Saturday 4 February 2017

ब्लॉसम स्कूल मधे 'आपला रस्ता, आपली सुरक्षा' प्रकल्प साजरा


देवरी-   आजच्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना वाहतुक चिन्हे आणि नियमांचा परिचय करून देण्याच्या उद्देशाने स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूल मध्ये 'आपला रस्ता, आपली सुरक्षा' या प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते.
होते. या प्रकल्पाची मूळ संकल्पना मुख्याध्यापक सुजित टेटे यांची होती.

या प्रकल्पामध्ये शाळेतील सर्व विध्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. प्रकल्पाची पूर्व तयारी वाहतुकीचे सर्व नियम आणि चिन्हाचीं प्रतिकृति तयार करुन करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या प्रतिकृति आणि हस्तलिखिताचे उत्कृष्टरीत्या प्रदर्शन करून नागरिकांना एक वेगळा संदेश दिला.

वाहतुक नियम आणि वाहतुकीच्या चिन्हांची माहिती अभावी दररोज अपघातांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. अशा अपघातांमुळे  मोठ्या प्रमाणावर जिवीत व वित्तीय हानी होत असते. याविषयी नागरिकांच जागृती निर्माण करण्यासाठी या प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी पोलिस कॉंस्टेबल नितीन शिरपूरकर  व नेताम यांनी विद्यार्थ्यांचे समयोचित मार्गदर्शन केले. शिरपूरकर यांनी अपघात निवारण या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नितीन शिरपूरकर
या प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी हरीश उके , नितेश लाडे, राहुल मोहुर्ले, हर्षदा चारमोड़े स्वप्नील पंचभाई यांचेसह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

संचालन रिद्धी सोमवंशी हिने केले. उपस्थितांचे आभार अवनी पनपालिया हिने मानले.

1 comment:

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...