राज्यमार्गावर २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.४५ वाजताच्या दरम्यान घडली. मृतकाचे नाव सुरेश भोजराम राऊत (रा.कमरगाव), अनमोल आनंदराव गणवीर असे आहे. तर जखमींमध्ये संतोष हरदुले व अन्य एका मजुराचा समावेश आहे.
गोंदिया येथील कारंजा परिसरात विद्युतलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. ठेकेदाराच्या माध्यमातून विद्युत खांब टॅक्ट्ररव्दारे नेण्यात येत होते. यात गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथील सुरेश,अनमोल, संदीप व अन्य मजूर विद्युत खांब घेऊन जात होते. अचानक टॅॅक्टरवरून चालकाचे नियंत्रण सुटून विद्युत खांब भरलेला ट्रॅक्टर उलटल्याने यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीररित्या जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गोंदिया ग्रामीण पोलीस आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले. आपत्कालीन रुग्णवाहिका १0८ च्या माध्यमातून जखमींना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे

भोसरी प्रकरण माहित नाही- एकनाथ खडसे


समितीसमोर खडसे यांचे घुमजाव? 
नागपूर - पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती डी. झोटिंग समितीसमोर बुधवारी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंची साडेतीन तास उलटतपासणी झाली. भोसरी येथील जमीन व्यवहारबाबत कोणतीही माहिती नसल्याची साक्ष खडसे यांनी यावेळी दिली. यापूर्वी हा व्यवहार योग्य असल्याचा दावा त्यांनी केला होता. आता 27 ला पुन्हा समितीसमोर त्यांची साक्ष होणार आहे. 
महसूलमंत्री असताना पदाचा गैरवापर करून भोसरी येथील जमीन नातेवाइकांना दिल्याचा आरोप खडसेंवर आहे. या आरोपाच्या चौकशीकरिता 23 जून 2016 ला न्यायमूर्ती डी. झोटिंग समिती गठित करण्यात आली. गेल्या आठ महिन्यांत समितीने महसूल व उद्योग, एमआयडीसी विभागाच्या अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविण्यात आली. त्याचप्रमाणे सर्व कागदपत्रांची तपासणीही केली. या प्रकरणाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची उलट चौकशीही केली. साक्ष देण्यासाठी खडसे प्रत्यक्ष समितीसमोर हजर झाले. जमीन खासगी असल्याचे शपथपत्र खडसेंनी समितीला दिल्याची माहिती खडसेंचे वकील ऍड. एम. जी. भांगडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर भोसरीच्या जमीन व्यवहारप्रकरणाची आपल्याला कोणतीही माहिती नसल्याची साक्ष खडसेंनी समितीसमोर दिल्याचे एमआयडीसीचे वकील ऍड. चंद्रशेखर जलतारे यांनी पत्रकरांशी बोलताना सांगितले. जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची बाब अधिकाऱ्यांनी लपविल्याचा खुलासा त्यांनी समितीसमोर केला. त्याचप्रमाणे जमिनीच्या व्यवहाराबाबत माहिती सात, आठ जूनला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. खडसेंनी राजीनामा 3 जूनला दिल्याने त्यांना त्यानंतर कशी माहिती मिळाली, मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे कारण त्यांना माहीत नाही का? असा उलट सवाल एमआयडीसीचे वकील जलतारे यांनी उपस्थित केला. 4 कोटींचा व्यवहार घरातील व्यक्तींकडून होतो आणि त्यांना माहिती नसल्याच्या उत्तरावरही त्यांनी आक्षेप घेतला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युक्तिवादाच्या वेळी खडसे अनेक प्रश्‍नांवर गोंधळले. समितीला त्यांच्याकडून काही प्रश्‍नांचा खुलासा होणे अपेक्षित आहे. खडसेंना काम असल्याने त्यांनी तारीख देण्याची विनंती केली. आता साक्ष नोंदविण्यासाठी खडसे 27 फेब्रुवारीला समितीसमोर हजर होणार आहेत. या संदर्भात खडसेंनी पत्रकारांशी बोलण्याचे टाळले. 

मुंबईत शिवसेनेने 'करुन दाखविलं'

मुंबई - करुन दाखवलं या टॅग लाईननंतर 'Did You Konw' असे म्हणणाऱ्या शिवसेनेने शतकाजवळ मजल मारत खऱ्या अर्थाने करुन दाखविले. शिवसेनेनंतर भाजप दुसऱ्या स्थानी असून, शिवसेनेने एकहाती सत्तेकडे वाटचाल केली आहे.
शिवसेनेने सुरवातीच्या काही तासांतच 90 हून अधिक जागांवर आघाडी घेत महापालिकेवर वर्चस्व राखले. मुंबई महापालिका निवडणुकीत 227 जागांसाठी 2275 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील महत्त्वाच्या माहितीचा गोषवारा त्या-त्या प्रभागातील मतदान केंद्राबाहेर लावण्यात आला होता. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, स्थावर आणि जंगम मालमत्ता, त्याच्यावरील गुन्हे आणि त्याला झालेली शिक्षा असा सर्व तपशील मतदान केंद्राबाहेर लावण्यात आले होते. त्यामुळे यंदाची निवडणूक महत्त्वपूर्ण होती.
प्रभाग क्र. 1 मधून तेजस्विनी घोसाळकर यांनी विजय मिळवत शिवसेनेने पहिला विजय मिळविला. मुंबई महापालिकेत शिवसेनेची पहिल्यापासून आघाडी घेतली होती. 150 वॉर्डमध्ये गोंधळामुळे मतमोजणी थांबविण्यात आली होती. अखेरच्या माहितीनुसार शिवसेनेने 93, भाजप 61 काँग्रेस 22 मनसे 10, राष्ट्रवादी काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर होते. 

