Saturday 4 February 2017

हरवलेला मोबाईल शोधा आयएमईआय क्रमांकाशिवाय

विद्यार्थिनीने तयार केले ऍप्लिकेशन; चोरट्याचा फोटो, डेटा डिलीट करण्याची सोय 
मुंबई : मोबाईलमध्ये स्टोअर करण्यात येणाऱ्यामध्ये पासवर्ड, फोटो, खासगी माहितीपासून ते बॅंकांच्या व्यवहाराचा तपशील अशी हमखास माहिती असते. मोबाईल हरवला की सगळा महत्त्वाचा डेटा चोरीला गेल्याचा अनुभव येतो. म्हणूनच अशा महत्त्वपूर्ण माहितीचा दुरुपयोग टाळण्यासाठी आर्जवी ममदापूरकर या विज्ञान शाखेतील विद्यार्थिनीने "फॉक्‍सट्रॅप' हे ऍप्लिकेशन तयार केले आहे. महत्त्वाचे म्हणजे आयएमईआय क्रमांकाशिवाय चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाईल मिळवण्याचे पर्याय या ऍप्लिकेशनमुळे खुले होतात. 
मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तुमचा पासवर्ड किंवा लॉक पॅटर्न उघडण्याचा प्रयत्न केल्यास मोबाईलचा फ्रंट कॅमेरा सुरू होतो. फोन अनलॉक करणाऱ्या व्यक्तीचा नकळत फोटो काढला जाईल, तसेच रजिस्टर्ड ईमेल आयडीवरही फोटो पाठवण्याची सुविधा असेल. त्यासोबतच फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे नेमके ठिकाणही ईमेलवर पाठवण्यात येईल. फोन अनलॉक करताना चुकीचा पासवर्ड टाकल्यास अलार्मही सुरू होईल. फोन हरवल्याचे लक्षात आल्यास फोनमधील सर्व महत्त्वाचा डेटा डिलीट करण्याची सुविधा या ऍप्लिकेशनमध्ये आहे. हरवलेल्या फोनमधील सीमकार्ड काढून तो वापरण्याचा प्रयत्न झाल्यास नव्या सीमकार्डचा क्रमांकही रजिस्टर्ड पर्यायी क्रमांकावर उपलब्ध होण्याची सुविधा आहे. हरवलेला मोबाईल ट्रॅक करण्यासाठी आयएमईआय क्रमांकाची म्हणूनच आवश्‍यकता नसेल. 
मोबाईल हरवल्यानंतर अनेकांचा गोंधळ होतो. म्हणून अशावेळी महत्त्वाचा डेटा हरवला जाऊ नये म्हणून काय करता येईल यासाठीच्या पर्यायासाठी आम्ही कुटुंबात विचार केला. अखेर ऍप्लिकेशन डेव्हलपर, मित्र आणि वडील सुहास ममदापूरकर यांच्या मदतीने ऍप्लिकेशनवर काम सुरू केले. एकूण चार महिन्यांचा कालावधी ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी लागला, असे आर्जवीने सांगितले. ऍप्लिकेशनसाठी प्रयोगादरम्यान येणाऱ्या वेगवेगळ्या सूचना पाहता गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक प्रयोग करण्यात आले. अखेर गेल्या काही दिवसांमध्ये ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यासाठी यश आल्याची माहिती तिने दिली. 
वापरकर्त्याचा कोणताही डेटा घेत नाही 
ऍप्लिकेशनच्या निमित्ताने वापरकर्त्याचा कोणताही खासगी डेटा आमच्याकडे साठवला किंवा वापरला जात नसल्याचेही ती म्हणाली. केवळ फायरवॉल सुरक्षिततेच्या निमित्ताने या डेटाचा एक्‍सेस ऍप्लिकेशनमध्ये मागण्यात आला आहे, असेही ती म्हणाली.  

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...