कॉ.पानसरे यांना श्रद्धांजली

गोंदिया दि.२3 : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या दुसर्‍या स्मृतिदिनानिमित्त कवी माणिक गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली पानसरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक गोंदिया येथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मिलिंद गणवीर, राजकुमार बोंबाडे, हौसलाल रहांगडाले, सतीश बन्सोड, रामदयाल हिरकणे, अशोक बोरकर, सी.के.ठाकरे यांची उपस्थिती होती. संचालन रामचंद्र पाटील तर आभार करुणा गणवीर यांनी मानले. उपस्थितांनी आपल्या भाषणातून पानसरेंच्या क्रांतीदायी जीवनावर प्रकाश टाकला. दरम्यान त्यांच्या हत्या प्रकरणाचा निषेध करण्यात आला. यावेळी मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.

बालेकिल्ल्यात 'इंजिन' रुळाखाली

नाशिक - ज्या महानगरपालिकेत वर्चस्व गाजवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली प्रतिष्ठा कायम ठेवली होती, तेथे पक्षाला जबदरस्त धक्का बसला असून कमळाला फुलविण्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यश मिळाले आले. 
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानानुसार भारतीय जनता पक्षाला 21, शिवसेनेला 12, काँग्रेसआणि राष्ट्रवादीला 2, तर मनसेला केवळ एका जागेवर यश मिळाले आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी पॅनलला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 1, 4, 20 मध्ये भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार निवडून आले आहेत. तर प्रभाग क्रमांक आठमधील चारही उमेदवार निवडून आणण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे. प्रभाग क्रमांक 13 मधील दोन जागांवर कॉंग्रेसला यश मिळाले आहे. तर याच प्रभागातील एका जागेवर मनसेला विजय मिळाला आहे. 
खासदार हेमंत गोडसे आणि खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या पुत्रांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विजयी उमेदवार आज शहरात ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा करत असल्याचे चित्र दिसत आहे. तर मतमोजणी केंद्रांवर कल विरुद्ध बाजूने गेल्याने अनेक उमेदवारांनी केंद्र सोडून निघून गेल्याचेही आढळून आले आहे. माजी महापौर यतीन वाघ यांच्यासह राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, नगरसेवक उत्तम दोंदे, माधुरी जाधव यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीद

श्रीनगर, दि. 23 - जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यामध्ये दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या जवानांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन जवान शहीद झाले असून, 4 जवान जखमी आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.  
 
या गोळीबारात एक महिलादेखील ठार झाली. तीन आठवडयातील अशा प्रकारचा हा चौथा हल्ला आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी या भागात सैन्याकडून शोध मोहिम सुरु झाली आहे. 

पृथ्वीसारखे सात ग्रह सापडले, पाणी असण्याचीही शक्यता

न्यू यॉर्क, दि. 22 - न्यू यॉर्क : पृथ्वीसारखी कोणताचा ग्रह नसल्याचा आपला भ्रम आता दूर झाला आहे. पृथ्वीसारखेच सात ग्रह  त्यांच्या सूर्याभोवती फिरत असल्याचा  शोध अमेरिकेची अवकाश संशोधन  संस्था नासाने लावला आहे. विशेष  म्हणजे या ग्रहांवर पाणी आहे आणि म्हणजेच, जीवसृष्टीही असण्याची  दाट शक्यता आहे. 
नासाने अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार बुधवारी दुपारी १ वाजता न्यूयॉर्कमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या ग्रहांवर पोहोचण्यासाठी ४० प्रकाशवर्ष लागतील, असेही नासाने म्हटले आहे. 
स्पिट्झर अवकाश दुर्बिणीद्वारे नासाने हा शोध लावला असून, सूर्यमालेबाहेर एकाच वेळी एवढ्या संख्येने ग्रह सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आपल्याला दिसणाऱ्या सूर्याएवढ्याच आकाराच्या दुसऱ्या सूर्याभोवती हे सात ग्रह फिरतात. त्यावर पाणी आहे. एवढच नाही, सातपैकी तीन ग्रहांवर पाणी असण्याची खात्री, नासाला आहे. सूर्यमालेबाहेर असल्याने या ग्रहांना एक्सोप्लॅनेट्स असे नाव म्हटले गेले आहे.

Wednesday 22 February 2017

जिल्हा क्रीडा महोत्सवात बिरसी शाळेचे ठरले आकर्षणाचे केंद्र



गोंदिया- जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय 'शिक्षणाची वारी' या कार्यक्रमाअंतर्गत  बिरसी शाळेने सादर केलेल्या  स्टाॅलला शिक्षणाधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी यांचे सह वरिष्ठ अधिकारी व शिक्षक कर्मचाऱ्यांनी भेट देऊन कौतुक केले. सदर शाळेचे स्टाल हे आकर्षणाचे केंद्र ठरले होते.

  आज बुधवारी (दि 22) गोंदिया जिल्ह्यातील स्वदेशी खेळोंत्तेजक मंडळाचे चार दिवशीय जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाला  कामठा येथे सुरवात झाली.  या महोत्सवात आमगाव येथील जि. प. प्राथ. शाळेने  ज्ञानरचनावादी साहित्याचे स्टॉल लावले. या  स्टॉलला शिक्षणाधिकारी उल्हास नरड, उपशिक्षणाधिकारी मोहबंशी ,गटशिक्षणाधिकारी  के.वाय.सयाम , श्री घोषे, सालेकसाचे श्री चिखलोंढे, सर्व शिक्षाचे दिलीप बघेले, साधनव्यक्ती वशिष्ट खोब्रागडे, सुनिल  बोपचे, चौधरी,  केंद्र प्रमुख श्री सी पी बिसेन, एन.एस.हरदुले ,संचालक किशोर डोंगरवार, संदीप तिडके, नागसेन भालेराव, एस. यु.वंजारी, एन.बी. बिसेन, ग्राहक पतसंस्था उपाध्यक्ष श्री सुरेश कश्यप, विनोद बडोले, पुनाराम जगझापे,संदीप गर्जे, यशोधरा सोनवाने, प्राजक्ता रणदिवे, विजय राठोड, सतीश दमाहे, ई.एफ देशमुख,  पोहरकर , शुभांगी आष्टीकर, रोकडे सर, आनंद सरवदे, नुरजा पठान, अलका बोपचे , मेंढे यांचेसह जिल्ह्यातील  शिक्षक बंधु भगिनीनी भेट देऊन ज्ञानरचनावाद साहित्याविषयी माहिती घेऊन कौतुक  केले.
      या कार्यात मुख्याध्यापक एल. यु.खोब्रागडे, वर्षा बावनथडे, विकास लंजे व जैपाल ठाकूर व विद्यार्थी, विद्यार्थीनी सहकार्य केले.

   

...अखेर मकरधोकडा आश्रमशाळेचा ‘तो‘ पहारेकरी बडतर्फ

देवरी- देवरी तालुक्यातील मकरधोकडा आश्रमशाळेत घडलेल्या बालिका अत्याचार प्रकरणातील संबंधित कर्मचाऱ्याला आज स्थानिक कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्थेने बडतर्फ केल्याचे संस्थेचे सचिव अनिल येरणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील मकरधोकडा येथे स्थानिक कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्थेच्या वतीने स्वामी रामकृष्ण आदिवासी आश्रमशाळा चालविली जाते. या आश्रम शाळेतील पहारेकरी देवकरण हिरदेलाल उईके यांच्यावर त्याच शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सदर प्रकरणी देवरी पोलिस तपास करीत असून संस्थेने आज (ता२२) रोजी त्या कर्मचाऱ्याची सेवा तत्काळ संपुष्टात आणत असल्याची माहिती संस्थेचे सचिव अनिल येरणे यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सदर प्रकरण हे शाळेच्या आवाराबाहेरील असल्याने त्या प्रकरणाची संस्था वा आश्रमशाळेशी कसलाही संबंध नसल्याचा खुलासा श्री येरणे यांनी उपस्थित पत्रकारांपुढे करीत काही संघटना आमच्या संस्थेला नाहक बदनाम करीत असल्याचा आरोप केला. मागास भागात शिक्षणाचे सेवाभावी कार्य करीत असून सुद्धा काही लोकांमुळे आमची नाहक बदनामी होत असल्याची खंतसुद्धा येरणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. 

अमृता फडणवीस :कवडसला आदर्श गाव बनविणार

नागपूर दि.22: हिंगणा तालुक्यातील कवडस गावातील समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. आगामी काळात गावातील समस्या सुटणार असून हे गाव आदर्श ग्राम म्हणून दूरवर ओळखले जाईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.हिंगणा तालुक्यातील कवडस हे गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले असून, तेथील आढावा घेण्यासाठी त्यांनी गावात भेट दिली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

आमदार परिचारक यांना महिला आयोगाचे समन्स

मुंबई दि.22- जवानांच्या कुटुंबीयांबाबत आक्षेपार्य विधान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांना राज्य महिला आयोगाने मंगळवारी समन्स बजावले आहे. परिचारक यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी सैनिकांच्या संघटनेने आयोगाकडे केली असून, आयोगाने या तक्रारीची दखल घेतली आहे.पंढरपूर येथील एका सभेमध्ये परिचारक यांनी जवानांच्या पत्नीबाबत वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचा सर्वस्तरांवरून निषेध करण्यात आला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांची माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आज भेट घेऊन परिचारक यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली. याविषयी रहाटकर यांनी “सकाळ’शी बोलताना सांगितले, आयोगाने परिचारक यांच्या विधानाची दखल घेतली आहे. त्यांना समन्स काढण्यात आले असून, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना आयोगासमोर येऊन त्यांनी केलेल्या विधानाचे स्पष्टीकरण द्यावे लागेल.
परिचारक यांच्यावर आयोग कशाप्रकारे कारवाई करेल याबाबत अधिक माहिती देण्यास रहाटकर यांनी नकार दिला. त्या म्हणाल्या, की आयोगाच्या कार्यकक्षेतच कायद्याची अंमलबजावणी केली जाईल. परिचारक यांची बाजू ऐकून घेतल्यानंतरच त्याविषयी अधिक वक्‍तव्य करता येऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बीअरच्या बॉटलवर गणपतीचा फोटो, अमेरिकी कंपनीचा प्रताप

नवी दिल्ली, दि. 21 - अमेरिकेच्या दोन ऑनलाइन रिटेलर कंपन्यांवर हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बीअरच्या बॉटलवर गणपतीचा फोटो आणि बुटांवर ओम लिहिलेलं निशाण वापरल्यामुळे या कंपन्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.  yeswevibe.com आणि lostcoast.com अशी या वेबसाइटची नावं आहेत. 
 
हफिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, भारत स्काउट्स अॅन्ड गाइड्सचे कमिश्नर नरेश कडयान यांनी याबाबत तक्रार दाखल केली. याबाबत त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहूनही कळवलं आहे. या प्रकरणी दिल्लीच्या प्रशांत विहार पोलीस स्थानकात दुसरी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयपीसी कलम 295 अ आणि 153 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
यापुर्वी  कॅनडातील अॅमेझॉनच्या वेबसाइटवरही तिरंगा असलेल्या पायपुसणीची विक्री सुरू होती. त्यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अॅमेझॉनच्या एकाही अधिका-याला व्हिसा देणार नाही अशी धमकी दिल्यावर अॅमेझॉनने माफी मागितली होती.

पंतप्रधान मोदींनी अमेरिकन सदस्यांच्या कानावर घातली भारताची नाराजी

नवी दिल्ली, दि. 22 - H-1B व्हिसावर नियंत्रण आणण्याच्या धोरणाचा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने फेरविचार करावा. प्रतिभावंतांवर अशा प्रकारे निर्बंध आणणे योग्य नाही असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांबरोबर झालेल्या चर्चे दरम्यान व्यक्त केले. या चर्चेतून त्यांनी अमेरिकेच्या H-1B व्हिसा धोरणामुळे भारतीय आयटी क्षेत्रात निर्माण झालेली अस्वस्थतता ट्रम्प प्रशासनाच्या कानावर घातली. 
 
अमेरिकेत रोजगार निर्मितीचा आकडा वाढावा यासाठी ट्रम्प यांनी राष्ट्रध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारात H-1B व्हिसावर नियंत्रण आणण्याचे आश्वासन दिले होते. त्याच आश्वासनाची पूर्तता करण्याचे काम ट्रम्प यांनी सुरु केले आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये नाराजी आहे. 
 
अमेरिकेत राहणारे भारतीय तज्ञ अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देत आहेत. कायद्याचे पालन करुन तिथल्या सामाजिक व्यवस्थेशी एकरुप झाले आहेत तसेच फक्त H-1B व्हिसाधारकालाच फायदा होत नाही तर, अमेरिकेलाही त्याचा फायदा होते असे पंतप्रधानांनी सांगितले. भारत आणि अमेरिका आणखी जवळ येऊन एकत्रितपणे कोणत्या क्षेत्रात काम करु शकतात त्यावर मोदींनी आपली मते मांडली. 
 

BERARTIMES_ 22-28_ FEb_2017





Tuesday 21 February 2017

शरद पवारांच्या वॉर्डात राष्ट्रवादीचा उमेदवारच नाही!

मुंबई दि.२१-: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मतदान कोणत्या पक्षाला करणार? असा प्रश्न उभा राहिला आहे. कारण मुंबईतल्या ज्या वॉर्ड क्रमांक 214 मध्ये पवारांचं मतदान आहे, त्या वॉर्डात राष्ट्रवादीचा उमेदवारच नाही.त्यामुळे शरद पवार ज्यावेळी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर जातील, त्यावेळी ते कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतील, याबाबत चर्चा सुरु झाली आहे.वॉर्ड क्रमांक 214 मध्ये शिवसेनेकडून अरविंद बने, भाजपकडून अजय पाटील, काँग्रेसचे कौशिक शहा आणि मनसेचे धनराज नाईक रिंगणात आहेत.त्यामुळे शरद पवार कोणाला मतदान करणार याची उत्सुकता आहे.

महानगरपालिकांसाठी 56; तर जिल्हा परिषदसाठी 69 टक्के मतदान

मुंबई, दि. 21: राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 56.30; तर 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.
सहारिया यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आज सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यातील 4 पंचायत समित्या आणि त्यांतर्गतच्या निवडणूक विभागात मात्र सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. यवतमाळ जिल्हा परिषदेचे 6 निवडणूक विभाग व पंचायत समितीच्या 12 निर्वाचक गणांत 73 टक्के; तर वर्धा जिल्हा परिषदेच्या 2 निवडणूक विभागात व पंचायत समितीच्या 4 निर्वाचक गणांत 68.99 टक्के मतदान झाले. काही किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली. महानगरपालिकेच्या मागील निवडणुकांत सरासरी 52 टक्के; तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत सरासरी 68.99 टक्के मतदान झाले होते.
प्राथमिक अंदाजानुसार महानगरपालिकानिहाय मतदानाची टक्केवारी अशी: बृहन्‍मुंबई- 55, ठाणे- 58, उल्हासनगर- 45, पुणे- 54, पिंपरी-चिंचवड- 67, सोलापूर- 60, नाशिक- 60, अकोला- 56, अमरावती- 55 आणि नागपूर- 53. एकूण सरासरी- 56.30.प्राथमिक अंदाजानुसार जिल्हा परिषदनिहाय (पंचायत समित्यांसह) मतदानाची टक्केवारी अशी: रायगड- 71, रत्नागिरी- 64, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 68, पुणे- 70, सातारा- 70, सांगली- 65, सोलापूर- 68, कोल्हापूर- 70, अमरावती- 67 आणि गडचिरोली- 68. सरासरी- 69.43.

भाजपा उमेदवाराच्या घरातून पाच डमी ईव्हीएम मशीन जप्त

अकोला, दि. 21 : मतदान आटोपल्यानंतर मंगळवारी सायंकाळी प्रभाग १५ मधील भाजपाचे उमेदवार सुजाता देवराव अहीर यांच्या निवासस्थानी पोलिसांनी छापा टाकून पाच डमी ईव्हीएम मशीन जप्त केल्या. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी छापा टाकून ही कारवाई केली असून भाजपा उमेदवार सुजाता अहीर आणि त्यांचे पती देवराव अहीर यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी सखोल चौकशी सुरू केली आहे.
महापालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असताना परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील या प्रभाग १५ मधून जात असताना त्यांना भाजपाचे उमेदवार सुजाता देवराव अहीर यांच्या घरी गर्दी दिसली. त्यांनी नागरिकांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. दरम्यान, याचवेळी उमेदवार पती देवराव अहीर तिथे आले. अहीर यांनी प्रिया पाटील यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला असता या ठिकाणी काही काळ खडाजंगी झाली. या प्रकारामुळे त्यांनी अतिरिक्त पोलिसांची कुमक बोलावून त्यांच्या घराची झडती घेतली. या झडतीमध्ये पाच डमी ईव्हीएम मशीन मिळून आल्या. यासंदर्भात पोलिसांनी अहीर यांची विचारणा केली असता त्यांच्याकडून समर्पक उत्तर देण्यात आले नाही.
मोठ्या प्रमाणात घरासमोर गर्दी जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यानंतरही पोलिसांशी उर्मट भाषेत संभाषण केल्याने तसेच डमी ईव्हीएम मशीन मिळाल्याने भाजपा उमेदवार सुजाता अहीर आणि त्यांचे पती देवराव अहीर यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ नुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन जहाल नक्षल्यांना अटक

गडचिरोली, ,berartimes.com दि.२१- : आज जिल्ह्याच्या दक्षिण भागातील चार तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान सुरु असताना पोलिसांनी एटापल्ली तालुक्यातील रेखनार गावानजीकच्या जंगलातून दोन जहाल नक्षल्यांना अटक केली. नीलेश पोटावी व अजित पुडो अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आज विशेष अभियान पथकाचे पोलिस एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील रेखनार जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना साध्या वेशभूषेतील ४ अनोखळी इसम संशयास्पद स्थितीत आढळून आले. पोलिसांना पाहताच चौघांनीही पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करुन नीलेश पोटावी व अजित पुडो यांना ताब्यात घेतले. नीलेश पोटावी हा प्लाटून क्रमांक ३ चा, तर अजित पुडो हा कसनसूर एलओएसचा सदस्य आहे. एटापल्ली व धानोरा तालुक्यात झालेले खून, चकमकी, जाळपोळी व काळे झेंडे फडकविण्याच्या गुन्ह्यांत या दोघांचा समावेश होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

भाजप नेत्याच्या मकरधोकडा आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर बलात्कार

सर्पंदंशप्रकरणापासून चार वर्षापूर्वी ४ विद्यार्थ्यांचा मृत्यु, तरीही भाजपसरकारचे पाठबळ
गोंदिया,berartimes.com दि.२१- जिल्ह्यातील देवरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातंर्गत येणाऱ्या मकरधोकडा येथील स्वामी रामकृष्ण आदिवासी आश्रमशाळेच्या इयत्ता नवव्या वर्गाच्या विद्यार्थिनीवर आश्रमाशाळेच्याच चौकीदाराने बलात्कार केल्याची घटना आज (दि.२१)मंगळवारला उघडकीस आली आहे. या प्रकरणाची तक्रार नोंदविण्याची प्रकिया देवरी पोलीस ठाण्यात सुरु असल्याची माहिती देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे यांनी बेरार टाईम्सला दिली. गेल्या काही वर्षापासून सदर आश्रमशाळेतील घडामोडी बघता सदर आश्रमशाळा कायमचीच बंद करणे गरजेचे असून सदर संस्थेच्या संचालकाना पाठबळ देणाऱ्या भाजप,काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही निषेध नोंदविण्याची गरज असल्याचे विचार आदिवासी संघटनांच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. निव्वळ आर्थिक लाभापोटी आदिवासी समाजातील काही राजकीय नेते सदर संस्थाचालकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप सुध्दा केला आहे.
या निवासी असलेल्या आदिवासी आश्रमशाळेत चार वर्षांपूर्वी म्हणजे जुलै २०१२ मध्ये सर्पदंश प्रकरणाने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २०१७ मध्ये जानेवारी महिन्यात अतिसाराने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्या घटनेची फाईल बंद होत नाही, तोच आज(दि.२१) त्याच शाळेतील एका नवव्या वर्गातील देवरी तालुक्यातीलच लोहारा परिसरातील निवासी असलेल्या एका काँग्रेस नेत्याच्या कुटुंबातील विद्यार्थिनीवर आदिवासी आश्रमशाळेच्या चौकीदाराने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. सदर चौकीदाराला हे कृत्य करताना त्या परिसरातील एका गुराख्याने बघितल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटल्याचे बोलले जात आहे. ही निवासी आदिवासी आश्रमशाळा देवरी तालुक्यातील कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्थेचे प्रमुख,गोंदिया जिल्हा मजुर सहकारी संघाचे माजी अध्यक्ष व भाजपचे वरिष्ठ नेते झामसिंह येरणे यांची आहे. त्यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी घनिष्ट संबध असून नागपूर व मुंबई येथील निवासस्थानी नेहमीच असतात. त्यांच्या देवरी तालुक्यातील मकरधोकडा या निवासी आदिवासी आश्रमशाळेत २०१२ मध्ये सर्पदंशाने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही शाळा काँग्रेस आघाडीचे सरकार असताना शासनाने बंद केली होती. परंतु, राजकीय दबावानंतर परत सुरू करण्यात आली. २० जानेवारी २०१७ रोजी एका आदिवासी विद्यार्थिनीचा अतिसाराने मृत्यू झाला. ती शाई वाळते नाही, तेच आज २१ फेब्रुवारी रोजी देवाटोला या गावच्या इयत्ता नववीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीवर त्याच शाळेतील चौकीदाराने सायंकाळच्या दरम्यान शाळेबाहेरील शेतशिवारात तिच्यावर बलात्कार केला. ही बातमी बाहेर पसरू नये, याकरिता शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थिनीवर दबाव घातल्याचा आरोप आदिवासी संघटनानी केला आहे. आदिवासी संघटनांना माहिती पडल्यामुळे देवरी पोलिस आणि आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाने या घटनेसंदर्भात नोंद घेतली असून सदर प्रकरणात देवरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती ठाणेदार राजेश तटकरे यांनी दिली.तर प्रकल्प अधिकारी विनोद चौधरी यांनी सुध्दा यासंबधात विभागाकडे माहिती आल्याचे सांगत पोलीस तक्रारीनंतरच विभाग आपली पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले. दरम्यान या विभागाच्या लोकप्रतिनिधींची भूमिका अद्यापही जाहीर न झाल्याने आदिवासी समाजात असंतोष दिसून येत आहे. तर काँग्रेसचे नेते म्हणवून घेणारे एक नेते मात्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील गोंदियाला येत असल्याने याप्रकरणात आंदोलन वगैरे बुधवारला करता येणार नाही, असे सांगत वेळ मारुन नेल्याने त्या तथाकथीत नेत्याच्या भूमिकेवरही शंका वर्तविली जात आहे.

Monday 20 February 2017

देवरी येथे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सत्कार


विमुक्त भटक्या जाती-जमाती परिषदेचे आयोजन

देवरी- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विमुक्त भटक्या जाती जमाती परिषदेचे गेल्या रविवारी देवरी येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शासकीय सेवेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
स्थानिक आफताब मंगल कार्यालयात आयोजित सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी देवरीच्या साहित्यिक डॉ. वर्षा गंगणे ह्या होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूरच्या संघर्ष वाहिनीचे मुख्य संयोजक मुकुंद अड्डेवार हे उपस्थित होते. या सोहळ्यात देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे, देवरी येथील वनपरिक्षेत्राधिकारी बी बी मारबते, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे नियोजन अधिकारी एन टी भोई. डॉ. वर्षा गंगणे, मुकुंद अड्डेवार आदी मान्यवरांचा शाल-श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारमूर्ती राजेश तटकरे, मारबते, भोई, अड्डेवार, प्रा. गंगणे यांनी सत्काराला उत्तर देताना समाजातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी संघटित होऊन समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक गोपाल मेश्राम यांनी केले. संचलन प्रकाश मेश्राम यांनी केले. उपस्थितांचे आभार जगदीश खेडकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी के. टी. कांबळे, गणराज नान्हे, मुरलीधर शेंडे, तुलाराम कुरार्डे, द्वारका धरमगुळे, सुषमा वलथरे,साधना नान्हे आदींनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sunday 19 February 2017

जवानांबाबत भाजप सहयोगी आमदाराचे बेताल वक्तव्य

पंढरपूर - आमदार प्रशांत परिचारक यांनी देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या पत्नींच्या चारित्र्या संदर्भात निवडणूक प्रचार सभेत बेताल वक्तव्य केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. भोसे (ता.पंढरपूर) येथील सभेत त्यांनी सैनिकांच्या संदर्भात अवमानकारक आणि हिन पातळीवरील उदाहरण दिल्याने त्यांच्या या वक्तव्याचा निषेध होत आहे. दरम्यान आज सकाळी परिचारक यांनी पत्रकारांशी बोलताना झालेल्या प्रकाराविषयी जाहीर माफी मागितली. 
पंढरपूर तालुक्यातील भोसेमधल्या भाजप उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना परिचारक यांनी राजकारणाची व्याख्या करताना देशाच्या जवानांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची फुटलेली मते मिळवून ते सोलापूरमधून विधान परिषदेवर निवडून गेले होते.
आमदार परिचारक यांच्याकडून राजकारण सध्या कशा पध्दतीने चालू आहे याचे उदहारण सांगताना जवानांविषयी वक्तव्य केले. ते म्हणाले, "पंजाब मधला सैनिक असतो सीमेवर आणि त्याची बायको इकडे बाळंतीण होते. तुम्हाला मुलगा झाला अशी त्याला तार येते. वर्षभर तो गावाकडे गेलेला नसतो आणि तिथे तो पेढे वाटतो. लोक म्हणतात, काय झालं तो सांगतो मला मुलगा झाला. असे सगळे राजकारण आहे." 
दरम्यान परिचारक यांना त्यांच्या अक्षम्य वक्तव्याची जाणीव झाली. त्यांनी आज सकाळी त्यांच्या वक्तव्या विषयी पत्रकारांच्या समोर जाहीर माफी मागितली. ते म्हणाले, गेली अनेक वर्षे समाज आमच्या कुटुंबाला ओळखतो. देशाच्या सीमेवीर देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्याची भूमिका आम्ही आजवर घेतलेली आहे. तथापी भाषणाच्या ओघात आपल्याकडून चूकीचे वक्तव्य केले गेले. तसे माझ्या कडून घडायला नको होते परंतु आपल्या कडून झालेल्या वक्तव्या संदर्भात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांची मी जाहीर दिलगीरी व्यक्त करतो. माफी मागतो. भविष्य काळात माझ्याकडून सैनिक आणि त्यांचे कुटुंबिय तसेच महिलांच्या बद्दल त्यांच्या भावना दुुखावतील असे वक्तव्य कधीही होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे त्यांनी नमूद केले.

Saturday 18 February 2017

१ ते ३१ मार्चपर्यंत कायदेविषयक जनजागृती व लोकअदालतींचे आयोजन

गोंदिया,दि.१८ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय मार्फत तसेच तालुका विधी सेवा समिती आमगाव, देवरी, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व तिरोडा अंतर्गत मार्च २०१७ या महिन्यात जिल्ह्यातील दुर्गम भागातील विविध गावांमध्ये फिरते कायदेविषयक साक्षरता शिबीरे व लोकअदालतींचे आयोजन करण्यात आले आहे. या फिरते कायदेविषयक साक्षरता शिबीरे व लोकअदातीचा शुभारंभ १ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा न्यायालय गोंदिया येथून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आकर यांच्या हस्ते होणार आहे.

गर्दी नसल्यानेच मुख्यमंत्र्यांना मात्र पुण्यातील सभा रद्द करण्याची नामुष्की

पुणे, दि. 18 – महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने प्रचारसभांचा सपाटा लागला असताना मुख्यमंत्र्यांना मात्र पुण्यातील सभा रद्द करण्याची नामुष्की ओढावली. सदाशिव पेठेतील टिळक रोडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आले होतं. मात्र पुणेकरांनी सभेकडे पाठ फिरवल्याने संपुर्ण मैदान मोकळं पडले होतं, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सभा रद्द करावी लागली.मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन सभा रद्द झाल्याचं सांगताना समन्वयाचं कारण दिले. मात्र गर्दी नसल्यानेच सभा रद्द झाल्याचं बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेसाठी पोहोचले तेव्हा संपुर्ण मैदान मोकळं पडले होतं. दुपारच्या वेळी ठेवण्यात आलेल्या या सभेला पुणेकर आलेच नाहीत.
मुख्यमंत्री येऊन 15 मिनिटे झाली, तरीही सभा सुरु करण्यात आली नव्हती. तोपर्यंत मुख्यमंत्री स्टेजच्या बाजूलाच खाली थांबले होते. मंचावर पालकमंत्री गिरीष बापट आणि भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले होते. मात्र मुख्यमंत्री खालीच होते. अखेर मुख्यमंत्र्यांनी सभा रद्द करत पिंपरी चिंचवडच्या दिशेने आपला मोर्चा वळवला.

भर सभागृहात आमदारांनी विधानसभाध्यक्षांचे शर्ट फाडले

चेन्नई, दि. 18 -  तामिळनाडू विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच गदारोळ कायम राहिल्याने दुपारी तीन वाजेपर्यंत पुऩ्हा एकदा सभागृह तहकूब करण्यात आले आहे. गुप्तमतदानाची मागणी फेटाळल्यानंतर तामिळनाडू विधानसभेमध्ये द्रमुक आमदारांनी केलेल्या तोडफोडीनंतर एकच्या सुमारास पुन्हा एकदा कामकाजाला सुरुवात झाली होती. 
 
तामिळनाडू विधानसभाध्यक्ष पी.धनापाल यांनी सभागृहात जे घडले त्याबद्दल खेद व्यक्त केला. त्यांनी विधानसभेतील पोलिसांना द्रमुक आमदारांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर द्रमुक आमदार विधानसभेच्या आत धरणे आंदोलनाला बसले. 
 
द्रमुक आमदारांनी माझे शर्ट फाडले. माझा अपमान केला. कायद्यानुसार मी माझे काम करत होतो असे धनपाल यांनी सांगितले. द्रमुक, पनीरसेल्वम गटाची गुप्तमतदानाची मागणी फेटाळल्यानंतर द्रमुक आमदार आक्रमक झाले. त्यांनी आसनांवर उभे राहून घोषणाबाजी केली. खुर्च्या, टेबलांची मोडतोड केली.

अपघातातील पिडीतांना नुकसान भरपाई मिळवून देणे ही सामाजिक बांधिलकी- न्या. अणेकर


गोंदिया- साथीच्या रोगाने वा युद्धाने जेवढी जिवीतहानी होत नाही त्यापेक्षा जास्त हानी ही अपघातांमुळे होते. अपघातातील बळींच्या नातेवाईकांना किंवा पिडीत व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी अपघात दावा प्राधिकरण, पोलीस विभाग व विमा कंपन्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी केले.

 पोलीस मुख्यालयाच्या कारंजा येथील प्रेरणा सभागृहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा पोलीस विभाग यांच्या संयुक्त वतीने नुकतेच आयोजित दावे मंजूर प्रक्रिया प्राधिकरण या विषयावरील कायदेविषयक जनजागृती शिबिराचे उदघाटक म्हणून न्या.आणेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सदस्य सचिव श्रीमती इशरत शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, न्या.वासंती मालोदे यांची तर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मुख्य न्यायदंडाधिकारी पी.एच.खरवडे,न्या.ए.एच.लध्दड व देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांची उपस्थिती होती.
डॉ.भूजबळ म्हणाले की, बऱ्याच घटनामधील पिडीतांना मानसिक आधार देण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. त्यापैकीच अपघातील पिडितांना किंवा अपघातामध्ये बळी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मानसिक आधार मिळावा, यासाठी त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. या निर्देशाची योग्यप्रकारे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलिस विभागाची आहे, असेही ते म्हणाले.
न्या.लध्दड यांनी अपघातांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना किंवा पिडीतांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्याबाबत सर्वोच्च न्यायालय यांनी सन 2010 मध्ये अपघात दावा प्राधिकरण, पोलीस विभाग व विमा कंपन्या यांना निर्देश दिलेले आहेत. वाहनाने अपघात झाल्यानंतर वाहनचालक पळून जाणे, विमा नसलेल्या वाहनाकडून अपघात होणे व अपघात झालेल्या वाहनाचा विमा आहे पण विम्याच्या पॉलीसीमध्ये प्रवासी समाविष्ट नाही, अशा अपघातांमधील पिडीतांना किंवा आश्रितांना नुकसान भरपाई मिळत नाही. ज्या वाहनाने अपघात झाला, परंतू त्या वाहनाचा विमा नाही अशा अपघातामधील 20 टक्के पिडीतांना मोबदला मिळत नाही. ही टक्केवारी कमी करण्यासाठी ही योजना तसेच अपघात कमी करणे, अपघात तपासाची प्रक्रिया वेळेवर करणे, अपघातामध्ये नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक दस्ताऐवजसहीत अहवाल 30 दिवसात प्राधिकरणास सादर करणे, जास्तीत जास्त वाहनांचा विमा करण्यास प्रोत्साहन देणे, जास्तीत जास्त अपघातामध्ये नुकसान भरपाई मिळते अशी माहिती दिली.
न्या.खरवडे यांनी मोटार वाहन कायदयानुसार वाहन रस्त्यामध्ये उभे करुन निघून जाणे, दहा तासांचे वर एकाच ठिकाणी रस्त्यामध्ये वाहन उभे ठेवणे, परवान्याविना वाहन चालविणे, गजबजलेल्या ठिकाणावरुन वेगाने वाहन चालविणे, वाहनात तांत्रिक बिघाड असूनही वाहन चालविणे, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, दुसऱ्या वाहनांना बाधा होईल अशा पध्दतीने वाहनात सामान भरुन वाहन चालविणे अशा प्रकारची वर्तणूक ही शिक्षेस पात्र आहे. पोलिसांनी अशी वर्तणूक करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. अपघात गुन्ह्यात गरजेनूसार विविध फौजदारी कलमा आरोपीवर लावाव्यात. अपघात गुन्ह्याचा तपास तपासी अधिकारी यांनी अत्यंत सावधपणे करणे गरजेचे आहे. साक्षीदारांना पंचनामे वाचून दाखविणे गरजेचे आहे. तसेच ज्या मुलांकडे वाहनाचा परवाना नाही त्यांच्या वडिलांवर किंवा गाडी मालकावर गुन्हे दाखल करावेत, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल असे सांगितले.
उपविभागीय पोलीस अधिकारी जवळे यांनी अपघात गुनह्याचा तपास करताना तपासी अधिकारी यांनी घटनास्थळाचा पंचनामा अत्यंत सविस्तरपणे लिहिणे गरजेचे आहे. गाडी चालक, मालक व क्लिनर यांचे बयाण घेणे गरजेचे आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले. उपस्थितांचे आभार वासंती मालोदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहायक पोलीस निरिक्षक श्री.चौरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आर.जी.बोरीकर, महेंद्र पटले, एस.यु.थोरात, आर्यचंद्र गणवीर, पॅरालीगल व्हालंटीयर हेरॉल्ड बॅस्टनी यांनी सहकार्य केले.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...